दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 57, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२२ श्रीदासबोध. [ दशक ॥ ३१ ॥ विद्या वैभव ना धन । पुरुषार्थ सामर्थ्य ना मान । कोरडाच वाहे अभिमान । तो एक मूर्ख ३२ ॥ लंडी लटिका लबाड । कुकर्मी कुटिल निचोड । निद्रा जयाची वाँड । तो एक मूर्ख ॥ ३३ ॥ दंत चक्षु आणि घ्राण पाँणी वसन आणि चरण । सर्वकाळ जयाचे मलिन । तो एक मूर्ख ॥ ३४॥ ऊंचीं जाऊनि वस्त्र नेसे । चौबारां बाहेरि बैसे । सर्वकाळ नग्न दिसे । तो एक मूर्ख ॥ ३५ ॥ वैधृति आणि व्यतिपात । नाना कुमुहूर्तै जात । अपशकुनें करी घात । तो एक मूर्ख ॥ ३६ ॥ क्रोध अभिमान कुबुद्धी आपणासि आपण वधी । जयासि नाहीं दृढ बुद्धी । तो एक मूर्ख ॥ ३७ ॥ जिवलगांसी परम खेदी । सुखाचा शब्द तोही नेदी । नीच जनांसि वंदी । तो एक मूर्ख ॥ ३८ ॥ आपणासि राखे नानापरी । शरणागतासि अव्हेरी । लक्ष्मीचा भरंवसा धरी । तो एक मूर्ख ॥ ३९ ॥ पुत्र कलत्र आणि दारा । इतु- काचि मानूनियां थारा । विसरोन गेला ईश्वरा । तो एक मूर्ख ॥४०॥ जैसें जैसें करावें । तैसें तैसें पावावें । हें जयासी नेणवे । तो एक मूर्ख ॥ ४१ ॥ पुरुषाचेनि अष्टगुणें । स्त्रियांसी ईश्वरी देणें । ऐशा केल्या बहुत जेणें । तो एक मूर्ख ॥ ४२ ॥ दुर्जनाचेनि बोलें । मर्यादा सांडोनि चाले । दिवसा झांकिले डोळे । तो एक मूर्ख ॥ ४३ ॥ देवद्रोही गुरुद्रोही । मातृद्रोही पितृद्रोही । ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही । तो एक मूर्ख ॥ ४४ ॥ आदरेंविण बोलणें । न पुसतां साक्ष देणें । निंद्य वस्तु अंगिकारणें । तो एक मूर्ख ॥ ४५ ॥ तुर्क तोडोनि बोले । मार्ग सोडोनि चाले । कुकर्मी मित्र केले । तो एक मूर्ख ॥ ४६ ॥ परपिडेचें मानी सुख । परसंतोषाचें मानी दुःख । गेले वस्तूचा करी शोक । तो एक मूर्ख ॥ ४७ ॥ पत्त राखो नेणे कदा । विनोद करी सर्वदा । हांसतां खिजे पेटे हुंद्दीं । तो एक मूर्ख ॥ ४८ ॥ होर्ड घाली अवघड । 'काजेंविण करी बडबड । बोलोचि नेणे मुखजड । तो एक मूर्ख ॥ ४९ ॥ वस्त्र शस्त्र दोन्ही नसे । उंचस्थानीं जाऊनि बैसे । जो गोत्रजांसि विश्वासे । तो एक मूर्ख ॥ ५० ॥ तस्करासी वोळखी सांगे । देखिली वस्तु तेचि मागे । आपुलें अनहित करी रागें । तो एक मूर्ख ॥ ५१ ॥ हीन जनांसि बरोबरी । बोल १. निर्लज्ज. २. अतिशय. ३. हात ४. चव्हाठा. ५. कामविकार. ६. वजन, महत्व. ७. झोंबी करण्यास. ८. पैज.