सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 106, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें७८ सार्थ तुकारामगाथा अर्थ :- या फुगडीमध्ये देहादी वृत्तींच्या मागे लागणाऱ्या सवतीशी तू गडी फू कर. त्याच्या नादाने जो वाईट क्रियाकर्म झाली ती तुलाच धुवून काढावी लागतील. नाही तर तुझ्या ढुंगणावर व तोंडावर आम्ही थुंकू. १ ही प्रपंचरूप फुगडी खेळताना तुला जरी पराभव झाल्यासारखा वाटला तरी सर्व जगाशी संबंध ठेवणाऱ्या नवऱ्या मुलीप्रमाणे तू होऊ नकोस. ऊठ, सावध होऊन त्या श्रीहरीस शरण जा. २ ही आजची वेळ जर जाईल तर तुझे हातपाय ढिले पडतील. तू वाटेल तशी वागलीस तर तुझ्या अंगास फक्त मातीच लागेल. ३ तू सप्तधातू व पंच- महाभूते यांना जिंकून आणल्याखेरीज या प्रपंचरूप फुगडीत टिकणार नाहीस पोरी ४ आताच पहा, तुझ्या अंगातील सर्व शक्ती संपली असून तुझे पायही पांगुळले आहेत. तरी अजूनही तू या प्रपंचात काय घोळून राहिली आहेस? गुरफटून राहिली आहेस ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, हे गधडे, अजून तरी मी जे सांगतो आहे ते कर ना ६
लखोटा-अभंग १
१५२ लये लये लखोटा । मूळबंर्दि कासोटा । भावा केलें साह्यें । आतां माझें पाहें ॥ १ ॥ हातोहातीं गुंतली । जीवपणा मुकली । धीर माझा निका । सांडीं बोल फिका ॥ २ ॥ अंगीकारी हरि । नको पडों फेरी । लाज धरीं झांडे । जग झोडी रांडे ॥ ३ ॥ बैस भावा पाठीं । ऐक माझ्या गोष्टी । केला सांडीं गोहो । येथें धरीं मोहो ॥ ४ ॥ पाठमोरा डोल । आवरी तें बोल । पांगलीस बाळा । पुढें अवकळा ॥ ५ ॥ आतां उभी ठायीं । उभाउर्भी पाहीं । नको होऊं डुकरी । पुढें गाढव कुतरी ॥ ६ ॥ नामा केलें खरें । आपुलें म्या घरें । तुका म्हणे येरी । पांगविल्या पोरी ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा :- लये-अनुसंधानाची एकरूपता निका-उत्तम, झांड-निलाजरी, गोहो-पती, डोल-रूप.
अर्थ - योगमार्गातील मूळबंधादि क्रियांचा कासोटा घालून व सर्व वृत्तींच्या अनुसंधानाचा परमेश्वराशी लय साधून मी ही लखोट्याची क्रीडा करीत आहे. माझ्या भाववृत्तींचे साह्य मी घेतले असल्यामुळे माझी क्रीडा आता पाहाच. १ माझी वृत्ती आता जीवपणास मुकून ताबडतोब ईश्वरस्वरूपातच गुंतून राहिली. माझे धैर्य पाहा किती उत्तम आहे उगाच पोकळ बडबड तू आता सोडून दे. २ तूही याच श्रीहरीचा अंगिकार कर. उगाच जन्म- मरणाच्या फेऱ्यात अडकू नकोस. साऱ्या जगाची उठाठेव करणाऱ्या रांडे, भाडतोर वये, थोडीशी तरी लाज तू मनात धर ना. ३ तू श्रीहरीच्या भक्तीचाच फक्त आश्रय कर; माझी गोष्ट ऐक नीट. देहाभिमानाचा तू जो पती केला आहेस तो सोडून टाक; व या श्रीहरीच्या ठिकाणीच प्रेम ठेव. ४ पाठमोरी होशील तर तुझी अवस्था कठीण होईल. तुला कंप सुटेल, व्यर्थ बडबड तुला आवरावी लागेल व बाळे, बाह्य वृत्तींत तू रमून राहशील तर पुढे फार कठीण स्थिती प्राप्त होईल. ५ आताच या ठिकाणी उभी आहेस तोच त्या श्रीहरीकडे जा. उगाच पुढे डुक्कर, गाढव, कुत्री यांच्या जन्मास जाऊ नकोस. ६ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीच्या नामाने माझे मी कल्याण करून घेतले आहे; पण इतर मुली मात्र त्यांचे चित्त देहावर व प्रपंचावर असल्यामुळे पळून गेल्या. ७