दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 54, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१ ला. ] नरदेहस्तवन. १९ घर । गांधले म्हणती आमुचें घर । सोट म्हणती आमुचें घर । आणि गोमी ॥ ४२ ॥ बहुत किड्यांचा जोजारें १ । किती सांगावा विस्तार । समस्त म्ह- णती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४३ ॥ पाहुणे म्हणती आमुचें घर । मित्र म्हणती आमुचें घर । ग्रामस्थ म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥४४॥ पशु म्हणती आमुचें घर । दासी म्हणती आमुचें घर । घरचीं म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४५ ॥ तस्कर म्हणती आमुचें घर । राजकीय म्हणती आमुचें घर । अग्नि म्हणे आमुचें घर । भस्म करूं ॥ ४६ ॥ समस्त म्ह- णती घर माझें । हें मूर्खही म्हणे माझें माझें । शेवटीं जड जाहलें बोझें । टाकिला देश ॥ ४७ ॥ अवघीं घरें भंगलीं । गांवाची पांढरी २ पडली । मग ते गृहीं राहिलीं । अरण्यश्वापदें ॥ ४८ ॥ किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचें घर निश्चयात्मक । हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोनि गेलें ॥ ४९ ॥ ऐसी गृहाची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रतीती । जन्म दों दिवसांची वस्ती । कोठें तरी करावी ॥ ५० ॥ देह म्हणावें आपुलें । तरी तें बहुतात्कारणें निर्मिलें । प्राणियांच्या माथां घर केलें । उवा मस्तकीं भक्षिती ॥ ५१ ॥ रोममुळीं किडे भक्षिती । खांडूक झाल्या किडे पडती । पोटामध्यें जंत होती । प्रत्यक्ष प्राणियांच्या ॥ ५२ ॥ कीड लागे दांतासी । कीड लागे डोळ्यांसी । कीड लागे कर्णांसी । आणि गोमाशा भरती ॥ ५३ ॥ गोचडि अशुद्ध ३ सेविती । चामवा मांसांत घुसती । पिसोळे चावून पळती । अक- स्मात ॥ ५४ ॥ सुंगे गांधले चाविती । गोमी जळवा अशुद्ध घेती । विंचू सर्प दंश कारिती । काँनटें फुशीं ४ ॥ ५५ ॥ जन्मोन देह पाळिलें । तें अक- स्मात व्याघ्रें नेलें । कीं तें लांडग्यांचि भक्षिलें । बलात्कारें ॥ ५६ ॥ मूषक- मार्जारें दंश कारिती । श्वानें अश्वें लोळें ५ तोडिती । रिसें ६ मर्कटें मारिती । कासावीस करूनियां ॥ ५७ ॥ उँहूॅ ७ डसोन उचलिती । हस्ती चिरडोनि टाकिती । वृषभ टोंचोन मारिती । अकस्मात ॥ ५८ ॥ तस्कर तडतडां तोडिती । भुतें झडपोन मारिती । असो या देहाची स्थिती । ऐसी आहे ॥ ५९ ॥ ऐसें शरीर बहुतांचें । हें मूर्ख म्हणे आमुचें । परंतु खाजें ९ जिवांचें । १. जंजाळ. २. लोकवस्ती; गांव ओस झाला हा अर्थ. ३. रक्त. ४. एक जातीचे जंतु. ५. लाडे, मांसाचे तुकडे. ६. अस्वलें. ७. उंट. ८. बैल. ९. खाद्य.