सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 111, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ८३ नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, हे शुद्ध दळण सर्वांनाच आवडते आणि ज्या स्त्रीस हे दळण पसंत पडते तिला आपल्या जिवास या श्रीहरीश्वतारापासून कधीही वेगळे राहावत नाही ५ १६१ उपजोनिया पुढती येऊ । काला खाऊ दहीभात ॥ १ ॥ वैकुंठीं तो ऐसे नाहीं । कवळ काहीं काल्याचे ॥ २ ॥ एकमेका देऊ मुखीं । सुखीं घालू हुबरी ॥ ३ ॥ तुका म्हणे वाळवट । बरवे नीट उत्तम ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - उपजोलिया-पुन जन्म घेऊन अर्थ - पुन पुन जन्म घ्यावा लागला तरी हरकत नाही, पण हा काला व दहीभात आपण मोठ्या प्रेमाने खाऊ १ कारण वैकुंठलोकीसुद्धा हे सुख नाही काल्याच्या घासाचे सुख तेथे कुठून असणार? २ हे घास आपण एकमेकाच्या तोंडात देऊ व मग सुखाने हुवरीचा खेळ खेळू ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा काल्याचा खेळ खेळाबला हे बाळवट फार चांगले आहे ४ १६२ याल तर या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥ १ ॥ आजि देतो पोटभरी । पुरे म्हणाल तोवरी ॥ २ ॥ हळ हळू चला । कोणी कोणाशी न बोला ॥ ३ ॥ तुका म्हणे साडा घाटें । तेणे नका भरू पोटें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लागें- लागलीच, घाटे- फोलकटे अर्थ - गोपाळांनो, यायचेच असेल तर लागलीच सर्वजण माझ्या मागोमाग या १ आज मी तुम्हाला काल्याचा प्रसाद पुरे पुरे म्हणाल तोपर्यंत पोटभर देणार आहे २ पण अगदी पाय न वाजविता हळूहळू चला, कुणाशीही एक शब्द बोलू नका ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व फोलकटे सोडून द्या त्यानी काही तुमचे पोट भरणार नाही ४ १६३ शिके लावियेलें दुरी । होतो तिघाचे मी वरी ॥ १ ॥ तुम्ही व्हा रे दोहींकडे । मुख पसरूनि गडे ॥ २ ॥ वाहाती त्या धारा । घ्यारे दोहोंच्या कोपरा ॥ ३ ॥ तुका म्हणे हातीं टोका । अधिक उणे नेदी एका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुरी-उच, टोका-पाहा अर्थ - गोपाळानो, आज त्या गवळणीने हे शिके फार उच लावले आहे काही हरकत नाही तुम्ही एक- मेकाच्या खाद्यावर असे तिघेजण उभे राहा मी तुमच्या खाद्यावर चढून ते दहीदूध काढतो १ तुम्ही मात्र माझ्या दोन्ही बाजूस तोंड उघडून तयार असा २ माझ्या दोन्ही हाताच्या कङानी दह्यादुधाच्या धारा वाहतील त्या नीट पाहा ३ तुकाराम महाराज म्हणतात माझ्या हाताकडे पाहा, कुणाला काही कमीजास्त न करता मी सर्वांना सारखाच वाटा देईन ४ १६४ पळाले ते भ्याड । त्यासि येथे जाला नाड ॥ १ ॥ धीट घेती घणीवरी । शिकीं उतरितो हरी ॥ २ ॥ आपुलिया मतीं । पडलीं विचारीं तीं रितीं ॥ ३ ॥ तुका लागे घ्यारे पायां । कं पावाल या ठाया ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - नाड-फसवणूक, रितीं-रिकामी