दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 61, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२६ श्रीदासबोध. [ दशक वाचा नवस बुडवूं नये । आपुला धर्म उडवूं नये । भलते भरीं पडूं नये । विचारेंविण ॥ ३६ ॥ निष्ठुरपण धरूं नये । जीवहत्या करूं नये । पाउस देखोन जाऊं नये । अथवा अवकाळीं ॥ ३७ ॥ सभा देखोनि गळूं नये । समयीं उत्तर टळूं नये । धिक्कारितां ढळूं नये । धारिष्ट आपुलें ॥ ३८ ॥ गुरुविरहित असूं नये । नीच यातीचा गुरु करूं नये । जिणें शाश्वत मानूं नये । वैभवेंसीं ॥ ३९ ॥ सत्य मार्ग सोडूं नये । असत्य पंथें जाऊं नये । कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ॥ ४० ॥ अपकीर्ति सोडावी । सत्कीर्ति वाढवावी । विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ॥ ४१ ॥ न घेतां हे उत्तम गुण । तो मनुष्य अवलक्षण । ऐक त्याचें लक्षण । पुढिलिये समासीं ॥ ४२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीय- दशके उत्तमलक्षणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. कुविद्यालक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ ऐका कुविद्येचीं लक्षणें । अतिहीन कुलक्षणें । त्यागार्थ बोलिलों श्रवणें । त्याग घडे ॥ १ ॥ ऐका कुविद्येचे प्राणी । जन्मा येऊनि केली हानी । सांगिजेल इहीं लक्षणीं । श्रोतीं ओळखावा ॥ २ ॥ कुविद्येचा प्राणी असे । तो कठिन निरूपणीं त्रासे । अवगुणांची समृद्धि असे । ह्मणोनियां ॥ ३ ॥ श्लोक ॥ दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च । अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ॥ टी०॥ काम क्रोध मद मत्सर । लोभ दंभ तिरस्कार । गर्व ताठा अहंकार । द्वेष विवाद विकल्पी ॥ ४ ॥ आशा ममता तृष्णा कल्पना । चिंता अहंता कामना भावना । असूया अविद्या ईषणा वासना । अतृप्ति लोलंगतां ॥ ५ ॥ इच्छा वांञ्छा चिकित्सा निंदा । अनीति ग्रामेणी मस्ती सदा । जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा । दुर्वृत्ति दुर्वासना ॥ ६ ॥ स्पर्धा खटपट आणि चटपट । नव्हे झटपट आणि वटवट । सदा खटनट आणि लटपट । परम व्यथा आणि कुविद्या ॥७॥ कुरूप आणि कुलक्षण । अशक्त आणि दुर्जन । दरिद्री आणि कृपण । अतिशयेंसी ॥८॥ आळसी आणि खादाड । दुर्बळ आणि लाताड । तुटक आणि लुबाड । १. गीं. अ. १६. २. मत्सर. ३. इच्छा. ४. लुब्धपणा. ५. हरामी. ६. शठ व नष्ट.