दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 456, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२० वा.] चत्वार जिन्नस. ४२१ व्हावा ॥ २८ ॥ सकळ कर्ता परमेश्वरु । आपला मायिक विचारु । जैसें कळेल तैसें करु । जगदंतरीं ॥ २९ ॥ देवायेंवढें चपळ नाहीं । ब्रह्मायेवढें निश्चळ नाहीं । पायरीनें पायरी चढोनि पाहीं । मूळपर्यंत ॥३०॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके शिवशक्तिनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥४॥ ५. चत्वार जिन्नस. श्रीगणेशाय नमः ॥ येथून पाहतां तेथवरी । चारी जिन्नस अवधारी । एक चौदा पांच चारी । ऐसें आहे ॥ १ ॥ ब्रह्म सकळांहून वेगळें । ब्रह्म सकळां- हून आगळें । नाना कल्पने निराळें । परब्रह्म तें ॥ २ ॥ परब्रह्माचा विचार । नाना कल्पनेहून पर । निर्मळ निश्चळ निर्विकार । अखंड आहे ॥ ३ ॥ परब्रह्मास कांहींच तुलेना । हा एक मुख्य जिन्नसाना । दुसरा जि- न्नस नाना । कल्पना मूळमाया ॥ ४ ॥ नाना सूक्ष्मरूप । सूक्ष्मरूप आणि कर्दंमरूप । मुळींच्या संकल्पाचा आरोप । मूळमाया ॥ ५ ॥ हरिसंकल्प मु- ळींचा । आत्माराम सकळांचा । संकेत नामाभिधानाचा । ऐसा आहे ॥ ६ ॥ निश्चळीं चंचळ चेतलें । म्हणोनि चैतन्य बोलिलें । गुणसमानत्वें झालें । गुणसाम्य ऐसें ॥ ७ ॥ अर्धनारी नटेश्वर । तोचि षड्गुणेश्वर । प्रकृति पुरु- षाचा विचार । शिवशक्ती ॥ ८ ॥ शुद्ध सत्वगुणाची मांडणी । अर्धमात्रा गुणक्षोभिणी । पुढें तिही गुणांची करणी । प्रगट झाली ॥ ९ ॥ मन माया अंतरात्मा । चौदा जिन्नसांची सीमा । विद्यमान ज्ञानात्मा । इतके ठायीं ॥ १० ॥ ऐसा हा दुसरा जिन्नस । अभिधानें चतुर्दश । आतां तिसरा जिन्न- स । पंचमहाभूतें ॥ ११ ॥ येथें पाहतां जाणीव थोडी । आदि अंत रोकडी । खाणी निरूपिल्या तांतडी । तो चौथा जिन्नस ॥ १२ ॥ चारी खाणी अनंत प्राणी । जणिवेची झाली दाटणी । चारी जिन्नस येथुनी । संपूर्ण झाले ॥ १३ ॥ बीज थोडें पेरिजेतें । पुढें त्याचें उदंड होतें । तैसें झालें आत्मया- तें । खाणी वाणी प्रगटतां ॥ १४ ॥ ऐसी सत्ता प्रबळली । थोडे सत्तेची उदंड झाली । मनुष्यवेषें सृष्टि भोगिली । नाना प्रकारें ॥ १५ ॥ प्राणी मा- १. एक ब्रह्म, चौदा नांवें असलेली मूळमाया, पंचमहाभूतें, व चारी खाणी असे हे चार जिन्नस सर्व ब्रम्हांडांत आहेत.