दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 86, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें३ रा. ] जन्मदुःख. ५१ व्यवसायीं क्रमेनों । हुरहुर वाटे ॥ ४४ ॥ व्यवसाय करितां बाहेरी । मन लागलेंसें घरीं । क्षणक्षणा अभ्यंतरीं । स्मरण होय कामिनीचें ॥ ४५ ॥ तु- ह्मी माझिया जिवांतील जीव । म्हणोनि अत्यंत लाघवें । दाउनियां चित्त सर्व । हिरूनि घेतलें ॥ ४६ ॥ मैंदें सोयरीक काढिती । फांसे घालोनि प्राण घेती । तैसें आयुष्य गेलिया अंतीं । प्राणियास होय ॥ ४७ ॥ प्रीति कामि- नीसि लागली । जरी तियेसि कोणी रागेजली । तरी परम क्षिती वाटली । मानसीं गुतरूपें ॥ ४८ ॥ तये भार्येचेनि कैवारें । मायबापांसी नीच उत्तरें । बोलेनियां तिरस्कारें । वेगळा निघे ॥ ४९ ॥ स्त्रीकारणें लाज सांडिली । स्त्रीकारणें सखीं सोडिलीं । स्त्रीकारणें बिघडलीं । सकळही जिवलगें ॥ ५० ॥ स्त्रीकारणें देह विकिला । स्त्रीकारणें सेवक जाहला । स्त्रीकारणें सांडविला । विवेकासी ॥ ५१ ॥ स्त्रीकारणें लोलंगतां । स्त्रीकारणें अतिनम्रता । स्त्रीकारणें पराधीनता । अंगिकारिली ॥ ५२ ॥ स्त्रीकारणें लोभी जाहला । स्त्रीकारणें ध- र्म सांडिला । स्त्रीकारणें अंतरला । तीर्थयात्रा स्वधर्म ॥ ५३ ॥ स्त्रीकारणें सर्वथा कांहीं । शुभाशुभ विचारिलें नाहीं । तन मन धन सर्वही । अनन्य- भावें अर्पिलें ॥ ५४ ॥ स्त्रीकारणें परमार्थ बुडविला । प्राणी स्वहितासि नागवला । ईश्वरीं कानकोंडा जाहला । स्त्रीकारणें कामबुद्धी ॥ ५५ ॥ स्त्री- कारणें सोडिली भक्ती । स्त्रीकारणें सोडिली विरक्ती । स्त्रीकारणें सायुज्यमु- क्ती । तेही तुच्छ मानिली ॥ ५६ ॥ एके स्त्रियेचेनि गुणें । ब्रह्मांड मानिलें उणें । जिवलगें तीं पिसुणें । ऐसीं वाटलीं ॥ ५७ ॥ ऐसी अंतरीं प्रीति ज- डली । सर्वस्वाची सांडी केली । तंव ते मरोनि गेली । अकस्मात भार्या ॥ ५८ ॥ तेणें मनीं शोक वाटिला । म्हणे थोर घात झाला । आतां कैंचा बुडा- ला संसार माझा ॥ ५९ ॥ जिवलगाचा सोडिला संग । अवचितां झाला घरेंभंग । आतां करूं देहत्याग । म्हणे दुःखें ॥ ६० ॥ स्त्री घेऊनि आडवी । ऊर बडवी पोट बडवी । लाज सांडोनि गौरवी । लोकां देखतां ॥ ६१ ॥ म्हणे माझें बुडालें घर । आतां न करीं हा संसार । दुःखें ओंकंदे थोर । घोर १. करमेना. २. दिखाऊ प्रीति. ३. घातकी, फांसेगार. ४. खंती. ५. अंतरलीं. ६. आसक्ति. ७. चोरटा. ८. ब्रह्मनिर्वाण. ९. शत्रु. १०. संसाराची नासाडी. ११. ओरडूं लागला.