भारतकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

३९० श्रीदासबोध. [ दशक ते । आपदां लागती ॥ १९ ॥ बळाविण युद्धास गेला । तो सर्वस्वें नाग- वला । शब्द ठेवावा कोणाला । कोण कैसा ॥ २० ॥ जें प्रतीतीस आलें खरें । तेंचि घ्यावें अत्यादरें । अनुभवाविण जीं उत्तरें । तीं फलकटें जाणावीं ॥२१॥ शिकवून जातां राग चढे । परंतु पुढें अद्दल घडे । खोटा निश्चय तात्काळ उडे । लोकांमध्यें ॥२२॥ खरें सांडून खोटें घेणें । बकध्यानास काय उणें । त्रिभू- वनीं नारायणें । न्याय केला ॥२३॥ तो न्याय सोडितां शेवटीं । अवघें जगाचि लागे पाठीं । जनीं भांडभांडोनि हिंपुटी । किती व्हावें ॥२४॥ अन्याय बहुतांस पुरवले । हें देखिलें ना ऐकलें । वेडें उगेंच भरीं भरलें । असत्याचे ॥ २५ ॥ असत्य म्हणिजे तेंचि पाप । सत्य म्हणिजे स्वरूप । दोहोंमध्यें साक्षेप । कोणाचा करावा ॥ २६ ॥ मायेमध्यें बोलणें चालणें साचें । माया नसतां बोलणें कैंचें । या कारणें निःशब्दांचें । मूळ शोधावें ॥ २७ ॥ वाच्यांश जाणोन सांडावा । लक्ष्यांश विवरोन घ्यावा । या कारणें निःशब्दमूळाचा गोवां । आढळना ॥ २८ ॥ अष्टधा प्रकृति पूर्वपक्ष । सांडून अलक्षीं ला- वावें लक्ष । मननशीळ परम दक्ष । तोचि जाणे ॥ २९ ॥ नाना भूस आणि कण । एकाचि म्हणणें अप्रमाण । रस सांडून चोइटिया कोण । शाहणा से- वी ॥ ३० ॥ पिंडीं नित्यानित्यविवेक । ब्रह्मांडीं सारासार अनेक । सकळ शोधूनियां एक । सार घ्यावें ॥ ३१ ॥ मायेकरितां कोणी एक । अन्वय आणि व्यतिरेक । ते माया नसतां विवेक । कैसा करावा ॥ ३२ ॥ तत्त्वें तत्त्व शोधावें । महावाक्यीं प्रवेशावें । आत्मनिवेदनें पावावें । समाधान ॥ ३३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके करंटपरीक्षानिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. उत्तम पुरुष. श्रीगणेशाय नमः ॥ नाना वस्त्रे नाना भूषणें । येणें शरीर शृंगारणे । विवेकें विचारें राजकारणें । अंतर शृंगारिजे ॥ १ ॥ शरीर सुंदर सतेज । वस्त्रे भूषणें केलें सज्ज । अंतरीं नसतां चातुर्यबीज । कदापि शोभा न पा- १. हाल भोगतात. २. ढोंगास. ३. कष्टी. ४. शब्दातीत ब्रम्हाचें. ५. भ्रम, गोंधळ. ६. निरास पावणारी. ७. ब्रह्माचे ठिकाणीं. ८. हा समास शिवाजी महाराजांस अनुलक्षून लिहिला आहे.

विजे ॥ २ ॥ तुंदे¹ हेकेंड² कठोरवचनी । अखंड बोले साभिमानीं । न्याय नीति अंतःकरणीं । घेणार नाहीं ॥ ३ ॥ तऱ्हेई³ शीघ्रकोपी सदा । कदापि न धरी मर्यादा । राजकारण संवादा । मिळोंच नेणे ॥ ४ ॥ ऐसे लोंद⁴ बेह्- मानी । कदापि सत्य नाहीं वचनीं । पापी अपस्मार⁵ जनीं । राक्षस जाणावे ॥ ५ ॥ समयासारिखा समय येइना । नेम सहसा चालेना । नेम धरितां राजकारणा । अंतर पडे ॥ ६ ॥ अति सर्वत्र वर्जावें । प्रसंग पाहून चालावें । हटनिय्रहीं न पडावें । विवेकी पुरुषें ॥ ७ ॥ बहुतचि करितां हट । तेथें ये- ऊन पडले तट । कोणी एकाचा शेवट । झाला पाहिजे ॥ ८ ॥ बरें ईश्वर आहे साभिमानी । विशेष तुळजा भवानी । परंतु विचार पाहोनी । कार्य करणें ॥ ९ ॥ अखंडचि सावधाना । बहुत काय करावी सूचना । परंतु कांहींएक अनुमाना । आणिले पाहिजे ॥ १० ॥ समर्थापाशीं बहुत जन । राहिला पाहिजे साभिमान । निश्चळ करूनियां मन । लोक असती ॥ ११ ॥ म्लेंच्छ दुर्जन उदंड । बहुतां दिवसांचें माजलें बंड । याकारणें अखंड । सा- वधान असावें ॥ १२ ॥ सकळ कर्ता तो ईश्वर । तेणें केला अंगिकार । तया पुरुषाचा विचार । विरळा जाणे ॥ १३ ॥ न्याय नीति विवेक विचार । नाना प्रसंग प्रकार । परीक्षणें परांतर । देणें ईश्वराचें ॥ १४ ॥ महायत्न सावधपणें । समयीं धारिष्ट धरणें । अद्भुतचि कार्य करणें । देणें ईश्वराचें ॥ १५ ॥ यश कीर्ति प्रताप महिमा । उत्तम गुणांसि नाहीं सीमा । नाहीं दुसरी उपमा । देणें ईश्वराचें ॥ १६ ॥ देव ब्राह्मण आचार विचार । कितीक जनांस आधार । सदा घडे परोपकार । देणें ईश्वराचें ॥ १७ ॥ इहलोक प- रलोक पाहणें । अखंड सावधपणें राहणें । बहुत जनांचें साहणें । देणें ईश्वराचें ॥ १८ ॥ देवाचा कैपक्ष⁶ घेणें । ब्राह्मणाची चिंता वाहणें । बहुत जनांस पाळणें । देणें ईश्वराचें ॥ १९ ॥ धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अ- वतार । झाले आहेत पुढें होणार । देणें ईश्वराचें ॥ २० ॥ उत्तम गुणांचा ग्राहक । तर्क तीक्ष्ण विवेक । धर्मस्थापना पुण्यश्लोकें⁷ । देणें ईश्वराचें ॥ २१ ॥ सकळ गुणांमध्यें सार । तजबिजा विवेक विचार । जेणें पाविजे पैलपार । १. मस्त. २. एककल्ली. ३. तऱ्हेवाईक. ४. दांडगे. ५. दुःखदायक. ६. कैवार. ७. पुण्यकारक कीर्ति.

