सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 110, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें८२ सार्थ तुकारामगाथा कांडाशामध्ये मी-तूषणाचा दुजाभाव निर्माण झालेला नाही तोपर्यंत हे कांडण कांडताना कुठलाच त्रास होणार नाही. ४ तुकाराम महाराज म्हणतात, जसा आरसा असेल तसेच आपले रूप त्यात उमटेल त्याप्रमाणे जशी आपली तयारी असेल तसा परमात्मस्वरूपाच्या स्वानुभूतीचा स्वयंपाक शुद्ध व सात्त्विक होईल. ५
आडसण-दळण-अभंग १
१५९ शुद्धीचें सरोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाम केलें ॥ १ ॥ आडसोनि शुद्ध करीं वो साजणी । सिद्ध कां पापिणी नासियेलेँ ॥ २ ॥ सुपीं तोंचि पाहें घड उगटिलें । नव्हतां नासिलें जगझोडी ॥ ३ ॥ सुपीं तोंचि आहे तुज तें आधीन । दळिल्या जेवण जैसें तैसें ॥ ३ ॥ सुपीं तोंचि संग घेई घडकुडी । एकसा घडडी नास केला ॥ ५ ॥ दळितां आदळे तुज कां न कळे । काय गेले डोळे कान तुझे ॥ ६ ॥ सुपीं तोंचि वोज न करितां सायास । पडसी सांदीस तुका म्हणे ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा :- आडसण-सुपाने वेगळे काढलेले स्वच्छ दाणे; उगटिले-वाईट; घडकुडो-खरोखर; वोज- काळजी; सांदीस-कोपऱ्यात.
अर्थ :- शुद्ध केलेले दळण बाजूस सारून उरलेले जात्याच्या पाळीत भरून ठेवले व हे ओंगळ किंवा वाईट असणारे प्रभूच्या नामाने भरडून काढले. १ हे साजणी, आता तू हे दळण आडसून नीट स्वच्छ करून ठेव. पापिणी, हे चांगले तयार होत असलेले दळण तू नाश करू नकोस. २ जोपर्यंत हे सुपात आहे, तोपर्यंत तू ते चांगलें की वाईट हे नीट पाहा नाही तर निलाजरे बये, तू सर्वांचाच नाश करून टाकशील ३ जोपर्यंत हे दळण सुपात आहे, जोवर जीव देहात आहे तोपर्यंत तुझी त्यावर सत्ता आहे; मग मात्र, म्हणजे दळण संपल्यावर मात्र कर्मगतीप्रमाणेच तुला त्याचे भोजनरूपाने फळ मिळेल. ४ तेव्हां बरोबर, हे दळण सुपात आहे तोच त्याची संगत धरून नीट त्याचे रूप ओळखून घे. नाही तर गधडे, या मनुष्यदेहाचा नाश करशील. ५ नाही तर देहात्मबुद्धीचे दळण दळतानाच अनेक वेळा मग जन्ममृत्यूंच्या चक्रात सापडावे लागेल. नीट ध्यानात घे. तुझे कान व डोळे गेलेले नाहीत ना ? ६ जोपर्यंत हे दळण सुपात आहे, जोपर्यंत देह कायम आहे तोपर्यंतच तू त्याची नीट काळजी घे. फार श्रम न करता तू याला नीट जप; नाही तर अनेक जन्मांच्या कोपऱ्यात मात्र उगाच तू पडून राहशील. ७
दळण-अभंग १