दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 60, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२ रा. ] उत्तमलक्षण. २५ घालूं नये । कांहीं केल्या ॥ १५ ॥ बहुत चिंता करूं नये । निःसंगपणें राहूं नये । परस्त्रीतें पाहूं नये । पापबुद्धीं ॥ १६ ॥ कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखूं नये । परपीडा करूं नये । विश्वासघात ॥ १७ ॥ शौचेंविण असूं नये । मळिण वस्त्र नेसूं नये । जाणारासी पुसूं नये । कोठें जातोसि म्हणोनि ॥ १८ ॥ व्यापकेंपण सोडूं नये । पराधीन होऊं नये । आपलें ओझें घालूं नये । कोणी एकासी ॥ १९ ॥ पत्रेंविणें परतें करूं नये । हीनाचें ऋण घेऊं नये । ग्वाहीविण जाऊं नये । राजद्वारीं ॥ २० ॥ ल- टकी जांजू घेऊं नये । सभेसि लटिकें करूं नये । आदर नसतां बोलूं नये । स्वाभाविक ॥ २१ ॥ अदेखणेपण करूं नये । अन्यायाविण गांजूं नये । अ- नतिीनें वर्तू नये । अंगबळें ॥ २२ ॥ बहुत अन्न खाऊं नये । बहुत निद्रा करूं नये । बहुत दिवस राहूं नये पिशुना