दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 87, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें५२ श्रीदासबोध. [ दशक घेणें ॥ ६२ ॥ तेणें जीव वार्यो¹ वेधला । संसाराचा डबगें² आला । तेणें दुः- ख झाला । जोगी कां महात्मा ॥ ६३ ॥ कां तें निघोन जाणें चुकलें । पुनः मागुतें लग्न केलें । तेणें अत्यंतचि निमग्न झालें । मन द्वितीयसंबंधीं ॥ ६४ ॥ जाहला द्वितीय संबंध । सवेंचि मानिला आनंद । श्रोतीं व्हावें सावध । पुढिलिये समासीं ॥ ६५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके प्रथमसंबंधनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ ३. द्वितीयसंबंध. श्रीगणेशाय नमः ॥ द्वितीय संबंध जाहला । दुःख मागील विसरला । सुख मानोनि राहिला । संसाराचें ॥ १ ॥ झाला अत्यंत कृपण । पोटा न खाय अन्न । ³पैक्याकारणें सोडी प्राण । ⁴ऐकसरा ॥ २ ॥ कदा कल्पांतीं न वंची⁵ । संचिलेंचि पुनः साँची⁶ । अंतरीं असेल कैंची । सद्वासना ॥ ३ ॥ स्वयें धर्म न करी । धर्मकर्त्यासही वारी⁷ । सर्वकाळ निंदा करी । साधु- जनांची ॥ ४ ॥ नेणे तीर्थ नेणे व्रत । नेणे अतीत अभ्यागत । मुंगी- मुखींचें शीत । तेंही वेंचून⁸ साँची ॥ ५ ॥ स्वयें पुण्य करवेना । केलें तरी देखवेना । उपहास करी मना । न ये म्हणोनि ॥ ६ ॥ देवां भ- क्तांस उच्छेदी । अंगबळें सकळांसि खेदी । निष्ठुर शब्दे अंतर भेदी । प्राणि- मात्रांचें ॥ ७ ॥ नीति सांडोनि मागें । अनीतीनें वर्तों लागे । गर्व धरून फुगे । सर्वकाळ ॥ ८ ॥ पूर्वजांसि सिंतरलें⁹ । पक्ष श्राद्ध नाहीं केलें । कुळदैवत टाकिलें । कोणे परी ॥ ९ ॥ अक्षतें¹⁰ भैरली भाणीं । दुजा ब्राह्मण मेहुणा । आला होता पाहुणा । स्त्रियेसि मूळ ॥ १० ॥ कदा नावडे हरिकथा । देव नलगे सर्वथा । स्नान संध्या म्हणे वृथा । कासया करावी ॥ ११ ॥ अभिलाषें सांची वित्त । स्वयें करी विश्वासघात । मदें मातला उन्मत्त । तारुण्यपणें ॥ १२ ॥ तारुण्य अंगीं भरभरलें । धारिष्ट न वचे धरिलें । करूं नये तेंचि केलें । महापाप ॥ १३ ॥ स्त्री केली परी धाकुटी । धीर न धरवे पोटीं । विषयलोभें शेवटीं । वोळखी १. वायुचक्रासारखा भ्रसूं लागला. २. कंटाळा. ३. पैकरितां. ४. एकदम. ५. खर्च करी. ६. सांठवितो. ७. आडवा येतो. ८. निवडून, टिपून. ९. ठकाविलें. १०. बहिणीला केंस भरली, सवाष्ण बोलाविली.