दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 425, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३९० श्रीदासबोध. [ दशक ते । आपदां लागती ॥ १९ ॥ बळाविण युद्धास गेला । तो सर्वस्वें नाग- वला । शब्द ठेवावा कोणाला । कोण कैसा ॥ २० ॥ जें प्रतीतीस आलें खरें । तेंचि घ्यावें अत्यादरें । अनुभवाविण जीं उत्तरें । तीं फलकटें जाणावीं ॥२१॥ शिकवून जातां राग चढे । परंतु पुढें अद्दल घडे । खोटा निश्चय तात्काळ उडे । लोकांमध्यें ॥२२॥ खरें सांडून खोटें घेणें । बकध्यानास काय उणें । त्रिभू- वनीं नारायणें । न्याय केला ॥२३॥ तो न्याय सोडितां शेवटीं । अवघें जगाचि लागे पाठीं । जनीं भांडभांडोनि हिंपुटी । किती व्हावें ॥२४॥ अन्याय बहुतांस पुरवले । हें देखिलें ना ऐकलें । वेडें उगेंच भरीं भरलें । असत्याचे ॥ २५ ॥ असत्य म्हणिजे तेंचि पाप । सत्य म्हणिजे स्वरूप । दोहोंमध्यें साक्षेप । कोणाचा करावा ॥ २६ ॥ मायेमध्यें बोलणें चालणें साचें । माया नसतां बोलणें कैंचें । या कारणें निःशब्दांचें । मूळ शोधावें ॥ २७ ॥ वाच्यांश जाणोन सांडावा । लक्ष्यांश विवरोन घ्यावा । या कारणें निःशब्दमूळाचा गोवां । आढळना ॥ २८ ॥ अष्टधा प्रकृति पूर्वपक्ष । सांडून अलक्षीं ला- वावें लक्ष । मननशीळ परम दक्ष । तोचि जाणे ॥ २९ ॥ नाना भूस आणि कण । एकाचि म्हणणें अप्रमाण । रस सांडून चोइटिया कोण । शाहणा से- वी ॥ ३० ॥ पिंडीं नित्यानित्यविवेक । ब्रह्मांडीं सारासार अनेक । सकळ शोधूनियां एक । सार घ्यावें ॥ ३१ ॥ मायेकरितां कोणी एक । अन्वय आणि व्यतिरेक । ते माया नसतां विवेक । कैसा करावा ॥ ३२ ॥ तत्त्वें तत्त्व शोधावें । महावाक्यीं प्रवेशावें । आत्मनिवेदनें पावावें । समाधान ॥ ३३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टादशदशके करंटपरीक्षानिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. उत्तम पुरुष. श्रीगणेशाय नमः ॥ नाना वस्त्रे नाना भूषणें । येणें शरीर शृंगारणे । विवेकें विचारें राजकारणें । अंतर शृंगारिजे ॥ १ ॥ शरीर सुंदर सतेज । वस्त्रे भूषणें केलें सज्ज । अंतरीं नसतां चातुर्यबीज । कदापि शोभा न पा- १. हाल भोगतात. २. ढोंगास. ३. कष्टी. ४. शब्दातीत ब्रम्हाचें. ५. भ्रम, गोंधळ. ६. निरास पावणारी. ७. ब्रह्माचे ठिकाणीं. ८. हा समास शिवाजी महाराजांस अनुलक्षून लिहिला आहे.