३९२ श्रीदासबोध. [ दशक अरंत्रपरत्रांचा ॥ २२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके उ- त्तमपुरुषनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. जनस्वभाव. श्रीगणेशाय नमः ॥ जनाचा लालुची स्वभाव । आरंभींच म्हणती देव । म्हणजे मजला कांहीं देईल देव । ऐसी वासना ॥ १ ॥ कांहींच भक्ति केली नसतां । आणि इच्छिती प्रसन्नता । जैसें कांहींच सेवा न करितां । स्वा- मीस मागती ॥ २ ॥ कष्टेंविण फळ नाहीं । कष्टेंविण राज्य नाहीं । केल्या- विण होत नाहीं । साध्य जनीं ॥ ३ ॥ आळसें काम नासतें । हें तों प्रत्य- यास येतें । कष्टाकडे चुकवितें । हीन जन ॥ ४ ॥ आधीं कष्टाचें दुःख सो- सिती । ते सुखाचें फळ भोगिती । आधीं आळसें सुखावती । त्यांसि पुढें दुःख ॥ ५ ॥ इहलोक अथवा परलोक । दोहींकडे सारखाच विवेक । दीर्घ- सूचनेचें कौतुक । कळलें पाहिजे ॥ ६ ॥ मेळविती तितुकें भक्षिती । ते क- ठिण काळीं मरोन जाती । दीर्घसूचनेनें वर्तती । तेचि भले ॥ ७॥ इहलोकींचा संचितार्थ । परलोकींचा परमार्थ । संचितेंविण व्यर्थ । जितेचि मेले ॥ ८ ॥ एकदां मेल्यानें सुटेना । पुनः जन्मोजन्मीं यातना । आपणास मारी वांच- वीना । तो आत्महत्यारा ॥ ९ ॥ प्रतिजन्मीं आत्मघात । कोणीं करावें गणित । या कारणें जन्म मृत्यु । केवीं चुके ॥ १० ॥ देव सकळ कांहीं करि- तो । ऐसें प्राणिमात्र बोलतो । याचे भेटीचा लाभ तो । अकस्मात् झाला ॥ ११ विवेकाचा लाभ घडे । जेणें परमात्मा ठायीं पडे । विवेक पाहतां सांपडे । विवेकी जनीं ॥ १२ ॥ देव पाहतां आहे एक । परंतु करितो अ- नेक । त्या अनेकांस ऐक । म्हणों नये कीं ॥ १३ ॥ देवाचें कर्तृत्व आणि देव । कळला पाहिजे अभिप्राय । कळल्याविण कित्येक जीव । उगेच बोल- ती ॥ १४ ॥ उगेच बोलती मूर्खपणें । शहाणपण वाढवावयाकारणें । तृप्ती- लागीं उपाव करणें । ऐसें झालें ॥ १५ ॥ जिहीं उदंड कष्ट केले । ते भाग्य भोगून गेले । येर ते बोलतचि राहिले । करंटे जन ॥ १६ ॥ करंठ्याचें क- रंटलक्षण । समजोन जाती विचक्षण । भल्याचें उत्तम लक्षण । करंट्यास १. इहपरलोकीं. २. दूरदृष्टीचें. ३. देव. ४. चतुर.

१८ वा.] अंतर्देव. ३९३ कळेना ॥ १७ ॥ त्याची पैसावली कुबुद्धी । तेथें कैंची असेल शुद्धी । कुबुद्धी तेचि सुबुद्धी । ऐसी वाटे ॥ १८ ॥ मनुष्यें बुद्धीस सांडावें । त्याचें काय खरें मानावें । तेथें विचाराच्या नांवें । शून्याकार ॥ १९ ॥ विचारें इहलोक परलोक । विचारें होतसे सार्थक । विचारें नित्यानित्य विवेक । पाहिला पाहिजे ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके जनस्वभावनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥ ८. अंतर्देव. श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म निराकार निश्चळ । आत्मा सविकार चंचळ । तयास म्हणती सकळ । देव ऐसें ॥ १ ॥ देवाचा ठावचि लागेना । एक देव नेमस्त कळेना । बहुत देवीं अनुमानेना । एक देव ॥ २ ॥ म्हणोनि विचार असावा । विचारें देव शोधावा । बहुत देवांचा गोथा । पडोंच नये ॥ ३ ॥ देव क्षेत्रीं पाहिला । त्यासारिखा धातूचा केला । पृथ्वीमध्यें दंडक चालिला । येणें रीती ॥ ४ ॥ नाना प्रतिमादेवांचें मूळ । तो हा क्षेत्रदेवचि केवळ । नाना क्षेत्रें भूमंडळ । शोधून पाहावें ॥ ५ ॥ क्षेत्रदेव पाषाणाचा । विचार पाहतां तयाचा । तंत लागला मुळाचा । अवतारांकडे ॥ ६ ॥ अवतारी देव संपले । देह धरून वर्तों लागले । त्याहून थोर अनुमानले । ब्रह्मा विष्णु महेश ॥ ७ ॥ त्या तिन्ही देवांस ज्याची सत्ता । तो अंतरात्माचि पाहतां । कर्ता भोक्ता तत्वतां । प्रत्यक्ष आहे ॥ ८ ॥ युगानुयुगें तिन्ही लोक । एक- ला चालवी अनेक । हा निश्चयाचा विवेक । वेदशास्त्रीं पाहावा ॥ ९ ॥ आत्मा वर्तवितो शरीर । तोचि देव उत्तरोत्तर । जाणीवरूपें कलेवर । विवेकें वर्तवी ॥ १० ॥ तो अंतर्देव चुकती । धांवा घेऊन तीर्थां जाती । प्राणी बापुडे कष्टती । देवास नेणतां ॥ ११ ॥ मग विचारिती अंतःकरणीं । जेथें तेथें धोंडा पाणी । उगेंच वणवण हिंडोनी । काय होतें ॥ १२ ॥ ऐसा ज्यासि विचार कळला । तेणें सत्संग धरिला । सत्संगें देव सांपडला । बहुत जनांसी ॥ १३ ॥ ऐशीं हीं विवेकाचीं कामें । विवेकी जाणतील नेमें । अवि- वेकी भुलले भ्रमें । त्यांस हें कळेना ॥ १४ ॥ अंतरवेधी अंतर जाणे । बाहेर- १. घोटाळा. २. परिपाठ. ३. शरीर. ४. अंतर्निष्ठ. ५. बहिर्मुख.

३९४ श्रीदासबोध. [ दशक सुद्धा कांहींच नेणे । म्हणोनि विवेकी शहाणे । अंतर शोधिती ॥ १५॥ विवेका- विणें जो भाव । तो भावचि अभाव । मूर्खास प्रतिमादेव । ऐसें वचन ॥ १६ ॥ पाहत समजत शेवटास गेला । तोचि विवेकी म्हणावा भला । तत्त्वें सांडूनि पावला । निरंजनीं १ ॥ १७ ॥ येर जें आकारासि येतें । तें अव- घें नासोन जातें । मग गलबल्या वेगळें तें । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥ चंचळ देव निश्चळ ब्रह्म । परब्रह्मीं नाहीं भ्रम । प्रत्ययज्ञानें निष्भ्रम । होइजेतें ॥ १९ ॥ प्रचीतीविण जें केलें । तें अवघें व्यर्थ गेलें । प्राणी कष्टकष्टेंचि मेले । कर्मेकचाटें ॥ २० ॥ कर्मावेगळें न व्हावें । तरी देवास कासया भजावें । विवेकी जाणती स्वभावें । मूर्ख नेणे ॥ २१ ॥ कांहीं अनुमानलें विचारें । देव आहे जगदंतरें । सगुणाकरितां निर्धारें । निर्गुण पाविजे ॥ २२ ॥ सगुण पाहतां मुळास गेला । सहजचि निर्गुण पावला । संगत्यागें मोकळा झाला । वस्तुरूप ॥ २३ ॥ परमेश्वरीं अनुसंधान । लावितां होइजे पावन । मुख्य ज्ञानेंचि विज्ञान । पाविजेतें ॥ २४ ॥ ऐशीं हीं विवेकाचीं विवरणें । पाहावीं सुचित्त अंतःकरणें । नित्यानित्यविवेकश्रवणें । जगदुद्धार ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके अंतर्देवनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. निद्रा. श्रीगणेशाय नमः ॥ वंदूनियां आदिपुरुष । बोलों निद्रेचा विलास । निद्रा आलिया सावकाश । जाणार नाहीं ॥ १ ॥ निद्रेनें व्यापिली काया । आळस अंगमोडे जांभया । तेणें करितां बैसावया । धीर नाहीं ॥ २ ॥ कड- कडां जांभया येती । चटाचटां चुटक्या वाजती । डकडकां डुलक्या येती । सावकाश ॥ ३ ॥ एकाचे डोळे झांकती । एकाचे डोळे लागती । एक ते वचकून पाहती । चहूंकडे ॥ ४ ॥ एक उलथोन पडिले । तिहीं ब्रह्मविणे फोडिले । हुडकांचे तुकडे झाले । शुद्ध नाहीं ॥ ५ ॥ एक टेंकोन बैसले । तेथेंचि घोरों लागले । एक उताणे पसरले । सावकाश ॥ ६ ॥ कोणी सुर- कुंडी घालिती । कोणी कानवैंडे निजती । कोणी चक्रीं फिरती । चहूंकडे १. उपाधिशून्य ब्रह्मपदीं. २. एका जातीचे वाद्य, त्याचे. ३, कुशीवर.

