भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 118, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 118

९० सार्थ तुकारामगाथा वांकुलिया ब्रह्मादिकां । उत्तम लोकां दाखवूं ॥ ३ ॥ तुका म्हणे भूमंडळीं । आम्ही बळी वीर गाढे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कंठी-वाणीत, गळ्यात, कृष्णमणी-कृष्णाच्या नामाचा अलंकार, गाढे-प्रतापी. अर्थ :- ज्याने आपल्या वाणीत कृष्णरूपी मण्याचा अलंकार धारण केलेला आहे त्याचा प्रकाश सर्व लोकांत एकदम पसरतो. १ वैष्णवांच्या मेळाव्यात काल्याचा प्रसाद एकमेकांना वाटू. २ आणि या काल्याच्या सुखामुळे ब्रह्मलोकादी जे श्रेष्ठ लोक आहेत त्यांनाही येथून वेडावण दाखवू. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या जगतात आम्ही भक्तच मोठे बलवान असे प्रतापी वीर पुरुष आहोत. ४ १८० कवळाचिया सुखें । परब्रह्म जालें गोरखें । हात गोऊनि माप मुखें । बोटासांदीं लोणचें ॥ १ ॥ कोण जाणे तेथें । कोण लाभ कां तें । ब्रह्मादिकां दुर्लभ ॥ २ ॥ घाली हुमामा हुंबरी । पांवा वाजवी छंदें मोहरी । गोपाळांचे फेरी । हरि छंदें नाचतसे ॥ ३ ॥ काय नव्हतें त्या घरीं खावया । रिघे लोणी चोरावया ॥ ४ ॥ तुका म्हणे सर्वैं तया । आम्ही ही सांकलों ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- कवळ-घास, गोरर्खे-गुरे राखणारे, सोकलों-मोकावलो.