दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 73, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंत्तार्चन । करी तो सत्वगुण ॥ ७२ ॥ पर्वकाळीं अतिसादर । वसंतपूजेसि तत्पर । जयंत्याद्रि प्रीति थोर । तो सत्वगुण ॥ ७३ ॥ विदेशीं मेलें मरणें । तयासि संस्कार देणें । अथवा सादर होणें । तो सत्वगुण ॥ ७४ ॥ कोणी एकास मारी । तयासि जाऊन निवारी । जीव बंधनमुक्त करी । तो सत्व- गुण ॥ ७५ ॥ लिंगलाखोळी अभिषेक । नामस्मरणीं विश्वास । देव- दर्शनीं अवकाश । तो सत्वगुण ॥ ७६ ॥ संत देखोनि धांवे । परमसुख हेलांवे । नमस्कारी सर्वभावें । तो सत्वगुण ॥ ७७ ॥ संतकृपा होय जयांस । तेणें उद्धरिला वंश । जो ईश्वराचा अंश । तो सत्वगुण ॥ ७८ ॥ सन्मार्ग दाखवी जना । जो लावी हरिभजना । ज्ञान शिकवी अज्ञाना । तो सत्व- गुण ॥ ७९ ॥ आवडे पुण्यसंस्कार । प्रदक्षिणा नमस्कार । जया राहे पाठां- तर । तो सत्वगुण ॥ ८० ॥ भक्तीचा हव्यास भारी । ग्रंथसामुग्री जो करी । धातुमूर्ति नानापरी । पूजां तो सत्वगुण ॥ ८१ ॥ झळझळीत उपकरणें । माळा गवाळीं आसनें । पवित्र सोवळ वसनें । तो सत्वगुण ॥ ८२ ॥ पर- पीडेचें वाहे दुःख । परसंतोषाचें सुख । वैराग्य देखोनि मानी हरिखें । तो सत्वगुण ॥ ८३ ॥ परभूषणीं भूषण । परदूषणीं दूषण । परदुःखीं शिणे जाण । तो सत्वगुण ॥ ८४ ॥ आतां असो हें बहुत । देवधर्मीं ज्याचें चित्त । भजे कामनारहित । तो सत्वगुण ॥ ८५ ॥ ऐसा हा सत्वगुण सात्विक । संसार- सागरीं तारक । येणें उपजे विवेक । ज्ञानमार्गाचा ॥ ८६ ॥ सत्वगुणें भगव- द्भक्ती । सत्वगुणें ज्ञानप्राप्ती । सत्वगुणें सायुज्यमुक्ती । पाविजे ते ॥ ८७ ॥ ऐसी सत्वगुणाची स्थिति । स्वल्प बोलिलों यथामती । सावध होऊनि श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ८८ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशक सत्वगुणनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. सद्विद्यानिरूपण. श्रीगणेशाय नमः ॥ ऐका सद्विद्येचीं लक्षणें । परम शुद्ध सुलक्षणें । वि- चार घेतां वळेचि बाणे । सद्विद्या अंगीं ॥ १ ॥ सद्विद्येचा जो पुरुष । तो उत्तम लक्षणीं विशेष । त्याचे गुण ऐकतां संतोष । विशेष वाटे ॥ २ ॥
१. भरून येई. २. वस्त्रं. ३. हर्ष.