भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 69, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 69

३४ श्रीदासबोध. [ दशक देवद्वारीं जीव देणें । तो तमोगुण ॥ ३१ देवासि शिर वाहावें । कां तें अंग समर्पावें । कडणीवरून घालून घ्यावें । तो तमोगुण ॥ ३२ ॥ निराहार उपोषण । पंचाग्निधूम्रपान । आपणास घ्यावें धुरून । तो तमोगुण ॥ ३३ ॥ सकाम जें कां अनुष्ठान । कां तें वायुरोधन । अथवा रहावें पडोन । तो तमोगुण ॥ ३४ ॥ नखें केश वाढवावे । हस्तचि वरते करावे । अथवा वाक्- शून्य १ व्हावें । तो तमोगुण ॥ ३५ ॥ नाना निग्रहीं पडावें । देहदुःखें चरफ- डावें । क्रोधें देवास फोडावें । तो तमोगुण ॥ ३६ ॥ देवाची जो निंदा करी । तो आशाबद्ध अघोरी । जो संतसंग न करी । तो तमोगुण ॥ ३७ ॥ ऐसा हा तमोगुण । सांगतां तो असाधारण । परी त्यागार्थ निरूपण । कांहींएक ॥ ३८ ॥ ऐसें वर्ते तो तमोगुण । परी हा पतनांसि २ कारण । मोक्षप्राप्तीचें लक्षण । नव्हे येणें ॥ ३९ ॥ केल्या कर्माचें फळ । प्राप्त होईल सकळ । जन्म दुःखाचें मूळ । तुटेना कीं ॥ ४० ॥ व्हावया जन्माचें खंडण । पाहिजे तो सत्वगुण । तेंचि असे निरूपण । पुढिलिये समासीं ॥ ४१ ॥ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके तमोगुणनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥ ७. सत्वगुणनिरूपण. श्रीगणेशाय नमः ॥ मागां बोलिला तमोगुण । जो दुःखदायक दारुण । आतां ऐका सत्वगुण । परम दुर्लभ जो ॥ १ ॥ जो भजनाचा आधार । जो योगियांचा थार । जो निरसी ३ संसार । दुःखमूळ जो ॥ २ ॥ जेणें होय उत्तम गती । मार्ग फुटे भगवंतीं । जेणें पाविजे मुक्ती । सायु- ज्यता ती ॥ ३ ॥ जो भक्तांचा कोंवसा ४ । जो भवार्णवींचा भरवंसा । मोक्ष- लक्ष्मीची दशा । तो सत्वगुण ॥ ४ ॥ जो परमार्थाचें मंडण । जो महंतांचें भूषण । रजतामांचें निरसन । जयाचेनी ॥ ५ ॥ जो परम सुखकारी । जो आनंदाची लहरी । देऊनियां निवारी । जन्ममृत्यु ॥ ६ ॥ जो ज्ञानाचा शेवट । जो पुण्याचें मूळपीठ । जयाचेनि सांपडे वाट । परलोकाची ॥ ७ ॥ ऐसा हा सत्वगुण । देहीं उमटतां आपण । तया क्रियेचें लक्षण । ऐसें असे १. मौन धरावें. २. अधोगतीस. ३. नष्ट करितो. ४. आश्रय, आधार.