दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 68, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२ रा.] तमोगुणनिरूपण. ३३ आवडे वध । अत्यंत जो कृपामंद । तो तमोगुण ॥ ११ ॥ स्त्रीहत्या बाळ- हत्या । द्रव्यालागीं ब्रह्महत्या । करूं आवडे गोहत्या । तो तमोगुण ॥ १२ ॥ ईंसाळोचेनि नेटें । विष द्यावें ऐसें वाटे । परवध मनीं उठे । तो तमोगुण ॥ १३ ॥ अंतरीं धरूनि कपट । पराचें करी तळपट । सदा मस्त सदा उद्धट तो तमोगुण ॥ १४ ॥ युद्ध देखावें ऐकावें । स्वयें युद्धचि करावें । मरावें कीं मारावें । तो तमोगुण ॥ १५ ॥ कलह व्हावा ऐसें वाटे । झोंबी घ्यावी ऐसें उठे । अंतरीं द्वेष प्रकटे । तो तमोगुण ॥ १६ ॥ मत्सरें भक्ति मोडावी । देवालयें बिघडावीं । फळतीं झाडें तोडावीं । तो तमोगुण ॥ १७ ॥ सत्कर्मे तीं नावडतीं । नाना दोष ते आवडती । पापभय नाहीं चित्तीं । तो तमो- गुण ॥ १८ ॥ ब्रह्मवृत्तीचा उच्छेद । जीवमात्रांस देणें खेद । करूं आवडे प्र- माद । तो तमोगुण ॥ १९ ॥ अग्निप्रलय शस्त्रप्रलय । भूतप्रलय विप्रप्रलय । मत्सरें करी जीवक्षय । तो तमोगुण ॥ २० ॥ भांडण लावून द्यावें । स्वयें कौतुक पाहावें । कुबुद्धि घेतली जीवें । तो तमोगुण ॥ २१ ॥ प्राप्त झालिया संपत्ती । जीवांसी करी यातायाती । कळवळा नये चित्तीं । तो तमोगुण ॥ २२ ॥ नावडे भक्ति नावडे भाव । नावडे तीर्थ नावडे देव । वेद शास्त्र नलगे सर्व । तो तमोगुण ॥ २३ ॥ परपीडेचा संतोष । निष्ठुरपणाचा हव्या- स । संसाराचा न ये त्रास । तो तमोगुण ॥ २४ ॥ स्नान संध्या नेम नसे । स्वधर्मीं भ्रष्टला दिसे । अकर्तव्य करीतसे । तो तमोगुण ॥ २५ ॥ ज्येष्ठ बंधु बाप माये । त्यांचीं वचनें न साहे । शीघ्रकोपी निघूनि जाये । तो तमो- गुण ॥ २६ ॥ उगोंचि खावें उगोंचि असावें । स्तब्ध होऊनि बैसावें । कांहीं- च स्मरेना स्वभावें । तो तमोगुण ॥ २७ ॥ चेटकी विद्येचा अभ्यास । शस्त्र- विद्येचा हव्यास । मल्लविद्या व्हावी ज्यास । तो तमोगुण ॥ २८ ॥ केले ग- ळाचे नवस । रोंडी-वेडीचे सायास । काष्ठयंत्रें छेदी जिव्हेस । तो तमोगुण ॥ २९ मस्तकीं भेंदें जाळावें । पोतें४ अंग हुरपळावें । स्वयें शस्त्र टोचून घ्यावें । तो तमोगुण ॥ ३० ॥ निग्रह करून धरणें । कां तें टांगून घेणें । १. कांहीं बाधेमुळें, किंवा ईर्ष्येमुळें. २. धगधगीत निखाऱ्यांची खाई. ३. ज्वाळा निघतील असा विस्तव खांपरांत पेटवून तें डोईवर घेऊन नाचावें. ४. भुत्याच्या हातांतील दिवटीनें.