सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 107, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ७९ हुंबरी-अभंग १ १५३ तुझीं कोण घाली हुंबरी । साही पांगल्या अठरा चारी ॥ १ ॥ सहस्र मुखावरी हरी । शेष शिणविलें ॥ २ ॥ चेंडुयासवें घातली उडो । नाथिला काळिया देउनि बुडी ॥ ३ ॥ अशुद्ध पीता करुणा नाहीं । तुवां माउशी ही मारियेली ॥ ४ ॥ रावणाचें घर बुडविलें सारें । त्याचीं रांडापोरें मारियेलीं ॥ ५ ॥ जाणों तो ठावा आहेसि आम्हां । तुवां आपुला मामा मारियेला ॥ ६ ॥ याशीं खेळतां नाश थोरू । तुक्यास्वामी सारंगधरू ॥ ७ ॥ शब्दार्थ व टीपा :- हुंबरी-तोडाने एका प्रकारपा आवाज करून खेळावयापा खेळ, साही-सहा शास्त्रे, अठरा-अठरा पुराणे, चारी-चार वेद, शेष-नाग, नाथिला-कपटी केला, अशुद्ध-रक्त, माउशी-पूतना मावशी, मामा-कस, सारंग-एव' धनुष्य. अर्थ :- देवा, तुझ्याशी हुंबरीचा खेळ कोण रे खेळू शकणार ? तुझे सामर्थ्य वर्णन करताना चार वेद, सहा शास्त्रे व अठरा पुराणेही थकली. १ हरी, एवढा सहस्र मुखाचा शेषनाग, तोही तुझे वर्णन करताना शिणून गेला. २ गोकुळात यमुनेच्या तीरावर चेंडूफळीचा खेळ खेळत असताना चेंडु यमुनेच्या डोहात पडला, तेव्हा तूच यमुनेत उडी घेतलीस व तेथील दुष्ट कालिया नागाचा पराभव केलास. ३ तुला मारण्यासाठी स्तनाना विष लावून ती पूतना मावशी आली असताना तू तिचे रक्त प्राशन करून तिला मारलेस. तुला कशी करुणा अगदी येत नाही रे ? ४ रामावताराच्या वेळी तू त्या रावणाचे घर बुडविलेस, त्याची बायकामुले मारून टाकलीस. ५ तू किती कठिण हृदयाचा आहेस हे आम्हास माहित आहे. या अवतारात तू आपल्या कंस मामालाही ठार मारलेस. ६ तुकाराम महाराज म्हणतात, सारंग नावाचे धनुष्य धारण करणाऱ्या या ईश्वराशी खेळ खेळताना असाच मोठा नाश होतो. कधी देहाहम्बुद्धीच्या वृत्तीचा नायनाट होतो. ७ हमामा-अभंग २ १५४ मझीं पोरा घे रे बार । तुझें बुजीन खालील द्वार ॥ १ ॥ पोरा हमामा रे हमामा रे ॥ २ ॥ मझीं हमामा तूं घालीं । पोरा वरी सांभाळीं खालीं ॥ ३ ॥ तरीच मझीं बोल । पोरा जिव्हाळघाची ओल ॥ ४ ॥ मझीं घेता भास । जीवा मीतूपणा नास ॥ ५ ॥ मज सर्वै खरा । पण जाऊं नेदी घरा ॥ ६ ॥ आमुचिये रंगीं । तुजें तगे ना ये संगीं ॥ ७ ॥ तुक्यासवें भास । हरी जीवा करी नास ॥ ८ ॥