दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 58, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२ रा. ] मूर्खलक्षण. २३ बोले सरोत्तरीं । वामहस्तें प्राशन करी । तो एक मूर्ख ॥ ५२ ॥ समर्थांसी मत्सर धरी । अलभ्य वस्तूचा हेवा करी । घरींच्या घरीं करी चोरी । तो एक मूर्ख ॥ ५३ ॥ सांडोनियां जगदीशा । मनुष्याचा मानी भरंवसा । सार्थकेंविण वेंची वयसा । तो एक मूर्ख ॥ ५४ ॥ संसारदुःखाचेनि गुणें । देवासी गाळी देणें । मैत्राचे बोले उणें । तो एक मूर्ख ॥ ५५ ॥ अल्प अ- न्याय क्षमा न करी । सर्वकाळ धारकीं धरी । जो विश्वासघात करी । तो एक मूर्ख ॥ ५६ ॥ समर्थांचे मनींचा तुटे । जयाचेनि सभा विटे । क्षणीं बरा क्षणीं पालटे । तो एक मूर्ख ॥ ५७ ॥ बहुत दिवसांचे सेवक । त्यागून ठेवी आणिक । ज्याची सभा निर्नायक । तो एक मूर्ख ॥ ५८ ॥ अनीतीनें द्रव्य जोडी । धर्म नीति न्याय सोडी । संगतीचें मनुष्य तोडी । तो एक मूर्ख ॥ ५९ ॥ घरीं असोनि सुंदरी । जो सदा परद्वार करी । बहुतांचें उच्छिष्ट अंगिकारी । तो एक मूर्ख ॥ ६० ॥ आपलें अर्थ दुसऱ्यापाशीं । आणि दुसऱ्याचें अभिलाषी । पर्वतें करी हीनासी । तो एक मूर्ख ॥ ६१ ॥ अतीताचा अंत पाहे । कुग्रामामध्यें राहे । सर्वकाळ चिंता वाहे । तो एक मूर्ख ॥ ६२ ॥ दोघे बोलत असती जेथें । तिसरा जाऊन बैसे तेथें । डोई खाजवी दोहीं हातें । तो एक मूर्ख ॥ ६३ ॥ उदकामध्यें सांडी गुरळी । पायें पाय खांजोळी । सेवा करी हीन कुळीं । तो एक मूर्ख ॥ ६४ ॥ स्त्री- बाळकांस सलगी देणें । पिशाच्चासन्निध बैसणें । मर्यादेविण पाळी सुणें । तो एक मूर्ख ॥ ६५ ॥ परस्त्रींशीं कलह करी । मुकी वस्तु निघातें मारी । मूर्खाची संगति धरी । तो एक मूर्ख ॥ ६६ ॥ कलह पाहत उभा राहे । सोडवीना कौतुक पाहे । खरें असतां खोटें साहे । तो एक मूर्ख ॥ ६७ ॥ लक्ष्मी आलियावरी । जो मागील ओळखी न धरी । देवीं ब्राह्मणीं सत्ता करी । तो एक मूर्ख ॥ ६८ ॥ आपुलें कार्य होय तोंवरी । बहुसाल नम्रता धरी । पुढिलांचें कार्य न करी । तो एक मूर्ख ॥ ६९ ॥ अक्षरें गाळून वाची । कांहीं घाली पदरींचीं । निगा न करी पुस्तकाची । तो एक मूर्ख ॥ ७० ॥ आपण वाचीना कधीं । कोणासि वाचाया नेदी । बांधोनि ठेवी बंदीं । तो १. उत्तरास उत्तर असे. २. हांव. ३. धारेवर धरतो, त्रास देतो. ४. द्रव्य, ठेव. ५. देणें घेणें. ६. याचकाचा. ७. गुळणी. ८. कुतरें. ९. प्राणी. १० दुसऱ्याचें.