दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 67, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३२ श्रीदासबोध. [ दशक रजोगुण हा सुटेना । संसारिक हेतु तुटेना । प्रपंचीं गुंतली वासना । यासि उपाय कोण ॥ ३५ ॥ उपाय एक भगवद्भक्ती । जरी ठाकेना विरक्ती । तरी यथानुशक्ती । भजन करावें ॥ ३६ ॥ काया वाचा आणि मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें । ईश्वरीं अर्पोनियां नमनें । सार्थक करावें ॥ ३७ ॥ यथानु- शक्ति दान पुण्य । परी भगवंतीं अनन्य । सुखदुःखें परीं चिंतन । देवाचें- चि करावें ॥ ३८ ॥ आदि अंतीं एक देव । मध्येंचि लाविली माँव । म्हणो- निया पूर्ण भाव । भगवंतीं असावा ॥ ३९ ॥ ऐसा शबल रजोगुण । संक्षेपें केलें कथन । आतां शुद्ध तो तूं जाण । पारमार्थिक ॥ ४० ॥ त्याचे वोळ- खींचें चिन्ह । सत्वगुणीं असे जाण । तो सत्वगुण परिपूर्ण । भजनमूळ ॥ ४१ ॥ ऐसा रजोगुण बोलिला । श्रोतीं मनें अनुभविला । आतां पुढें परिसिला । पाहिजे तमोगुण ॥ ४२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके रजोगुणनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. तमोगुणनिरूपण. श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिला रजोगुण । क्रियेसहित लक्षण । आतां ऐका तमोगुण । तोहि सांगिजेल ॥ १ ॥ संसारीं दुःखसंबंध । प्राप्त होतां उठे खेद । कां अद्भुत आला क्रोध । तो तमोगुण ॥ २ ॥ शरीरीं क्रोध भरतां । नो- ळखे माता आणि पिता । बंधु बहिण आणि कांता । ताडी तो तमोगुण ॥ ३ ॥ दुसऱ्याचा प्राण घ्यावा । आपला आपण स्वयें द्यावा । विसरवी जीवभावा । तो तमोगुण ॥ ४ ॥ भरलें क्रोधाचें कौविरें । पिशाच्यापरी वावरे । नाना उपाहीं नावरे । तो तमोगुण ॥ ५ ॥ आपला आपण शस्त्रपात । परोव्याचा करी घात । ऐसा समय वर्तत । तो तमोगुण ॥ ६ ॥ डोळां युद्धचि पाहावें । रण पडिलें तेथें जावें । ऐसें घेतलें जीवें । तो तमोगुण ॥ ७ ॥ अखंड भ्रांति पडे । केला निश्चय बिघडे । अत्यंत निद्रा आवडे । तो तमोगुण ॥ ८ ॥ क्षुधा जयाची वाड । नेणे कडू अथवा गोड । अत्यंत जो कां मूढ । तो तमोगुण ॥ ९ ॥ प्रीतिपात्र गेलें मरणें । तयालागीं जीव देणें । स्वयें आत्म- हत्या करणें । तो तमोगुण ॥ १० ॥ किडा मुंगी आणि श्वापद । यांचा करूं १. स्थिर होत नाहीं. २. माया. ३. वेड. ४. भटके, वागे. ५. दुसऱ्याचा.