भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 117, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 117

सार्थ तुकारामगाथा ८९ अर्थ - श्रीकृष्ण आपल्या एका गोपाळ मित्रास म्हणत आहेत अरे तू इंद्रियरूपी गाई का सोडून दिल्यास ? आता तर त्यांना वळून आणण्याचे काम तुलाच करायचे आहे जा तू, मागच्या खेपेसही तू असेच काम केले होतेस ते तुझ्या ध्यानात नाही का ? १ या कामात कुचराई केलीस तर मात्र तू फजीत पावशील मागे व पुढेही तुझी अवस्था कठीण होईल नित्य काळ तुला शिक्षा करीत असताना तुला त्याची लाज कशी नाही ? २ पुढे जन्ममृत्यूचा जो मोठा वदिस्त करणारा सापळा आहे त्यातून तुला काढणारे कोण आहे ? आधीच ओढाळ म्हणून प्रसिद्ध असणारी तुझी वृत्तीरूपी कालवड धावून जात आहे तिला आवर ३ चल पळ लवकर मी पण तुझ्या मदतीस येतो तुकाराम महाराज म्हणतात, चल ती जोपर्यंत मिळाली नाही तोपर्यंत मीही येतो तुझ्याबरोबर ४ १७८ काय या संतांचे मानूं उपकार । मज निरंतर जागविती ॥ १ ॥ काय देवा यासि व्हावे उतराई । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ २ ॥ सहज बोलणे हित उपदेश । करुनि सायास शिकविती ॥ ३ ॥ तुका म्हणे वत्स धेनुचिया चित्तीं । तैसे मज येती सांभाळित ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सायास-श्रम अर्थ - या साधुसंतांचे उपकार मी आता मानू तरी किती व कसे ? वारंवार उपदेश करून हे मला सावध करीत असतात १ देवा, आता या संतांचे उतराई तरी मी कसे व्हावे ? यांचे उपकार मी कसे फेडू ? यांच्या पायावर मी माझा जीव जरी ओवाळून ठेविला तरी ते थोडेच आहे २ या संतांचे सहजचेच जे बोलणे असते तोच सर्वसामान्य लोकांना हिताचा उपदेश असतो हे सत्पुरुष मोठे परिश्रम घेऊन सर्वांना शिकवीत असतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, एकाद्या गाईच्या मनात ज्याप्रमाणे अखंडत्वाने तिचे वासरूच असते, त्याप्रमाणे हे सत्पुरुष मला एकसारखे चित्तात बाळगून सांभाळीत असतात ४ विवरण - वारकरी पंथात किंवा भागवत संप्रदायात दयाइतकेच महत्त्व संतांनाही आहे 'संत ते देव देव ते संत' अस एकनाथाना एका अभंगात म्हटलं आहे संत सहवासाचे, त्यांच्या दर्शनाचे फार मोठे सुख आपणास होत देव भेटल्याची अनुभूती संतांच्या सहवासात तुकारामादिकांनाही फार मोठी येत असे या एका अभंगात तुकारामांनी संतांचे माहात्म्य संतपाने वर्णन केले आहे संतांचे उपकार फार मोठ मानले जातात या संतांचे महत्त्व वर्णन करताना ब्रह्मदेवसुद्धा थकतो अस नामदेवांनी एका अभंगात म्हटले आहे 'संतसंगतीचे काय सांगू सुख । आपण पारिखे नाहीं तेथ,' 'माझ मायबाप साधुसंतजन । माझे जीवप्राण अंतरींचे,' अशा शब्दांनी नामदेवरायांनी संतांच्या सहवासाचे वर्णन केल आहे 'उदार तुम्ही संत । मायबाप कृपावंत' या भागात मायबाप संतांचे वर्णन श्रीसंतन केल आहे 'संतचरणींचा महिमा । काही न कळे आगमानिगमा,' देवाचे ते आप्त जाणावे ते संत, 'संत आधी देव मग । हाचि उगम आह्मा मना,' 'संतापोटीं देव वसे । देवापोटीं संत असे,' 'संतांचिये पायीं मज पैं विधाती' इत्यादी चरणांतून एकनाथांनी संतांचा महिमा गायिला आहे संतांच्या भेटीने आगमनाने दर्शनाने तुकाराम महाराज तर कमालच आवदून जातात 'दसरा दिवाळी तोचि आम्हा सण । सखे संतजन भेटतील । 'धन्य दिवस आजी दर्शन संतांचे । नांदे तया घरीं दैवत पंढरीचे' 'भाग्याचा उदय । तैं हे जोडी संतपाय', 'कृपेचे सागर हेचि साधुजन' 'आता तुम्ही कृपावंत । साधुसंत जिवलग ' अशा शब्दो वचनांतून तुकारामबुवांचा मंतप्रभा उफाळून वर आला दिसता संतप्रभापुढे मग मोक्ष स्वर्ग, वैकुंठास याचीही पर्वा नसते ईश्वर एकदम कृपावंत होऊन आपणास मुक्ती देईल की काय अशी भ्रान्ता वाटून मग तुकारामबुवांसारखा भक्त एकदम आळवितो, 'झणीं मुक्तोपदे देशी पांडरंगा । मग या संतसंगा पाहू कोठें ? अशी ओढ या श्रेष्ठ साधुसंतानाही संतसहवासाची असते १७९ कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनीं प्रकाश ॥ १ ॥ काला वाटू एकमेकां । वैष्णवां निका संभ्रम ॥ २ ॥ तु गाथा १२