दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 71, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३६ श्रीदासबोध. [ दशक फळें अर्पी सद्यै । तो सत्वगुण ॥ २९ ॥ ऐसी भक्तीची आवडी । नित्य दास्यत्वाची गोडी । स्वयें देवद्वार झाडी । तो सत्वगुण ॥ ३० ॥ तिथि पर्वे महोत्सव । तेथें ज्याचा अंतर्भाव । कायावाचामनें सर्व । अर्पी तो सत्व- गुण ॥ ३१ ॥ हरिकथेसि तत्पर । गंध माळा आणि धूप कर्पूर । घेऊन उभा निरंतर । तो सत्वगुण ॥ ३२ ॥ नर अथवा नारी । यथानुशक्ति सा- मुग्री । येऊन उभी देवद्वारीं । तो सत्वगुण ॥३३॥ महत्कृत्य सांडूनि मागें । देवास ये लागवेगें । भक्ति निकट अंतरंगें । तो सत्वगुण ॥ ३४ ॥ थोरपण सांडूनि दुरी । नीच कृत्य अंगिकारी । तिष्ठत उभा देवद्वारीं । तो सत्वगुण ॥ ३५ ॥ देवालागीं उपोषण । वर्जी तांबूल भोजन । नित्यनेम जप ध्यान । करी तो सत्वगुण ॥ ३६ ॥ शब्द कठिन न बोले । अतिनेमेंसि चाले । योगी जेणें तोषविले । तो सत्वगुण ॥३७॥ सांडूनियां अभिमान । निष्काम करी कीर्तन । स्वेद रोमांच स्फुरण । तो सत्वगुण ॥ ३८ ॥ अंतरीं देवाचें ध्यान । तेणें निडारले नयन । पडे देहाचें विस्मरण । तो सत्वगुण ॥३९॥ हरिकथेसी अति प्रीती । सर्वथा न ये विकृती । अधिक प्रेमा आदि अंतीं । तो सत्वगुण ॥ ४० ॥ मुखीं नाम हातीं टाळी । नाचत बोले बिरुदावळी । घेउनि लावी पायधुळी । तो सत्वगुण ॥ ४१ ॥ देहाभिमान गळे । विषयीं वैराग्य प्रबळे । मिथ्या माया ऐसें कळे । तो सत्वगुण ॥ ४२ ॥ कांहीं क- रावा उपाय । संसारीं गुंतोनि काय । उकलवी ऐसें हृदय । तो सत्वगुण ॥ ४३ ॥ संसारासि त्रासे मन । कांहीं करावें भजन । ऐसें मनीं उठे ज्ञान । तो सत्वगुण ॥ ४४ ॥ असतां आपुले आश्रमीं । अत्यादर नित्यनेमीं । सदा प्रीति लागे रामीं । तो सत्वगुण ॥ ४५ ॥ सकळांचा आला वीट । परमार्थी जो निकट । आघातीं उपजे धारिष्ट । तो सत्वगुण ॥ ४६ ॥ सर्वकाळ उदा- सीन । नाना भोगीं विटे मन । आवडे भगवद्भजन । तो सत्वगुण ॥ ४७ ॥ पदार्थां न बैसे चित्त । मनीं आठवे भगवंत । ऐसा दृढ भावार्थ । तो सत्व- गुण ॥ ४८ ॥ अंतरीं स्फूर्ति स्फुरे । स्वस्वरूपीं तर्क भरे । नष्ट संदेह निवारे । तो सत्वगुण ॥ ४९ ॥ लोक बोलती विकारी । तरी अधिक प्रेमा धरी । निश्चय बाणे अंतरीं । तो सत्वगुण ॥ ५० ॥ शरीर लावावें कारणीं । साक्षेपें १. तत्काळ, उत्कंठेनें. २. निश्चळ झाले, एकाग्र झाले. ३. वीट. ४. उत्कंठा.