१८ वा.] श्रोता-अवलक्षण. ३९५ ॥ ७ ॥ एक हात हालविती । एक पाय हालविती । एक दांत खाती । क- केरटें ॥ ८ ॥ एकांचीं वस्त्रें निघोन गेलीं । तीं नागवीं च लोळों लागलीं । एकांचीं मुंडाशीं गडबडलीं । चहूं कडे ॥ ९ ॥ एक निजलीं अस्ताव्यस्तें । एक दिसती जैशीं प्रेतें । दांत पसरोन जैशीं भूतें । वाईट दिसती ॥ १० ॥ एक वोसणतेचि उठिले । एक अंधारीं फिरों लागले । एक जाऊनि निजले । उकिरड्यावरी ॥ ११ ॥ एक मडकीं उतरती । एक भूमि चांचपती । एक उठोन वाटा लागती । भलतीकडे ॥ १२ ॥ एक प्राणी वोसणती । एक स्फुंदस्फुंदों रडती । एक खदखदां हांसती । सावकाश ॥ १३ ॥ एक हाका मारूं लागले । एक बोंबलत उठिले । एक वचकोन राहिले । आपुले ठायीं ॥ १४ ॥ एक क्षणक्षणां खुरडती । एक डोई खाजविती । एक कण्हों लागती । सावकाश ॥ १५॥ एकांच्या लाळा गळल्या । एकांच्या पिका सांडल्या । एकीं लघुशंका केल्या । सावकाश ॥ १६॥ एक राऊतें सोडिती । एक कर्पट डेंकर देती । एक खांकरून थुंकती । भलतीकडे ॥ १७ ॥ एक हगती एक ओकिती । एक खोकती एक शिंकती । एक ते पाणी मागती । निदसुरे ॥ १८ ॥ एक दुः- स्वप्नें निबुंजेले । एक सुस्वप्नें संतोषिले । एक ते गाढमूर्छी पडिले । सुषुप्ती- मध्यें ॥ १९ ॥ इकडे उजेडाया झालें । कोणीं पठन आरंभिलें । कोणीं प्रातः- स्मरामि आरंभिलें । हरिकीर्तन ॥ २० ॥ कोणीं आठविल्या ध्यानमूर्ती । कोणी एकांतीं जप करिती । कोणी पाठांतरें उजळिती । नाना प्रकारें ॥ २१॥ नाना विद्या नाना कळा । आपलालया शिकती सकळा । तान मान गायन- कळा । एक गाती ॥ २२ ॥ मागें निद्रा संपली । पुढें जागृती प्राप्त झाली । व्यवसायीं बुद्धि आपली । प्रेरित झाले ॥ २३॥ ज्ञाता तत्त्वें सांडून पळाला । तुरियेपलीकडे गेला । आत्मनिवेदनें झाला । ब्रह्मरूप ॥ २४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके निद्रानिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥ १०. श्रोता-अवलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ कोणी एक कार्याचा साक्षेपं । कांहीं तरी वडे विक्षेप । १. घाबरून. २. अपान वायु. ३. भ्याले. ४. महत्तत्त्व वगैरे. ५. प्रयत्न.

३९६ श्रीदासबोध. [ दशक काळसाह्य तें आपेंआप । होत जातें ॥ १ ॥ कार्यभाग होत चालिला । तेणें प्राणी सुखी झाला । विचारहि सुचों लागला । दिवसेंदिवस ॥ २ ॥ कोणी एक प्राणी जन्मास येतो । कांहीं तरी काळ साह्य होतो । दुःखा- उपरी सुख देतो । देव कृपाळूपणें ॥ ३ ॥ अवघाचि काळ जरी साजे । तरी अवघेच होती राजे । कांहीं साजे कांहीं न साजे । ऐसें आहे ॥ ४ ॥ इह- लोक आणि परलोक । साधतां कोणी एक विवेक । अद्भुत होय स्वाभा- विक । देणें ईश्वराचें ॥ ५ ॥ ऐकिल्याविण कळलें । शिकविल्याविण शाहाण- पण आलें । हें देखिलें ना ऐकिलें । भूमंडळीं ॥ ६ ॥ सकळ कांहीं ऐकतां कळे । कळतां कळतां वृत्ति निवळे । नेमस्त मध्यें आकळे । सारासार ॥ ७ ॥ श्रवण म्हणिजे ऐकावें । मनन म्हणिजे मनीं धरावें । येणें उपायें स्वभावें । त्रैलोक्य चाले ॥ ८ ॥ श्रवणाआड विक्षेप येती । नानाजिन्नस सांगों किती । सावध असतां प्रत्यय येती । सकळ कांहीं ॥ ९ ॥ श्रवणीं लोक बैसले । बोलतां बोलतां एकाग्र झाले । त्या उपरी जे नूतन आले । ते एकाग्र न होती ॥ १० ॥ मनुष्य बाहेर हिंडून आलें । नाना प्रकारांचें ऐकिलें । उदंड गलबलूं लागलें । उगें असेना ॥ ११ ॥ प्रसंग पाहोन चालती । ऐसे लोक थोडे असती । श्रवणीं नाना विक्षेप होती । ते हे ऐका ॥ १२ ॥ श्रवणीं बैसले ऐकाया । अडों लागलीसे काया । येती कडकडा जांभया । निद्राभरें ॥ १३ ॥ बैसले सुचित्त करूनि मना । परी तें मनचि ऐकेना । मागें होतें ऐकिलें नाना । तेंचि धरून बैसलें ॥ १४ ॥ तत्पर केलें शरीर । परी मनामध्यें आणिक विचार । कल्पना कहिपते विस्तार । किती म्हणोन सांगावा ॥ १५ ॥ जें जें कांहीं श्रवणीं पडलें । तितुकें समजोन विवरलें । तरीच कांहीं सार्थक झालें । निरूपणीं ॥ १६ ॥ मन दिसतें मा धरावें । ज्याचें त्याणें आव- रावँ । आवरून विवेकें धरावें । अर्थांतरीं ॥ १७ ॥ निरूपणीं येऊन बै- सला । परी तो उदंड जेवून आला । बैसतांचि कासावीस झाला । तृषा- क्रांत ॥ १८ ॥ आधीं उदक आणिविलें । घळघळां उदंड घेतलें । तेणें मळ- मळों लागलें । उठोनि गेला ॥ १९ ॥ कर्पट ढेंकर उचक्या देती । वारा सरतां मोठी फजिती । क्षणक्षणां उठोन जाती । लघुशंकेसी ॥ २० ॥ दि- सेनें कासावीस केला । अवघें सांडून धांवला । निरूपणप्रसंग निघोन गेला ।

