भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 134, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 134

१०६ सार्थ तुकारामगाथा


अवघीं येती रागा रे एका म्हणतां बरें । संगें वाढे कलह हरावा एकाएकींच खरें ॥ ९ ॥ एक म्हणती एकला रे तूं जासील कोठें । सांडी मांडी हैं वाउगें तुझे बोलचि खोटे । ठायीं राहा उगे ठायींच कांरे सिणसी वाटे । अवघियांची शिदोरी तुझे भरली मोटे ॥ १० ॥ तुका म्हणे काय काहण्या अरे सांगाल गोष्टी । चाटावे तुमचे बोल रे भुका लागल्या पोटीं । जागा करूं या रे कान्होया मागो कवळ ताटीं । घाले गडी तुका ढेकर देतो विठ्ठल कंठीं ॥ ११ ॥

शब्दार्थ व टीपा - तापलों-दृष्टी झालो, विपत्ती-दारिद्र्य, सुपती-झोपतात

अर्थ - कान्होबास काही आपण मागावे असे सर्व गोपाळ म्हणू लागले आपल्या आवडीची अशी जी गोष्ट असेल ती त्यास प्रेमाने मागू. एक म्हणू लागला आपण उगाचच त्याच्या मागे लागू. कुणीही आज घरी झोपू नका आपण सर्वजण जागे राहू. १ हा श्रीहरी सर्व जाणणारा असला तरी नेणता होऊन सर्व गोपाळांच्या मध्ये उगाच बसला; आणि कोण कोण काय काय बोलत आहे हे ऐकत राहिला एकमेकाचे बोलणे एकमेकाच्या मतास जुळत नसल्याचे त्याने पाहिले मग जे ज्याच्या हृदयात होते ते ज्याच्या त्याच्या ओठावर पाहून श्रीहरीने त्याचे मनोरथ पूर्ण केले २ कुणी एक म्हणायला लागले की आम्ही या गायेने फार त्रस्त झालो आहोत कुणीही आम्हास दहीभाताची शिदोरी न देता नुसते ताकच प्यायला देतात आम्ही या गाई वळता वळता फार कष्टी झालो कुठे विसाव्याला सावली नाही की तहान भागवायला पाणीही नाही आता या श्रीकृष्णाच्या पायाशी लागून पोटभर तरी मागून घेऊ ३ दुसरे काही गोपाळ म्हणू लागले, अरे तुमचे पोट तरी किती आहे ? आपण त्या कान्होबास गाई, म्हशी, घोडे, हत्ती, अशी धनसंपत्ती मागू. तो देवच आपला धनी असल्यामुळे आपणास दारिद्र्य कसले आहे ? आपली मुले, मुली, दाती वगैरे सर्वजण आरामाने याच्या कृपेने पलंगावर झोपतील. ४ दुसरे कुणी म्हणू लागले ही सर्व संपत्ती कुणी जतन करावी ? असे गाढव तसेच घोडे. त्याचा मान वेगळा कशास हवा ? या साऱ्या संपत्तीचा भार खांद्यावर वाहता वाहता क्षयरोग मात्र आपणास जडेल त्यापेक्षा हातात काठ्या घेऊन बोडक्या डोक्याने साऱ्या रानात मोकळेपणाने भटकू ना ! ५ मग दुसरे काही म्हणू लागले, रानावनात नको रे बाबा, तेथे फार भयानक पशू असतात ते साडून खातील, आपले डोळे, हस्तपाद, कान फार खाऊन टाकतील त्याच्या तावडीतून स्वतःचे रक्षण करील असा आपल्यात कोण आहे ? म्हणून आपला घरीच बसून राहा ना. कुणी हा नसता उद्योग सांगितला आहे ? ६ पण घरात बसले की मग सर्वजण खूप कामे सांगतात कुणी रिकामे बसले की घरी कुणास आवडत नाही हे आम्हाला माहीत आहे जी गोष्ट चारचौघांना पटेल तीच आपण नीट रूच आपल्या गड्याबरोबर भलेपणाने लपून छपूनच खेळले पाहिजे. ७ त्यावर काही म्हणू लागले की आपल्या मताशी मिळणारे गडी फार चांगले. कारण आपण त्याच्यावर सत्ता केली तरी मग चालते अरे, असा प्रकार या खेळाच्या ठिकाणी असू नये. या खेळात एखाद्या वेळेस आघाही बसतील एकमेकांवर रागावून रडी घाल्यावर मग लाथाळी होऊन गोंधळ उडतो ८ मग काहीजण म्हणू लागले की खेळ खेळताना ही पोरे उगीच राहतात खेळात का कुणी लहान, थोर असे कधी पडू शकते ? एकाला चांगले म्हटले की दुसरी पोरे रागवतात. अशा समयेत मग भांडणच वाढीस लागते. ते टाळण्यासाठी एकटेच राहणे मग बरे. ९ त्यावर दुसरे म्हणतात, अरे तू एकटाच मग कुठे जाशील ? मी हे सोडून देईन, हे घेईन हे बोलणेच खोटे व व्यर्थ आहे. अरे, तू जागच्या जागो स्वस्थच राहा ना. उगाच या मार्गात का श्रमतोस ? सर्वांची शिदोरी तुझ्याच गाठोड्यात भरलेली आहे. १० तुकाराम महाराज म्हणतात, अरे, कसल्या या गोष्टी सांगता ? तुमचे बोल फुकट आहेत. इथे आम्हाला पोटात भूक लागली आहे तिथे तुमच्या बडबडीस काय चाटावयेच ? या सर्वजण, आपण या

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 134, कुल 611 में से · BharatKosha