भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 72, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 72

२ रा. ] सत्वगुणनिरूपण. ३७ उठे अंतःकरणीं । सत्वगुणाची करणी । ऐसी असे ॥५१॥ शांति क्षमा आणि दया । निश्चय उपजे जया । सत्वगुण जाणावा तया- । अंतरीं आला ॥५२॥ आले अतित अभ्यागत । जाऊं नेदी जो भुकिस्त । यथाशक्ति दान देत । तो सत्वगुण ॥ ५३ ॥ तडींतोपडीं । दैन्यवाणे । आले आश्रमाचेनि गुणें । तयांलागीं स्थळ देणें । तो सत्वगुण ॥ ५४ ॥ आश्रमीं अन्नाची आपदा । परी विमुख नव्हे कदा । शक्त्यनुसार दे सर्वदा । तो सत्वगुण ॥ ५५ ॥ जेणें जिंकिली रसना । तृप्त जयाची वासना । जयासि नाहीं कामना । तो सत्वगुण ॥ ५६ ॥ होणार तैसें होत जात । प्रपंचीं झाला आघात । डळ- मळीना ज्याचें चित्त । तो सत्वगुण ॥ ५७ ॥ एका भगवंताकारणें । सर्व सुख सोडिलें जेणें । केलें देहाचें सांडणें । तो सत्वगुण ॥ ५८ ॥ विषयीं धांवे वासना । परी तो कदा डळमळीना । ज्याचें धारिष्ट चलेना । तो सत्व- गुण ॥ ५९ ॥ देह आपदेनें पीडिला । क्षुधेतृषेनें बोसावलां २ । तरी निश्चय राहिला । तो सत्वगुण ॥ ६० ॥ श्रवण आणि मनन । निजध्यासें समा- धान । शुद्ध झालें आत्मज्ञान । तो सत्वगुण ॥ ६१ ॥ सकळांसि नम्र बोले । मर्यादा धरून चाले । सर्व जन तोषविले । तो सत्वगुण ॥ ६२ ॥ जयासि अहंकार नसे । नैराश्यता विलसे । जयापाशीं कृपा वसे । तो सत्वगुण ॥ ॥ ६३ ॥ सकळ जनांसि आर्जव । नाहीं विरोधासी ठाव । परोपकारीं वेंची जीव । तो सत्वगुण ॥६४॥ आपकार्याहूनि जीवीं । परकार्यसिद्धि करावी । मरून कीर्ति उरवावी । तो सत्वगुण ॥ ६५ ॥ परावयाचे दोष गुण । दृष्टीस देखे आपण । समुद्राऐसी सांठवण । तो सत्वगुण ॥ ६६ ॥ नीच उत्तर साहणें । प्रत्युत्तर न देणें । आपुला क्रोध सांवरणे । तो सत्वगुण ॥ ६७ ॥ अन्यायेंविण गांजिती । नानापरी पीडा करिती । तितकेंही सांठवी चित्तीं । तो सत्वगुण ॥ ६८ शरीरें झीज साहणें । दुर्जनासि मिळोन जाणें । निंद- कास उपकार करणें । तो सत्वगुण ॥ ६९ ॥ मन भलतीकडे धांवे । तें विवेकें आंवरावें । इंद्रियदमन करावें । तो सत्वगुण ॥ ७० ॥ सत्क्रिया आचरावी । असत्क्रिया त्यागावी । वाट भक्तीची धरावी । तो सत्वगुण ॥ ७१ ॥ जया आवडे प्रातःस्नान । आवडे पुराणश्रवण । नानामंत्रों देव- १. तपस्वी, भिक्षु. २. कासावीस झाला.