भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 119, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 119

सार्थ तुकारामगाथा - ९१ शब्दार्थ व टीका :- गोवळों-गवळी, गुरे राखणारे, कांबळें-पांघरूण अर्थ:-पुष्कळ काळ झाला, आम्ही त्या श्रीकृष्णाच्या संगतीत वावरणारे गुराखी आहोत. १ त्याच्या शिदोरीमधील भाताचा आम्हांस कधींच तोट येत नाही. त्याच्या संगतीनेच आम्ही जेवणही करतो. २ यानेच माझे पांघरुणही पुष्कळकाळापर्यंत पांघरले होते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आमचे असे काहीच नाही; सर्व काही त्या प्रभूचे, श्रीकृष्णाचेच आहे. ४ १८३ बहु बरा बहु बरा । यासांगातें मिळे चारा ॥ १ ॥ म्हणोनि जीवेंसाठों । घेतली कान्होयाची पाठी ॥ २ ॥ वरवा वरवा दिसे । समागम याचा निमिषें ॥ ३ ॥ पुढती पुढतो तुका । सोंकला सोंकवितो लोकां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीका - वरवा-चांगला, निमिषें-क्षणभरही. अर्थ - या श्रीकृष्णाची संगत फार चांगली दिसते. कारण याच्या संगतीत गाईगुरांना चाराही चांगला मिळतो. १ म्हणून माझ्या जीवाने या कान्होबाच्या पाठीमागे एकसारखे राहायचे ठरविले आहे. २ याचा सहवास एक क्षणभर जरी झाला तरी तो फारच चांगला वाटतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पुढे पुढे तर मी याच्या संगतीसच चटावलो व तो लोभ इतरांनाही लाविला. ४ १८४ घेती पाण्यासों हुंबरों । त्यांचें समाधान करी ॥ १ ॥ ऐसी गोपाळांची सवे । जाती तिकडे मागें धांवे ॥ २ ॥ स्थिरावली गंगा । पांगविली म्हणे उगा ॥ ३ ॥ मोहरी पांवा काठी । तुका म्हणे याजसाठीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीका :- सवे-सवय. अर्थ - हुंबरोचा खेळ करून करून यमुनेच्या पाण्याचा प्रवाहही थांबविण्यावा म्हणजे त्याच्या आवाजावर मात करण्याचा प्रयत्न ज्या गोपाळांनी केला त्याचे समाधान श्रीकृष्णाने केले. १ या गोपाळांची सवय त्या श्रीहरीला फार मोठ्या प्रमाणावरची असल्याने तो ते तिकडे जातील तिकडे जात असतो २ या गोपाळांच्या हुंबरोने व श्रीकृष्णाच्या मुरलीच्या स्वरांनी प्रत्यक्ष यमुना नदीही स्थिर झाली. ती वहायची थांबली; मग श्रीकृष्णाने पांगलेल्या सोबत्यांना उगे राहण्यास सांगितले ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवाने पावा, मुरली, काठी यांना या आपल्या भक्त गोपाळांसाठीच धारण केले आहे. ४ १८५ वळी गाई धावे घरा । आमच्या करी येरझारा ॥ १ ॥ नांव घेतां तो जवळी । बहु भला कान्हो बळी ॥ २ ॥ नेदी पडो उणें पुरें । म्हणे अवघेंचि बरे ॥ ३ ॥ तुका म्हणे चित्ता । वाटे न व्हावा परता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीका - परता-दूर. अर्थ - हा श्रीकृष्ण आमच्या इंद्रियरूपी गाई वळण्यासाठी आमच्या घरी धावत येतो व आम्हांस जवळ धरण्यासाठी याच्या सारख्या येरझारा चाललेल्या असतात. १ हा कान्हा फार बलवान असून चांगला आहे. तो त्याचे नाव घेताच आमच्याजवळ येतो २ तो आम्हांला काहीच उणे पडू देत नाही; सर्व काही चांगले आहे असेच तो म्हणतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, तो दूर व्हावा असे माझ्या चित्तास कधीच वाटत नाही. ४ १८६ म्हणती घालों धणीवरी । आतां न लगे शिदोरी । नये क्षणभरी । आतां यासि विसंबों ॥ १ ॥