दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 81, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें४६ श्रीदासबोध. [ दशक कल्पनेचा ठसा । जन्म लावेचा वे¹ळसा । ममतारूप ॥ ६ ॥ जन्म मायेचें मै²दावें । जन्म क्रोधाचें वि³रांवें । जन्म मोक्षास आडवें । विघ्न आहे ॥ ७ ॥ जन्म जीवाचें मीपण । जन्म अहंतेचा गुण । जन्म हेंचि विस्मरण । ईश्व- राचें ॥ ८ ॥ जन्म विषयाची आवडी । जन्म दुराशेची बेडी । जन्म काळाची कांकडी । भक्षिताहे ॥ ९ ॥ जन्म हाचि विषम काळ । जन्म हेचि वोखटी वेळ । जन्म हें अति कु⁴श्चळ । नरकपतन ॥ १० ॥ पाहतां शरी- राचें मूळ । या ऐसें नाहीं अमंगळ । रजस्वलेचा जो विटाळ । त्यामध्यें जन्म यासी ॥ ११ ॥ अत्यंत दोष ज्या विटाळा । त्या विटाळाचाचि पुतळा । तेथें निर्मळपणाचा सोहळा । केवीं घडे ॥ १२ ॥ रजस्वलेचा जो विटाळ । त्याचा आळोनि झाला गाळ । त्या गाळाचेंच केवळ । शरीर हें ॥ १३ ॥ वरीवरी दिसे वैभवाचें । अंतरीं पोतडें नरकाचें । जैसें झांकण चर्मकुंडाचें । उघडितांचि नये ॥ १४ ॥ कुंड धुतां शुद्ध होतें । यास प्रत्यहीं धुइजेते । तरी दुर्गंधि देहातें । शुद्धता न ये ॥ १५ ॥ अस्थिपंजर उभाविला । शिरा- नाडीं गुंडाळिला । मेदें⁵मांसें सरसाविला । सांदोसांदीं भरोनी ॥ १६ ॥ अ⁶शुद्ध शब्दें शुद्ध नाहीं । तेंही भरलें असे देहीं । नाना व्याधि दुःखें तीं- ही । अभ्यंतरीं वसती ॥ १७ ॥ नरकाचें कोठार भरलें । आंत बाहेरी लिडबिडिलें । मूत्रपोतडें जमलें । दुर्गंधि करूनी ॥ १८ ॥ जंत किडे आणि आंतडीं । नाना दुर्गंधीचीं पोतडीं । अ⁷मूप लथवथती कातडीं । कंटाळ- वाणीं ॥ १९ ॥ सर्वांगास शिर प्रमाण । तेथें ब⁸ळसे वाहे घ्राण । उठे घाणी फुटतां श्रवण । ते दुर्गंधि न घेववे ॥ २० ॥ डोळां निघती चिपडें । नाकीं दाटली मेकडें । प्रातःकाळीं घाणी पडे । मुखीं मळासारिखी ॥ २१ ॥ लाळ थुंका आणि मळ । पित्त श्लेष्मा⁹ प्रबल । तयास म्हणती मुखकमळ । चंद्रा- सारिखें ॥ २२ ॥ मुख ऐसें कुश्चिळें दिसे । पोटीं विष्ठा भरली असे । प्रत्य- क्षास प्रमाण नसे । भूमंडळीं सर्वथा ॥ २३ ॥ पोटीं घालितां दिव्यान्न । कांहीं विष्ठा कांहीं वमन । भागीरथीचें घेतां जीवन । त्याची होय लघु- शंका ॥ २४ ॥ एवं मळ मूत्र आणि वं¹⁰मन । हेंचि देहाचें जीवन । येणेंचि १. फेरा, झपाटा. २. फसवणूक. ३. शौर्य. ४. घाणेरडें. ५. वसा, चरबी यांनीं. ६. रक्त. ७. पुष्कळ. ८. शेंबूड. ९. कफ. १०. ओक.