१८ वा. ] श्रोता-अवलक्षण. ३९७ अखंड ऐसा ॥ २१ ॥ दृष्टांतीं कांहीं अपूर्व आलें । अंतःकरण तेथेंचि रा- हिलें । कोठवरी काय वाचिलें । कांहीं कळेना ॥ २२ ॥ निरूपणीं येऊन बैसला । तों विंचवें फणकाविला । कैचें निरूपण झाला । कासावीस ॥ २३ ॥ पोटामध्यें तिडीक उठली । पाठीमध्यें करकें भरलीं<sup></sup> । चाळकें<sup></sup> चिकुल्याँ पुळी झाली । बैसवेना ॥ २४ ॥ पिसोळाँ चावून पळाला । तेणें प्राणी दुश्चित झाला । कोणे नेटें गलबला केला । तेथेंचि धांवे ॥ २५ ॥ विषयी लोक श्रवणीं येती । ते बायकांकडेच पाहती । चोरटे लोक चोरून जाती । पादरक्षां ॥ २६ ॥ होय नव्हे वाद विवाद । तेणें उदंड झाला खेद । शिष्या गाळी अप्रमाद । होतां चुकला ॥ २७ ॥ कोणी निरूपणीं बैसती । सावकाश गोष्टी लाविती । हरिदास रें रें करिती । पोटासाठीं ॥२८॥ बहुत जा- णते मिळाले । एकापुढें एक बोले । लोकांचे आश्चर्य राहिले । कोण जाणे॥२९॥ माझें होय तुझें नव्हे । ऐशी अखंड जनां सवे । न्यायनीति सांडूनि धांवे । अन्यायाकडे ॥ ३० ॥ आपल्या थोरपणासाठीं । अचावचा तोंड पिटी । न्याय नाहीं तें शेवटीं । परम अन्यायी ॥ ३१ ॥ एकीकडे अभिमान उठे । दुसरीकडे उदंड पेटे । ऐसे श्रोते खरे खोटे । कोण जाणे ॥ ३२ ॥ म्हणोनि जाणते विचक्षण । ते आधींच धरती नेणपण । मूर्ख टोणपा आपण । कां- हींच नाहीं ॥ ३३ ॥ आपणासून देव थोर । ऐसा जयास कळला विचार । सकळ कांहीं जगदंतर । तेंचि राखावें ॥ ३४ ॥ सभेमध्यें कल्होळ झाला । शब्द येतो जाणत्याला । अंतरें राखो नाहीं शिकला । कैसा योगी ॥ ३५ ॥ अखंड आपणास सांभाळिती । क्षुल्लकपण येऊं न देती । थोर लोकांस क्षमा शांती । अगत्य करणें ॥ ३६ ॥ वैर करितां वैरचि वाढे । आपणास दुःख भोगणें घडे । म्हणोनि शाहाण्याचें कुर्डे<sup></sup> । कळों आलें ॥ ३७ ॥ अवगुणापाशीं बैसला गुणी । अवगुण कळतो तत्क्षणीं । विवेकी पुरुषाची करणी । विवेकें होते ॥३८॥ उपाय पर्याय दीर्घ प्रयत्न । विवेकबळें नाना यत्न । करील तयाचें महिमान । तोचि जाणे ॥ ३९ ॥ दुर्जनीं वेढवेढोनि घेतला । बाष्कळ लोकीं घसरिला । विवेकापासून च्येव- १ लचक. २. चाळकवाऊ. ३. चिखलापासून पायांच्या बोटांस फोड येतात ते. ४. जोडे, वाहणा. ५. मनांतील अभिप्राय. ६. कोडें, मर्म.

३९८ श्रीदासबोध. [ दशक ला । विवेकी कैसा ॥ ४० ॥ न्याय पर्याय उपाय । मूर्खास हें कळे काय । मूर्खाकरितां चिवडा होय । मजालसींचा ॥ ४१ ॥ मग ते शाहणे नीट करिती । स्वयें साहोनि साहविती । स्वयें करून करविती । लोकांकरवीं ॥ ४२ ॥ पृथ्वीमध्यें उदंड जन । जनांमध्येंचि असती सज्जन । जयांकरितां समाधान । प्राणिमात्रांसी ॥ ४३ ॥ तो मनोगतांचीं अंगें जाणे । नाना प्रसंग समय जाणे । संतसालागीं निववूं जाणे । नानाप्रकारें ॥ ४४ ॥ ऐसा तो जाणता लोक । समर्थ तयाचा विवेक । त्याचें करणें कांहींएक । जनास कळेना ॥ ४५ ॥ बहुत जनांस चाळवी । नाना मंडळी हालवी । ऐसी हे समर्थ पदवी । विवेकें होते ॥ ४६ ॥ विवेक एकांतीं करावा । जगदीश- धारणेनें करावा । लोक आपला आणि परावा । म्हणोंचि नये ॥ ४७ ॥ एकांतीं विवेक ठायीं पडे । एकांतीं यत्न सांपडे । एकांतीं तर्क वावंडे । ब्रह्मांडगोळीं ॥ ४८ ॥ एकांतीं स्मरण करावें । चुकलें निधान पडे ठावें । अंतरात्म्यासरिसें फिरावें । कांहीं तरी ॥ ४९ ॥ जयास एकांत मानला । अवघ्या आधीं कळे त्याला । त्या वेगळा वडीलपणाला । ठावाचि नाहीं ॥५०॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके श्रोता-अवलक्षणनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी २८८. दशक एकोणिसावा. १. लेखनक्रिया. श्रीगणेशाय नमः ॥ ब्राह्मणें बाळबोध अक्षर । घडसूनै करावें सुंदर । जें देखतांचि चतुर । समाधान पावती ॥ १ ॥ वाटोळें सरळ मोकळें । वोतलें मषीचें काळें । कुळकुळीत ओळी चालिल्या ढाळें । मुक्तामाळा जैशा ॥२॥ अक्षरमात्र तितुकें नीट । नेमस्त पैस काने नीट । आडव्या मात्रा त्याहि बीट । अर्कुलीं वेलांव्या ॥ ३ ॥ पहिलें अक्षर जें काढिलें । ग्रंथ संपे तों पाहात गेलें । एक टांकेंचि लिहिलें । ऐसें वाटे ॥ ४ ॥ अक्षरांचें काळेपण । १. समुदायाचा. २. चालतो. ३. वळवून. ४. शाईचें. ५. सहज. ६. रेफ.

१९ वा.] लेखनक्रिया. ३९९ टांकाचें ठोंसरपण । तैसेंचि लवण वांकण । सारिखेंचि ॥ ५ ॥ ओळीस ओळी लागेना । अर्कुलीं मात्रा भेदीना । खालींचे ओळीस स्पर्शेना । अथवा लंबाक्षर ॥ ६ ॥ पान शिशानें रेखाटावें । त्यावरी नेमेंचि लिहावें । दूर जवळी न व्हावें । अंतर ओळींचें ॥ ७ ॥ कोठें शोधासि आठलेना । चुकी पाहतां सांपडेना । गरज केली हें घडेना । लेखकापासुनी ॥ ८ ॥ ज्याचें वय आहे नूतन । त्यानें लिहावें जपून । जनासि पडे मोहन । ऐसें करावें ॥ ९ ॥ बहु बारीक तरुणपणीं । कामा न ये म्हातारपणीं । मध्यम लिहिण्याची करणी । केली पाहिजे ॥ १० ॥ भौवतें स्थळ सोडून द्यावें । मध्येंच चम- चमीत लिहावें । कागद झडतांहि झडावें । नलगोचि अक्षर ॥ ११ ॥ ऐसा ग्रंथ जपोन लिहावा । प्राणिमात्रास उपजे हेवा । ऐसा पुरुष पाहावा । म्हणती लोक ॥ १२ ॥ काया बहुत कष्टवावी । उत्कट कीर्ति उरवावी । चटक लावून सोडावी । कांहीं एक ॥ १३ ॥ घट्ट कागद आणावे । जपोन नेमस्त खळौवे । लिहिण्याचे सांमे असावे । नानापरी ॥ १४ ॥ सुऱ्या १ कातऱ्या जागाईत । खळी घोटाळी तागाईत । नाना सुरंगमिश्रित । जाणोनि घ्यावे ॥ १५ ॥ नाना देशींचे बोरू आणावे । घट्ट बारीकसर घ्यावे । नाना रंगांचे आणावे । नानाजिनसी ॥ १६ ॥ नानाजिनसी टांक- तोडणी । नाना प्रकारें रेखाटणी । चित्र विचित्र करणी । सिसेंलोळ्या ॥ १७ ॥ हिंगूळ संग्रहीं असावे । वाळले आँलींतें पाहोनि घ्यावे । सोपे भिजवून वाळवावे । संग्रह मैषीचे ॥ १८ ॥ तगंटीं इतिश्रीयौ कराव्या । बंदरी फळ्या घोटाव्या । नाना चित्रीं चिताराव्या । उंच चित्रे ॥१९॥ नानार गोफ नाना वासैनें । मेणकापडें सिंदूरवर्णं । पेट्या कुलपें जपणें । पुस्तका- कारणें ॥ २० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके लेखन- क्रियानिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ १. तुरटीचे पाण्यांत भिजवून वाळवावे. २. सामान. ३. समास-फळी. ४. तुरटी. ५. घोटकवडा. ६. कागद चिकट करण्याचें सामान. ७. अलिता. ८. शाईचें. ९. शेवटीं. १०. 'इति श्री...' इत्यादि ग्रंथसमाप्तिसूचक शब्द. ११. वेष्टनें.

