दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 80, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३ रा. ] जन्मदुःख. ४५ करी । पुन्हां त्याची आशा धरी । तो एक पढतमूर्ख ॥ ३२ ॥ होत असतां श्रवण । देहास आलें उणेपण । क्रोधें करी चिणचिणें । तो एक पढतमूर्ख ॥ ॥ ३३ ॥ भरोनि वैभवाचे भरीं । सद्गुरूची उपेक्षा करी । गुरुपरंपरा चोरी । तो एक पढतमूर्ख ॥ ३४ ॥ ज्ञान बोलोनि करी स्वार्थ । कृपणाऐंसा सांची अर्थे । अर्थासाठीं लावी परमार्थ । तो एक पढतमूर्ख ॥ ३५ ॥ वर्तल्याविण शिकवी । ब्रह्मज्ञान लावणी लावी । पराधीन गोसावी । तो एक पढतमूर्ख ॥ ३६ ॥ भक्तिमार्ग अवघा मोडे । आपणांमध्यें उर्पंडरें पडे । ऐसिये कर्मीं पंवोडे । तो एक पढतमूर्ख ॥ ३७ ॥ प्रपंच गेला हातींचा । लेश नाहीं पर- मार्थाचा । द्वेषी देवाब्राह्मणाचा । तो एक पढतमूर्ख ॥ ३८ ॥ त्यागावया अवगुण । बोलिलों पढतमूर्खांचें लक्षण । विचक्षणीं न्यूनपूर्ण । क्षमा केली पाहिजे ॥ ३९ ॥ परम मूर्खांमाजी मूर्ख । जो या संसारीं मानी सुख । या संसारदुःखा ऐसें दुःख । आणिक नाहीं ॥ ४० ॥ तेंचि पुढें निरूपण । जन्मदुःखांचें लक्षण । गर्भवास हा दारुण । पुढें निरूपिला ॥ ४१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके पढतमूर्खलक्षणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ४८० ॥ शुभं भवतु ॥ दशक तिसरा. जन्मदुःख. श्रीगणेशाय नमः ॥ जन्म दुःखाचा अंकुर । जन्म शोकाचा सागर । जन्म भयाचा डोंगर । चलेना ऐसा ॥ १ ॥ जन्म कर्माची आटणी । जन्म पातकाची खाणी । जन्म काळाची जाचणी । नित्य नवी ॥ २ ॥ जन्म कुविद्येचें फळ । जन्म लोभाचें कमळ । जन्म भ्रांतीचें पेंडळ । ज्ञानहीन ॥ ३ ॥ जन्म जीवासि बंधन । जन्म मृत्यूस कारण । जन्म हेंचि अकारण । गाथांगोंवी ॥ ४ ॥ जन्म सुखाचा विसर । जन्म चिंतेचा आगर । जन्म वासनाविस्तार । विस्तारला ॥ ५ ॥ जन्म जीवाची अवदसा । जन्म १. फुसफुस. २. सांठवितो. ३. द्रव्य. ४. अव्यवस्था. ५. शिरतो. ६. पंडी- तांनीं. ७. मूळ. ८. पडदा. ९. गुंतागुंत.