भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 70, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 70

२ रा.] सत्वगुणनिरूपण. ३५ ॥ ८ ॥ ईश्वरीं प्रेम अधिक । प्रपंच संपादनें लौकिकें । सदा सन्निध विवेक । तो सत्वगुण ॥ ९ ॥ संसारदुःख विसरवी । भक्तिमार्ग विमल दावी । भज- नक्रिया जो उपजवी । तो सत्वगुण ॥ १० ॥ परमार्थाची आवडी । उठे भा- वार्थीची गोडी । परोपकारीं तांतडी । तो सत्वगुण ॥ ११ ॥ स्नान संध्या पुण्यशीळ । अभ्यंतरींचा निर्मळ । शरीर वरीं सोज्वळ । तो सत्वगुण ॥ १२ ॥ यजन आणि याजन । अध्ययन आणि अध्यापन । स्वयें करी पुण्यदान । तो सत्वगुण ॥ १३ ॥ निरूपणाची आवडी । जया हरिकथेची गोडी । क्रिया पालटे रोकडी । तो सत्वगुण ॥ १४ ॥ अश्वदानें गजदानें । गोदानें भूमिदानें । नाना रत्नांचीं दानें । तो सत्वगुण ॥ १५ ॥ धनदान वस्त्रदान । अन्नदान उदकदान । करी ब्राह्मणसंतर्पण । तो सत्वगुण ॥ १६ ॥ कार्तिकस्नानें मा- घस्नानें । व्रतें उद्यापनें दानें । निष्काम तीर्थे उपोषणें । तो सत्वगुण ॥ १७ ॥ सहस्रभोजनें लक्षभोजनें । विविध प्रकारचीं दानें । निष्काम करी सत्व- गुणें । कामना रजोगुण ॥ १८ ॥ तीर्थां अर्पी जो अग्रहारें । बांधी वापी कूप सरोवरें । बांधी देवालयें शिखरें । तो सत्वगुण ॥ १९ ॥ देवद्वारीं पडशाळा । पायऱ्या दीपमाळा । वृंदावनें पार पिंपळा । बांधी तो सत्व- गुण ॥ २० ॥ लावी वनें उपवनें । पुष्पवाटिका जीवनें । निववी तापसि- यांचीं मनें । तो सत्वगुण ॥ २१ ॥ संध्यामठ आणि भुयारीं । पायऱ्या नदीतीरीं । भांडारगृहें देवद्वारीं । बांधी तो सत्वगुण ॥ २२ ॥ नाना दे- वांचीं जीं स्थानें । तेथें नंदादीप घालणें । वाहे अलंकारभूषणें । तो सत्व- गुण ॥ २३ ॥ झंगत मृदंग टाळ । दमामे नगारे काहाळ । नाना वाद्यांचे कल्लोळ । सुस्वरादिक ॥ २४ ॥ नाना सामुग्री सुंदर । देवालयीं घाली नर । हरिभजनीं तत्पर । तो सत्वगुण ॥ २५ ॥ छत्रें आणि सुखासनें । दिंड्या पताका निशाणें । वाहे चामरें सूर्यपानें । तो सत्वगुण ॥ २६ ॥ वृंदावनें तुळसीवनें । रंगमाळा संमार्जनें । ऐसी प्रीति घेतली मनें । तो सत्वगुण ॥ २७ ॥ सुंदर नाना उपकरणें । मंडप चांदवे आसनें । देवालयीं समर्पणें । तो सत्वगुण ॥ २८ ॥ देवाकारणें खाद्य । नाना प्रकारचे नैवेद्य । अपूर्व १. बाह्यात्कारीं. २. देवब्राह्मणांस दिलेला गांव इत्यादि. ३. धर्मशाळा. ४. बागबगीचे. ५. अबदागिरी.

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक) · पृष्ठ 70, कुल 467 में से · BharatKosha