४०० श्रीदासबोध. [ दशक २. विवरण. श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिले लेखनभेद । आतां ऐका अर्थभेद । नाना प्रकारांचे संवाद । समजोन पाहावे ॥ १ ॥ शब्दभेद अर्थभेद । मुद्राभेद प्रबंधभेद । नाना शब्दांचे शब्दभेद । जाणोनि घ्यावे ॥ २ ॥ नाना आशंका प्रत्युत्तरें । नाना प्रतीत साक्षात्कारें । जेणेंकरितां जगदंतरें । चमत्कारती ॥ ३ ॥ नाना पूर्वपक्ष सिद्धांत । प्रत्यय पाहावा नेमस्त । अनुमानाचें अस्ता- व्यस्त । बोलोंच नये ॥ ४ ॥ प्रवृत्ति अथवा निवृत्ति । प्रचीतीविण अवघी भ्रांती । गळ्यामधील जगज्योती । चेतेल कोठें ॥ ५ ॥ हेतु समजोन उत्तर देणें । दुसऱ्याचे जीवींचें समजणें । मुख्य चातुर्याचीं लक्षणें । तीं हीं ऐसीं ॥ ६ ॥ चातुर्याविण खटपट । ते विद्याचि फळकूट । सभेमध्यें आट- वांट । समाधान कैंचें ॥ ७ ॥ बहुत बोलणें ऐकावें । तेथें मौनचि धरावें । अल्पचिन्हें समजावें । जगदंतर ॥ ८ ॥ बाष्कळामध्यें बैसों नये । उद्धटासि तंडों नये । आपणाकरितां खंडों नये । समाधान जनाचें ॥ ९ ॥ नेणपण सोडूं नये । जाणपणें फुगों नये । नाना जनांचें हृदय । मृदुशब्दें उकलावें ॥ १० ॥ प्रसंग जाणावा नेटका । बहुतांसि जाजूं घेऊं नका । खरें अस- तांचि नासका । फड होतो ॥ ११ ॥ शोध घेतां आळसों नये । भ्रष्ट- लोकीं बैसों नये । बैसलें तरी टाकूं नये । मिथ्या दोष ॥ १२ ॥ अंतर आर्ताचें शोधावें । प्रसंगीं थोडेंचि वाचावें । चटक लावून सोडावें । भल्या मनुष्यासी ॥ १३ ॥ मजालसींत बैसों नये । समाराधनेसि जाऊं नये । जातां येळिळेंवाणें होय । जिणें आपुलें ॥ १४ ॥ उत्तम गुण प्रगटवावे । मग भल्यासि बोलतां फावे । भले पाहोन करावे । शोधून मित्र ॥ १५ ॥ उपासनेसारिखें बोलावें । सर्व जन तोषवावे । सगट बरेपण राखावें । कोणी एकासी ॥ १६ ॥ ठायीं ठायीं शोध घ्यावा । मग ग्रामीं प्रवेश करावा । प्राणिमात्र ओळखावा । आसपणें ॥ १७ ॥ उंच नीच म्हणों नये । सकळांचें निववावें हृदय । अस्तमानीं जाऊं नये । कोठें तरी ॥ १८ ॥ जगामध्यें जगमित्र । जिव्हेपाशीं असे सूत्र । कोठें तरी स- १. लोकांचीं मनें. २. प्रपंच. ३. परमार्थ. ४. जगदंतर. ५. व्यर्थ. ६. भ्रम. ७. तक्रार. ८. आळ. ९. रिकाम्या लोकांत. १०. पराधीन.

१९ वा.] करंटलक्षण. ४०१ स्पात्र । शोधून काढावें ॥ १९ ॥ कथा होती तेथें जावें । दूर दीनासारिखें बैसावें । तेथील सकळ होंदं घ्यावें । अंतर्यामीं ॥२०॥ तेथें भले आढळती । व्यापके तेहि कळों येती । हळू हळू मंदगती । रीघ करावी ॥ २१ ॥ सक- ळांमध्यें विशेष श्रवण । श्रवणाहून थोर मनन । मननें होय समाधान । बहुत जनांचें ॥ २२॥ धूर्तपणें सकळ जाणावें । अंतरीं अंतर बाणावें । समज- ल्याविण शिणावें । कासयासी ॥ २३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके विवरणनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥

३. करंटलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ सुचित्त करुनि अंतःकरण । ऐका करंटलक्षण । हें त्यागितां सदैव-लक्षण । अंगीं बाणे ॥ १ ॥ पापाकरितां दारिद्र प्राप्त । दरिद्रें होय पाप संचित । ऐसेंचि होत जात । क्षणक्षणां ॥२॥ या कारणें करंट- लक्षणें । ऐकोनि त्यागचि करणें । म्हणजे कांहींएक बाणे । सदैव लक्षण ॥३॥ क- रंटास आळस आवडे । यत्न कदापि नावडे । त्याची वासना वावडे । अ- धर्मी सदा ॥४॥ सदा भ्रमिष्ट निदसुरा । उगौंचि बोले सैरावेरा । कोणी एका- च्या अंतरा । मानेचिना ॥ ५ ॥ लिहों नेणे वाचूं नेणे । सवदासूत घेऊं नेणे । हिशेब कित्येक राखौं नेणे । धौरणा नाहीं ॥ ६ ॥ हारवी सांडी पाडी फोडी । विसरे चुके नाना खोडी । भल्याचे संगतीची आवडी । कदापि नाहीं ॥ ७ ॥ चाट गडी मेळविले । कुकर्मी मित्र केले । खटनट एकवटिले । चोरटे पापी ॥ ८ ॥ ज्यासि त्यासि कळकटा । स्वयें सदाचा चोरटा । पर- घातकी धीट मोठा । वाटा पाडी ॥ ९ ॥ दीर्घसूचना सुचेचि ना । न्याय नीति हे रुचेचि ना । पराभिलाषवासना । निरंतर ॥ १० ॥ आळसें शरीर पाळिल । परंतु पोटाविण गेलें । सुडकें मिलेनालें झालें । पांघरायासि ॥ ११॥ आळसें शरीर पिळी । अखंड कुशी कोंडोळी । निद्रेचे पाडी सुकाळीं । आपणासी ॥ १२ ॥ जनासि मैत्री करीना । कठिण शब्द बोले नाना । मूर्ख- पणें आवरेना । कोणी एकासी ॥ १३ ॥ पवित्र लोकांमध्ये भिडावे । वोंग- ळांमध्यें निःशंक धावे । सदा मनापासून भावे । जननिंद्य क्रिया ॥ १४ ॥

१. अभिप्राय. २. उद्योगी. ३. दैववान. ४. बुद्धि. ५. खाजवी. ६. आवडते.

४०२ श्रीदासबोध. [ दशक तेथें कैंचा परोपकार । केला बहुतांचा संहार । पापी अनर्थी अपस्मार । सर्व अबुंद्धी ॥ १५ ॥ शब्द सांभाळून बोलेना । आवरितां आवरेना । कोणी एकासीं मानेना । बोलणें त्याचें ॥ १६ ॥ कोणी एकासी विश्वास नाहीं । कोणी एकासी सख्य नाहीं । विद्या वैभव कांहींच नाहीं । उगाचि ताठा ॥ १७ ॥ राखावी बहुतांचीं अंतरें । भाग्य येतें तदनंतरें । ऐशीं विवेकाचीं उत्तरें । ऐकणार नाहीं ॥ १८ ॥ स्वयें आपणास कळेना । शिकविलें तें ऐकेना । तयास उपाय नाना । काय करिती ॥ १९ ॥ कल्पना करी उदंड कांहीं । प्राप्तव्य तें कांहींच नाहीं । अखंड पडिला संदेहीं । अनुमानाचे ॥ २० ॥ पुण्यमार्ग सांडिला मनें । पाप झडावें कशानें । निश्चय नाहीं अनुमानें । नाश केला ॥ २१ ॥ कांहीं एक पुरतें कळेना । सभेमध्यें बोलों राहेना । वा- ष्कळ लबाड ऐसें जनां । कळों आलें ॥ २२ ॥ कांहीं नेमकपण आपुलें । बहुत जनांसि कळों आलें । तेंचि मनुष्य मान्य झालें । भूमंडळीं ॥ २३ ॥ झिजल्यावांचूनि कीर्ति कैंची । मान्यता नव्हे कीं फुकाची । जिकडे तिकडे होते छी छी । अवलक्षणें ॥ २४ ॥ भल्यांची संगती धरीना । आपणास शा- हाणें करीना । तो आपला आपण वैरी जाणा । स्वहित नेणे ॥ २५ ॥ लो- कांसि बरें करावें । तें उसणें सर्वैचि घ्यावें । ऐसें जयाच्या जीवें । जाणिजेना ॥ २६ ॥ जेथें नाहीं उत्तम गुण । तें करंटपणाचें लक्षण । बहुतांसि न माने तें अवलक्षण । सहजाचि झालें ॥ २७ ॥ कार्याकारण सकळ कांहीं । कार्याविण तों कांहींच नाहीं । निकामीं तो दुःखप्रवाही । वाहतचि गेला ॥ २८ ॥ बहुतांसि मान्य थोडा । त्याच्या पापास नाहीं जोडा । निराश्रयीं पडे उघडा । जेथें तेथें ॥ २९ ॥ या कारणें अवगुण त्यागावे । उत्तम गुण समजोन घ्यावे । तेणें मनासारखें फावे । सकळ कांहीं ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके करंटलक्षणनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ———— ४. सदैवलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिलें करंटलक्षण । तें विवेकें सांडावें सं- पूर्ण । आतां ऐका सदैवलक्षण । सौख्यदायक ॥ १ ॥ उपजतगुण शरीरीं । परोपकारी नानापरी । आवडे सर्वांचे अंतरीं । सर्वकाळ ॥ २ ॥ सुंदर

