दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 465, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें॥ ७ ॥ प्राणी बैसोनीच राहतां । अथवा बहुत पळोन जातां । परब्रह्म तें तत्वतां । समागमें ॥ ८ ॥ पक्षी अंतराळीं गेला । भोवतें आकाशाचि तया- ला । तैसें ब्रह्म प्राणियाला । व्यापून असे ॥ ९ ॥ परब्रह्म पोकळ घनदाट । परब्रह्म शेवटाचा शेवट । ज्यासि त्यासि ब्रह्म नीट । सर्वकाळ ॥१०॥ दृश्य सबाह्य अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं । अरे त्या निर्मळाची सरी । कोणास यावी ॥ ११ ॥ वैकुंठ कैलास स्वर्गलोकीं । इंद्रलोकीं चौदा लोकीं । प- न्नागादि पाताळलोकीं । तेथेंहि आहे ॥१२॥ काशीपासून रामेश्वर । अवघें दाटलें अपार । पाहतां पाहतां पारावार । त्यास नाहीं ॥ १३ ॥ परब्रह्म तें एकलें । एकदाचि सकळांस व्यापिलें । सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठायीं ॥ १४ ॥ परब्रह्म पाउसें भिजेना । अथवा चिखलानें भरेना । पुरामध्ये परी वाहेना । पुरासमागमें ॥ १५ ॥ एकसरें सन्मुख । वाम १ सव्य २ दोहोंकडे एक । अधोर्ध्व प्राणी सकळिक । व्यापून आहे ॥ १६ ॥ आकाशाचा डोहो भरला । कदापि नाहीं उचंबळला । असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे ॥ १७ ॥ एकजिनसी गगन उदास । जेथें नाहीं दृश्य भास । भासेंविण निराभास । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥ संत साधु महानुभावां । देव दानव मानवां । परब्रह्म सकळांस विसांवा । विश्रांति ठाव ॥ १९ ॥ कोणीकडे शेवटास जावें । कोणीकडे काय पाहावें । असंभाव्य तें मानावें । काय म्ह- णोनी ॥ २० ॥ स्थूल नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं एक सारिखें नव्हे । ज्ञान- दृष्टीविण नव्हे । समाधान ॥ २१ ॥ पिंडब्रह्मांड निरास । मग तें ब्रह्म निरा- भास । येथून तेथवरी आकाश । भकासरूपें ॥ २२ ॥ ब्रह्म व्यापक हें तों खरें । दृश्य आहे तों हें उत्तरें । व्यापाविण कोण्या प्रकारें । व्या- पक म्हणावें ॥ २३ ॥ ब्रह्मासि शब्दाचि लागेना । कल्पना कल्पूं शकेना ४ । कल्पनेतीत निरंजना । विवेकें ओळखावें ॥ २४ ॥ शुद्ध सार श्रवण । शुद्ध प्रत्ययाचें मनन । विज्ञानीं पावत उन्मन ३ । सहजाचि होतें ॥ २५ ॥ झालें साधनाचें फळ । संसार झाला सकळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं बिंबलें ॥ २६ ॥ हिशेब झाला मायेचा । झाला निवाडा तत्वांचा । साध्यें होतां साधनाचा । ठाव नाहीं ॥ २७ ॥ स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृ-
१. डावें. २. उजवें. ३. संकल्पविकल्परहित स्थिति. ४. ब्रह्मरूप.