भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 426, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 426

विजे ॥ २ ॥ तुंदे¹ हेकेंड² कठोरवचनी । अखंड बोले साभिमानीं । न्याय नीति अंतःकरणीं । घेणार नाहीं ॥ ३ ॥ तऱ्हेई³ शीघ्रकोपी सदा । कदापि न धरी मर्यादा । राजकारण संवादा । मिळोंच नेणे ॥ ४ ॥ ऐसे लोंद⁴ बेह्- मानी । कदापि सत्य नाहीं वचनीं । पापी अपस्मार⁵ जनीं । राक्षस जाणावे ॥ ५ ॥ समयासारिखा समय येइना । नेम सहसा चालेना । नेम धरितां राजकारणा । अंतर पडे ॥ ६ ॥ अति सर्वत्र वर्जावें । प्रसंग पाहून चालावें । हटनिय्रहीं न पडावें । विवेकी पुरुषें ॥ ७ ॥ बहुतचि करितां हट । तेथें ये- ऊन पडले तट । कोणी एकाचा शेवट । झाला पाहिजे ॥ ८ ॥ बरें ईश्वर आहे साभिमानी । विशेष तुळजा भवानी । परंतु विचार पाहोनी । कार्य करणें ॥ ९ ॥ अखंडचि सावधाना । बहुत काय करावी सूचना । परंतु कांहींएक अनुमाना । आणिले पाहिजे ॥ १० ॥ समर्थापाशीं बहुत जन । राहिला पाहिजे साभिमान । निश्चळ करूनियां मन । लोक असती ॥ ११ ॥ म्लेंच्छ दुर्जन उदंड । बहुतां दिवसांचें माजलें बंड । याकारणें अखंड । सा- वधान असावें ॥ १२ ॥ सकळ कर्ता तो ईश्वर । तेणें केला अंगिकार । तया पुरुषाचा विचार । विरळा जाणे ॥ १३ ॥ न्याय नीति विवेक विचार । नाना प्रसंग प्रकार । परीक्षणें परांतर । देणें ईश्वराचें ॥ १४ ॥ महायत्न सावधपणें । समयीं धारिष्ट धरणें । अद्भुतचि कार्य करणें । देणें ईश्वराचें ॥ १५ ॥ यश कीर्ति प्रताप महिमा । उत्तम गुणांसि नाहीं सीमा । नाहीं दुसरी उपमा । देणें ईश्वराचें ॥ १६ ॥ देव ब्राह्मण आचार विचार । कितीक जनांस आधार । सदा घडे परोपकार । देणें ईश्वराचें ॥ १७ ॥ इहलोक प- रलोक पाहणें । अखंड सावधपणें राहणें । बहुत जनांचें साहणें । देणें ईश्वराचें ॥ १८ ॥ देवाचा कैपक्ष⁶ घेणें । ब्राह्मणाची चिंता वाहणें । बहुत जनांस पाळणें । देणें ईश्वराचें ॥ १९ ॥ धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अ- वतार । झाले आहेत पुढें होणार । देणें ईश्वराचें ॥ २० ॥ उत्तम गुणांचा ग्राहक । तर्क तीक्ष्ण विवेक । धर्मस्थापना पुण्यश्लोकें⁷ । देणें ईश्वराचें ॥ २१ ॥ सकळ गुणांमध्यें सार । तजबिजा विवेक विचार । जेणें पाविजे पैलपार । १. मस्त. २. एककल्ली. ३. तऱ्हेवाईक. ४. दांडगे. ५. दुःखदायक. ६. कैवार. ७. पुण्यकारक कीर्ति.