दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 55, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२० श्रीदासबोध. [ दशक तापत्रयीं बोलिलें ॥ ६० ॥ देह परमार्थीं लाविलें । तरीच याचें सार्थक जाहलें । नाहीं तरी व्यर्थचि गेलें । नाना आघातें मृत्युपंथें ॥ ६१ ॥ असो जे प्रापंचिक मूर्ख । ते काय जाणती परमार्थसुख । त्या मूर्खाचें लक्षण कांहींएक । पुढें बोलिलें असे ॥ ६२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके नरदेहस्तवनं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओवी ३२६. दशक दुसरा. १. मूर्खलक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ ॐनमोजी गजवदना । एकदंता त्रिनयना । कृपादृष्टीं भक्तजना । अवलोकावें ॥ १ ॥ तुज नमूं वेदमाते । श्रीशारदे ब्रह्म- सुते । अंतरीं वसें कृपावंते । स्फूर्तिरूपें ॥ २ ॥ वंदूनि सद्गुरुचरण । करूनि रघुनाथस्मरण । त्यागार्थ मूर्खलक्षण । बोलिजेल ॥३॥ एक मूर्ख एक पढत- मूर्ख । उभय लक्षणीं कौतुक । श्रोतीं सादरें विवेक । केला पाहिजे ॥ ४ ॥ पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण । सावध होऊनि विचक्षण । परिसोत पुढें ॥ ५ ॥ आतां प्रस्तुत विचार । लक्षणें सांगतां अपार । परी कांहीं एक तत्पर । होऊनि ऐका ॥ ६ ॥ जे प्रापंचिक जन । जयांसि नाहीं आत्मज्ञान । जे केवळ अज्ञान । त्यांचीं हीं लक्षणें ॥ ७ ॥ जन्मला जयांचे उदरीं । तयांसि जो विरोध करी । सखी मानिली अंतुरी । तो एक मूर्ख ॥ ८ ॥ सांडोनि सर्वही गोत । स्त्रिये आधीन जीवित । सांगे अंतरींची मात । तो एक मूर्ख ॥ ९ ॥ परस्त्रियेसी प्रेम धरी । श्वशुरगृहीं वास करी । कुळेंविण कन्या वरी । तो एक मूर्ख ॥ १० ॥ समर्थावरी अहंता । अंतरीं मानी समता । सामर्थ्याविण करी सत्ता । तो एक मूर्ख ॥ ११ ॥ आपली १. तापत्रयनिरूपणांत. (दशक ३, समास ६।७।८ पहा.) २. ग्रंथलेखनाच्या स्फुरणरूपानें ३. स्त्री.