१९ वा.] सदैवलक्षण. ४०३ अक्षर लिहों जाणे । चपळ शुद्ध वाचों जाणे । अर्थांतर सांगों जाणे । सकळ कांहीं ॥ ३ ॥ कोणाचें मनोगत तोडीना । भल्याची संगति सोडीना । सदैवलक्षणें अनुमाना । आणूनि ठेवी ॥ ४ ॥ तो सकळ जनांसि व्हावा । जेथें तेथें नित्य नवा । मूर्खपणें अनुमानगोवा । कांहींच नाहीं ॥ ५ ॥ नाना उत्तमगुण सत्पात्र । तोचि मनुष्य जगमित्र । प्रगटकीर्ति स्वतंत्र । पराधीन नाहीं ॥ ६ ॥ राखे सकळांचें अंतर । उदंड करी पाठांतर । नेमस्तपणाचा विसर । पडणार नाहीं ॥ ७ ॥ नम्रपणें पुसों जाणे । नेमस्त अर्थ सांगों जाणे । बोला ऐसें वर्तों जाणे । उत्तम क्रिया ॥ ८ ॥ जो मानला बहुतांसी । कोणी बोलों न शके त्यासी । धगधगीत पुण्यराशी । महापुरुष ॥ ९ ॥ तो परोपकार करीतचि गेला । पाहिजे तो ज्याला त्याला । मग काय उणें त्याला । भूमंडळीं ॥ १० ॥ बहुत जन वासे पाहे । वेळेसि तात्काळ उभा राहे । उणें कोणाचें न साहे । तया पुरुषासी ॥ ११ ॥ चौदा विद्या चौसष्ट कळा । जाणे संगीत गायनकळा । आत्मविद्येचा जिव्हाळा । उदंड तेथें ॥ १२ ॥ सकळांसि नम्र बोलणें । मनोगत राखोन चालणें । अखंड कोणी एकाचें उणें । पडोंचि नेदी ॥ १३ ॥ न्याय नीति भजन मर्यादा । काळ- सार्थक करी सदा । दरिद्रपणाची आपदा । तेथें कैची ॥ १४ ॥ उत्तम गुणें शृंगारिला । तो बहुतांमध्ये शोभला । प्रगट प्रतापें उगवला । मार्तंड जैसा ॥ १५ ॥ जाणता पुरुष असेल जेथें । कलह कैंचा उठेल तेथें । उत्तम गुणा- विषयीं रिते । ते प्राणी करंटे ॥ १६ ॥ प्रपंचीं जाणे राजकारण । परमार्थीं साकल्यविवरण । सर्वांमध्ये उत्तम गुण । त्याचा भोक्ता ॥ १७ ॥ मागें एक पुढें एक । ऐसा कदापि नाहीं दंफेक । सर्वत्रांसि अलोकिक । तया पुरु- षाची ॥ १८ ॥ अंतरासि लागेल ढका । ऐशी वर्तणुक करूं नका । जेथें तेथें विवेका । प्रगट करी ॥ १९ ॥ कर्मविधि उपासनाविधी । ज्ञानविधि वै- राग्यविधी । विशालशवक्तृत्वाची बुद्धी । चलेल कैसी ॥ २० ॥ पाहतां अवघे उत्तम गुण । तयास वाईट म्हणेल कोण । जैसा आत्मा संपूर्ण । सर्वां घटीं ॥ २१ ॥ आपल्या कार्यास तत्पर । लोक असती लहान थोर । तैसाचि करी परोपकार । मनापासूनी ॥ २२ ॥ दुसऱ्याच्या दुःखें दुखावे । दुस- १. वाट पाहे. २. सूर्य. ३. परब्रम्हाचा विचार ४. वागणूक.

४०४ श्रीदासबोध. [ दशक प्याच्या सुखें सुखावे । अवघेचि सुखी असावे । ऐसी वासना ॥ २३ ॥ उ- दंड मुलें नानापरी । वडिलांचें मन अवघ्यांवरी । तैशी अवघ्यांची चिंता करी । महापुरुष ॥ २४ ॥ जयास कोणाचें सोसेना । तयाची निष्किंचन वासना । धिक्कारितां धिकारेना । तोचि महापुरुष ॥ २५ ॥ मिथ्या श- रीर निंदिलें । तरी याचें काय गेलें । झाल्यास आणि जिंकिलेँ । देहबुद्धीनें ॥ २६ ॥ हैं तों अवघें अवलक्षण । ज्ञाता देहीं विलक्षण । कांहीं तरी उ- त्तमगुण । जनीं दाखवावे ॥ २७ ॥ उत्तम गुणास मनुष्य वेधे । वाईट गु- णास प्राणी खेदे । तीक्ष्णबुद्धि लोक साधे । काय जाणती ॥ २८ ॥ लोकीं अत्यंत क्षमा करिती । आलिया लोकांचे प्रचीती । मग ते लोक पाठी रा- खिती । नाना प्रकार्री ॥ २९॥ बहुतांसि वाटे मी थोर । सर्वमान्य पाहिजे विचार । धीर उदार गंभीर । महापुरुष ॥ ३० ॥ जितुके कांहीं उत्तम गुण । तैं समर्थांचें लक्षण । अवगुण तें करंटलक्षण । सहजचि झालें ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके सदैवलक्षणनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ ५. देहमान्य. श्रीगणेशाय नमः ॥ मातीचा देव धोंड्याचा देव । सोन्याचा देव रु- प्याचा देव । कांस्याचा देव पितळेचा देव । तांब्याचा देव चित्रलेप ॥ १ ॥ रुईच्या लांकडाचे पाँवळाचे देव । बाण तांदळे नर्मदेचे देव । शालग्राम काश्मीरदेव । सूर्यकांत सोमकांत ॥ २ ॥ ताम्रनाणीं हेमेंनाणीं । कोणी पू- जिती देवतार्चनीं । चक्रांकित चक्रतीर्थांहूनी । घेऊनि येती ॥ ३ ॥ उदंड उपासनेचे भेद । किती करावे विशद । आपलाले आवडीचा वेध । लागला जनीं ॥ ४ ॥ परी त्या सकळांचेंहि कारण । मुळीं पाहावें स्मरणं । तया स्मरणाचे अंश जाण । नाना दैवतें ॥ ५ ॥ मुळीं द्रष्टा देव तो एक । त्याचे झाले अनेक । समजोन पाहतां विवेक । उमजों लागे ॥ ६ ॥ देहावेगळी भक्ति फावेना । देहावेगळा देव पावेना । या कारणें मूळ भजना । देहचि आहे ॥ ७ ॥ देह मुळींच केला वाव । तरी भजनास कैचा ठाव । म्हणोनि भजनाचा उपाव । देहात्मयोगें ॥ ८ ॥ देहाविण देव कैसा भजावा । देहा- १. दरिद्री. २. निराळा. ३. सोन्याचीं नाणीं. ४. स्फूर्ति.

