दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 66, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२ रा. ] रजोगुणनिरूपण. ३१ वाढा माझा ठाव । ऐसी मनीं धरी हांव । तो रजोगुण ॥ १५ ॥ दुसऱ्या- चें सर्व जावें । माझेंच बरवें असावें । ऐसें आठवे स्वभावें । तो रजोगुण ॥ १६ ॥ कपट आणि मत्सर । उठे देहीं तिरस्कार । अथवा कामाचा वि- कार । तो रजोगुण ॥ १७ ॥ बालकावरी ममता । प्रीतीनें आवडे कांता । लोभ वाटे समस्तां । तो रजोगुण ॥ १८ ॥ जिवलगाची खंती । जेणें काळें वाटे चित्तीं । तेणें काळें शीघ्रगति । रजोगुण आला ॥ १९ ॥ संसाराचे ब- हुत कष्ट । कैसा होईल शेवट । मनास आठवे संकट । तो रजोगुण ॥ २० ॥ वैभव देखोनि दृष्टीं । आवडी उपजली पोटीं । आशागुणें हिंपुटी १ । करी तो रजोगुण ॥ २१ ॥ कां मागें जें जें भोगिलें । तें तें मनीं आठवलें । दुःख अत्यंत वाटलें । तो रजोगुण ॥ २२ ॥ जें जें दृष्टीं पडलें । तें तें मनें मागि- तलें । लभ्य नसतां दुःख जाहलें । तो रजोगुण ॥ २३ ॥ विनोदार्थ भरे मन । शृंगारिक करी गायन । रागरंग तानमान । करी तो रजोगुण ॥ २४॥ टवाळी ढवाळी निंदा । सांगणें घडे विवादा । हास्यविनोद करी सर्वदा । तो रजोगुण ॥ २५ ॥ आळस उठे प्रबळ । कर्मणुकीचे नाना खेळ । कां उप- भोगाचे गोंधळ । तो रजोगुण ॥ २६ ॥ कळावंत बहुरूपी । नटावे- लोकीं २ साक्षेपी ३ । नाना खेळीं दान अर्पी । तो रजोगुण ॥ २७ ॥ उन्मत्त ४ द्रव्यावरी अति प्रीती । आवडे नीचाची संगती । ग्रामण्य ५ आठवे चित्तीं । तो रजोगुण ॥ २८ ॥ तस्करविद्या जीवीं उठे । परन्यून बोलावें वाटे । नित्य- नेमासि मन विटे । तो रजोगुण ॥ २९ ॥ देवाकारणीं लाजाळू । उदरा- लागीं कष्टाळू । प्रपंचीं जो स्नेहाळू । तो रजोगुण ॥ ३० ॥ गोड ग्रासीं आँळ- ६ केपण । अत्यादरें पिंडपोषण ७ । रजोगुणें उपोषण । केलें न वचे ॥ ३१ ॥ शृंगारिक तें आवडे । भक्ति वैराग्य नावडे । कळालाघवीं मन पर्वाडे ८ । तो रजोगुण ॥ ३२ ॥ नेणोनियां परमात्मा । सकल पदार्थां प्रेमा । बलात्कारें वाली जन्मा । तो रजोगुण ॥ ३३ ॥ असो ऐसा रजोगुण । लोभें दावी जन्ममरण । प्रपंचीं तो शबल ९ जान । दारुण दुःख भोगवी ॥ ३४ ॥ आतां १. हिरमोड. २. नट वगैरेंना पाहण्यांत. ३. प्रयत्न करणारा. ४. मादक. ५. हरामखोरी. ६. अतिशय हाव. ७. देहाचें पोषण. ८. शिरे. ९ रजोगुणाचे प्रकार दोन, शुद्ध आणि शबल; त्यांतील एक.