सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 113, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ८५ १६८ गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी ॥ १ ॥ आम्ही न खेळों न खेळों । आला भाव तुझा कळों ॥ २ ॥ न साहावे भार । बहु लागतो उशीर ॥ ३ ॥ तुका आला रागें । येऊं नेदी मागें मागें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- रडी-चिडून राहिले. अर्थ :- पुष्कळ वेळ यमुनेच्या तीरावर खेळ खेळल्यावर मग गोपाळ रडकुंडीस आले, चिडूनही गेले व म्हणू लागले, कान्होबा, तू आमचा डाव चढूच देत नाहीस, तूच नेहमी जिंकतोस. १ आम्ही काही आता तुझ्याशी खेळणार नाही, तुझी लबाडीची भावना आता आमच्या ध्यानात आली आहे. २ आम्हाला आता या तुझ्या डावाचे ओझे सहन होत नाही व आम्हाला आता उशीरही झाला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे म्हणत एक गोपाळ रागारागाने मागे निघून गेला. हरीला त्याने आपल्या मागे येऊनसुद्धा दिले नाही. ४ हाल-अभंग २ १६९ यमुनेतटीं मांडिला खेळ । म्हणे गोपाळ गडियासि ॥ १ ॥ हाल महाहाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥ २ ॥ नांवें ठेवूनि बांटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥ ३ ॥ तुका म्हणे कान्हो तिळतांदळाचा । जिंके तो करी आपुला खेळचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - हाल-डाव, न वजे-चालणार नाही अर्थ :- श्रीकृष्णाने यमुनेच्या तीरावर खेळ सुरु करुन आपल्या सवंगड्यांना तो म्हणाला, १ चला आपण मोठा खेळ खेळू. डाव मांडू. उगाच व्यर्थ काळ घालवू नका. २ नावे ठेवून गडी वाटून घ्या; म्हणजे मग नंतर कुणाला रडी करायला जागा सापडणार नाही. कुणाची तक्रार चालणार नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या कान्होबाने कामक्रोधरूपी तिळातांदुळाची बोलीसुकी करुन त्याने डाव जिंकला व त्याने आपला खेळ सुरु केला. ४ १७० बळें डांईं न पडे हरी । बुद्धि करी शाहणा तो ॥ १ ॥ मोकलें देवा खेळों द्यावें । सम भावें सांपडाव्या ॥ २ ॥ येतो जातो वेळोवेळां । न कळे कळा सांपडती ॥ ३ ॥ तुका म्हणे घरा ठायींच्या ठायीं । मिठी जीवीं पायीं घालुनियां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कळा-युक्ती. अर्थ :- मोठ्या बळाने श्रीहरीला पकडण्याचा प्रयत्न करावा तर तो सापडत नाही. म्हणून बुद्धिकौशल्य वापरुन जो त्याला पकडील तोच शहाणा ठरेल १ या श्रीकृष्णाला मोकळेपणाने खेळू द्यावे व समत्वभावाने त्यास पकडून ठेवावे. २ तो अनेक वेळा हातात सापडतो, अनेक वेळा निसटून जातो; तो कायमचा सापडेल, हाती राहील अशी काय युक्ती आहे हे समजत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याला जागच्या जागीच पकडून ठेवा. त्याच्या पायांशीच जीवाने मिठी घालून राहिले पाहिजे. ४ सुतुतू-अभंग १ १७१ जीवशिवाच्या मांडूनि हाला । अहं सोहं दोन्ही भेडती भला ॥ १ ॥ घाली सुतुतू फिरोनि पाही आपणासि । पाही बळिया तो मागिला तुटी पुढिलासि ॥ २ ॥