१९ वा.] देहमान्य. ४०५ विण देव कैसा पूजावा । देहाविण महोत्सव कैसा करावा । कोणत्या प्रकारें ॥ ९ ॥ अत्र गंध पत्र पुष्प । फल तांबूल धूप दीप । नाना भजनाचा सा- क्षेप । कोठें करावा ॥ १० ॥ देवाचें तीर्थ कैसें घ्यावें । देवासि गंध कोठें लावावें । मंत्रपुष्प तरी वाहावें । कोणे ठायीं ॥ ११ ॥ म्हणोनि देहाविण अडतें । अवघें सांकडेंचि पडतें । देहाकरितां घडतें । भजन कांहीं ॥ १२ ॥ देव देवता भूतें दैवतें । मुळींचें सामर्थ्य आहे तेथें । अधिकारें नाना दैवतें । भजत जावीं ॥ १३ ॥ नाना देवीं भजन केलें । तें मूळ पुरुषास पावलें । या कारणें सन्मानिलें । पाहिजे सकळ कांहीं ॥ १४ ॥ मायावल्ली फांपा- वली । नाना देहफळीं लगडली । मुळींची जाणीव कलों आली । फळामध्यें ॥ १५ ॥ म्हणोनि येकील न करावें । पाहावें तें येथेंचि पाहावें । ताळा प- डतां राहावें । समाधानें ॥ १६ ॥ प्राणी संसार टाकिती । देवास धुंडीत फिरती । नाना अनुमानीं पडती । जेथें तेथें ॥ १७ ॥ लोकांची पाहतां रीती । लोक देवतार्चनें करिती । अथवा क्षेत्रदेव पाहती । ठायीं ठायीं ॥ १८ ॥ अथवा नाना अवतार । ऐकोनि धरिती निर्धार । परी तें अवघें स- विस्तर । होऊनि गेलें ॥ १९ ॥ एक ब्रह्मा विष्णु महेश । ऐकोनि म्हणती हे विशेष । गुणातीत जो जगदीश । तो पाहिला पाहिजे ॥ २० ॥ देवास नाहीं स्थान मान । कोठें करावें भजन । हा विचार पाहतां अनुमान । होत जातो ॥ २१ ॥ नसतां देवाचें दर्शन । कैसेनि होइजे पावन । धन्य धन्य ते साधुजन । सकळ जाणती ॥ २२ ॥ भूमंडळीं देव नाना । त्यांची भीड उल्लंघेना । मुख्य देव तो कळेना । कांहीं केल्या ॥ २३ ॥ कर्तृत्व वेगळें करावें । मग त्या देवासि पाहावें । तरी कांहींएक पडे ठावें । गौप्य गुह्य ॥ २४ ॥ तें दिसेना ना भासेना । कल्पांतींहि नासेना । सुकृतावेगळें विश्वा- सेना । तेथें मन ॥ २५ ॥ उदंड कल्पिती कल्पना । उदंड इच्छिते वासना । अभ्यंतरींचे तरंग नाना । उदयार्ते पावती ॥ २६ ॥ म्हणोनि कल्पनार- हित । तेंचि वस्तु शाश्वत । अंत नाहीं म्हणोनि अनंत । बोलिजे तया ॥ २७ ॥ हें ज्ञानदृष्टीनें पाहावें । पाहोनि तेथेंचि राहावें । निजध्यासें तद्रूप व्हावें । संगत्यागें ॥ २८ ॥ नाना लीला नाना लाघवें । तें काय जाणिजे बापुड्या जीवें । संतसंगें स्वानुभवें । स्थिति बाणे ॥ २९ ॥ ऐसी सूक्ष्म

४०६ श्रीदासबोध. [ दशक स्थिति गती । कळतां चुके अधोगती । सद्गुरुवचनें सद्गती । तत्काळ होते ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके देहमान्य- निरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥

६. बुद्धिवाद. श्रीगणेशाय नमः ॥ परमार्था आणि विवेकी । त्याचें करणें माने लोकीं । कां जे विवराविवरों चुकी । पडोंच नेदी ॥ १ ॥ जो जो संदेह वाटे मना । तो तो कदापि करीना । आदि अंत अनुमाना । आणून सोडी ॥ २ ॥ स्वतां निस्पृह असेना । त्याचें बोलणेंचि मानेना । कठिण आहे जनार्दनां १ । राजी राखणें ॥ ३ ॥ कोणी दाटून उपदेश देती । कोणी मध्यवर्ती घालिती । ते सहजचि हळु पडती । लालुचीनें ॥ ४ ॥ जयास सांगावा विवेक । तो जा- णावा प्रतिकुंचकें २ । पुढें पुढें नाशक । कारभार होतो ॥ ५ ॥ भावास भाऊ उपदेश देती । पुढें पुढें होते फजिती । वोळखीच्या लोकांत महंती । मां- डूंचि नये ॥ ६ ॥ पहिले दिसे परी नासे । विवेकी मान्य करिती कैसे । अविवेकी ते जैसे तैसे । मिळती तेथें ॥ ७ ॥ भ्रतार शिष्य स्त्री गुरु । हा हि फटकळ विचारु । नाना भ्रष्टाकारी प्रकारु । तैसाचि आहे ॥ ८ ॥ प्रगट विवेक बोलेना । झांका तापा करी जना । मुख्य निश्चय अनुमाना । आ- णूंच नेदी ॥ ९ ॥ हुकीसारिसा भरीं भरे । विवेक सांगतां न धरे । दूर दृष्टीनें पुरे । साधु नव्हती ॥ १० ॥ कोणास कांहींच न मागावें । भगवद्भजन वाढवावें । विवेकबळें जन लावावे । भजनाकडे ॥ ११ ॥ परांतर रक्षायाचीं कामें । बहुत कठिण विवेकवर्मे । स्वइच्छेनें स्वधर्मे । लोकराहाटी ॥ १२ ॥ आपण तुरुक गुरु केला । शिष्यांचा भार मेळविला । नीच यातीनें नासला । समुदाय ॥ १३ ॥ ब्राह्मणमंडळ्या मेळवाव्या । भक्तमंडळ्या मानाव्या । संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ १४ ॥ उत्कृष्ट भव्य तेंचि घ्यावें । म- ळमळीत अवघेंचि टाकावें । निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं ॥ १५ ॥ अक्षर बरें वाचणें बरें । अर्थांतर सांगणें बरें । गाणें नाचणें अवघेंचि बरें । पाठांतर ॥ १६ ॥ दीक्षा बरी मैत्री बरी । तीक्ष्ण बुद्धि राजकारणीं बरी ।


१. सर्व जनांच्या अंतरात्म्यास. २. प्रतिकूळ,

१९ वा. ] यत्न. ४०७ आपणास राखे नाना परी । अलिप्तपणें ॥ १७ ॥ अखंड हरिकथेचा छंद । सकळांस लागे नामवेध । प्रगट जयाचा प्रबोध । सूर्य जैसा ॥ १८ ॥ दु- र्जनासि राखो जाणे । सज्जनासि निववूं जाणे । सकळांचे मनींचें जाणे । ज्याचें त्यापरी ॥ १९ ॥ संगतींचें मनुष्य पालटे । उत्तम गुण तात्काळ उठे । अखंड अभ्यासीं लगते । समुदाय ॥ २० ॥ जेथें तेथें नित्य नवा । जनासि वाटे हा असावा । परंतु लालुचेचा गोवा । पडोंच नेदी ॥ २१ ॥ उत्कृष्ट भक्ति उत्कृष्ट ज्ञान । उत्कृष्ट चातुर्य उत्कृष्ट भजन । उत्कृष्ट योग अ- नुष्ठान । ठायीं ठायीं ॥ २२ ॥ उत्कृष्ट निस्पृहता धरिली । त्याची कीर्ति दिगंतीं फांकली । उत्कृष्ट भक्तीनें निवाली । जनमंडळी ॥ २३ ॥ कांहीं- एक उत्कृष्टेविण । कीर्ति कदापि नव्हे जाण । उगेंच वणवण हिंडोन । काय होतें ॥ २४ ॥ नाहीं देहाचा भरंवसा । केव्हां सरेल वयसा । प्रसंग पडेल कैसा । कोण जाणे ॥ २५ ॥ या कारणें सावधान असावें । जितुकें होईल तितुकें करावें । भगवत्कीर्तीनें भरावें । भूमंडळ ॥ २६ ॥ आप- णास जें जें अनुकूल । तें तें करावें तात्काळ । होइना त्यांस निवळ । वि- वेक उमजवावा ॥ २७ ॥ विवेकामध्यें सांपडेना । ऐसें तों कांहींच असे- ना । एकांतीं विवेक अनुमाना । आणून सोडी ॥ २८ ॥ अखंड तजविजा चाळणा जेथें । पाहतां काय उणें तेथें । एकांताविणें प्राणियांतें । बुद्धि कैंची ॥ २९ ॥ एकांतीं विवेक करावा । आत्माराम ओळखावा । येथून तेथवरी गोवा । कांहींच नाहीं ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके बुद्धिवादनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. यत्न. श्रीगणेशाय नमः ॥ कथेंचें घमंडे भरून द्यावें । आपण निरूपणीं विव- रावें । उणें पडोंच न द्यावें । कोणीएक विषयीं ॥ १ ॥ भैंजणार खालीं प- डला । तो भजनारीं जाणिला । नेणतां लोक उगाच राहिला । टकमकां पाहात ॥ २ ॥ उत्तर विलंबीं पडिलें । श्रोतयांस कळों आलें । म्हणिजे महत्व उडालें । वक्त्याचें ॥ ३ ॥ थोडें बोलोन समाधान करणें । रागेजोन १. गर्दी उसळून द्यावी. २. उपदेश करणारा.

४०८ श्रीदासबोध. [ दशक

तरी मन धरणें । मनुष्य वेधों लावणें । कोणी एक ॥ ४ ॥ सोसवेना चिण- चिण केली । तेथें तामस वृत्ति दिसोन आली । अवघी आवडीच उडाली । श्रोत्यांची ॥ ५ ॥ कोण कोण राजी राखिले । कोण कोण मनीं भंगले । क्षणक्षणा परीक्षिले । पाहिजेत लोक ॥ ६ ॥ शिष्य विकल्पें रान घेतो । गुरु मागें मागें धांवतो । विचार पाहों जातां तो । विकल्पचि अवघा ॥ ७ ॥ आशाबद्ध क्रियाहीन । नाहीं चातुर्यांचे लक्षण । ते महंतीची भणभण । बंदे नाहीं ॥ ८ ॥ ऐसे गोसांवी हळु पडती । ठायीं ठायीं कष्टी होती । तेथें संगतीचे लोक पावती । सुख कैंचें ॥ ९ ॥ जिकडे तिकडे कीर्ति माजे । सकळ लोकांस हव्यास उपजे । लोक राजी राखोन कीजे । सकळ कांहीं ॥ १० ॥ परलोकीं वास करावा । समुदाय उगाच पहावा । मागण्याचा तगादा न लावावा । कांहींएक ॥ ११ ॥ जिकडे जग तिकडे जगन्नायक । कळला पाहिजे विवेक । रात्रंदिवस विवेकी लोक । संभाळीत जाती ॥ १२ ॥ जो जो लोक दृष्टीस पडिला । तो तो नष्ट ऐसा कळला । अवघे नष्ट एकला भला । कशावरूनी ॥ १३ ॥ वोस मुलखीं काय पाहावें । लोकांवेगळें कोठें राहावें । तैंन्हे खोटी सोंडतें घ्यावें । कांहींएक ॥ १४ ॥ तस्मात लोकीं वर्ततां नये । त्यास महंती कामा नये । परत्रसाधनाचा उ- पाय । श्रवण करून असावें ॥ १५ ॥ आपणांस बरें पाहतां न ये । लोक बुडवायाचें कोण कार्य । गोडी आवडी वायां जाय । विकल्पचि अवघा ॥ १६ ॥ अभ्यासेँ प्रगट व्हावें । नाहीं तरी झांकौन असावें । प्रगट होऊन नासावें । हैं बरें नव्हे ॥ १७ ॥ मंद हळूहळु चालतो । चपळ कैसा आटो- पतो । आरबी फिरवणारे तो । कैसा असावा ॥ १८ ॥ हीं धकाधकीचीं कामें । तीक्ष्णबुद्धीचीं वर्में । भोळ्या भावार्थे संभ्रमें । कैसें घडे ॥ १९ ॥ शेत केलें परी वाहेनाँ । जवारें केलें परी फिरेना । जन मेळविले परी धरीना । अंतर्यामीं । २० ॥ जरी चढती वाढती आवडी उठे । तरीच परमार्थ प्र- गटे । घसवस करितां विटे । सगट लोक ॥ २१ ॥ आपलें लोकांस मानेना । लोकांचें आपणास मानेना । अवघा विकल्पचि मना । समाधान कैंचें


१. शिस्त. २. वरच्या स्थानी, एकांतीं. ३. दृष्टीषणा. ४. पड. ५. आरबी घोडा. ६. घोटाळ्यानें. ७. निगा करीना. ८. व्यापार.

॥ २२ ॥ नाशक दीक्षा सिंतेरू लोक । तेथें कैंचा असेल विवेक । जेथें बळावला अविवेक । तेथें राहणें खोटें ॥ २३ ॥ बहुत दिवस श्रम केला । शेवटीं अवघाचि वायां गेला । आपणास ठाकेना<sup></sup> गलवला । कोणें करावा ॥ २४ ॥ संगीते चालिला तरी तो व्याप । नाहीं तरी अवघाचि संताप । क्षणक्षणां विक्षेप कोप । किती म्हणोन सांगावा ॥ २५ ॥ मूर्खपणें भरंग- ळती । ज्ञातेपणें कलह करिती । होते दोहींकडे फजिती । लोकांमध्ये ॥ २६ ॥ कारभार आटोपेना करवेना । आणि उगेंहि रहेना<sup></sup> । या कारणें सकळ जनां । काय म्हणावें ॥ २७ ॥ नाशक उपाधीस सोडावें । वय सार्थकीं घालावें । परिभ्रमणें कंठावें । कोठें तरी ॥ २८ ॥ परिभ्रमण करवेना । दुसऱ्याचें कांहींच सोसेना । तरी मग उदंड यातना । विकल्पाची ॥ २९ ॥ आतां हें आपणाचपाशीं । बरें विचारावें आपणासी । अनुकूल पडेल तैशी । वर्त- णूक करावी ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशति- दशके यत्ननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥


८. उपाधिलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ सृष्टीमध्यें बहुत लोक । परिभ्रमणें कळे कौतुक । नाना प्रकारांचे विवेक । आढळों लागती ॥ १ ॥ किती प्रापंचिक जन । अखंड वृत्ती उदासीन । सुखदुःखें समाधान । डंडळेना ॥ २ ॥ स्वभावेंचि नेमक बोलती । सहजचि नेमक चालती । अपूर्व बोलण्याची स्थिती । सक- ळांसि माने ॥ ३ ॥ सहजचि तालज्ञान येतें । स्वभावेंचि रागज्ञान उम- टतें । सहजचि कळत जातें । न्यायनीतिलक्षण ॥ ४ ॥ एखादा आढळे गाजी । सकळ लोक अखंड राजी । सदा सर्वदा आवडी ताजी । प्राणि- मात्रांची ॥ ५ ॥ चुकोन उदंड आढळतें । भारी मनुष्य दृष्टीस पडतें । महं- ताचें लक्षणसें वाटतें । अकस्मात ॥ ६ ॥ ऐसे आढळतां लोक । चमत्कारें गुणग्राहक । क्रिया बोलणें नेमक<sup></sup> । प्रत्ययाचें ॥ ७ ॥ सकळ अवगुणा- मध्यें अवगुण । आपले अवगुण वाटती गुण । मोठें पाप करंटपण । चुके- ना कीं ॥ ८ ॥ डौलेंचि<sup></sup> काम होतें सदा । जें जपल्यानें नव्हे सर्व-


१. ठक. २. होईना. ३. सुरळीत. ४. सहजासहजीं.