सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 133, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १०५ २०९ गोपाळ म्हणती कान्होवा या रे कांहीं मागों । आपुलाले आम्ही जीवीची तया आवडी सांगों । एक म्हणती उगे रे उगे मागेंचि लागों । निजों नका कोणी घरीं रे आजि अवघेचि जागों ॥ १ ॥ जाणोनि नेणता हरि रे मध्यें उगाचि बैसे । नाइकोनि बोल आइकै कोण कोणाचे कैंसे । एक एकाच्या संवादा जाणे न मिळेची ऐसें । पोटींचें होटा आणवी देतो तयांसि तैसें ॥ २ ॥ एक म्हणति बहु रे आम्हीं पीडिलों माया । नेदी दहींभातशिदोरी ताक घालिती पिया । तापलों वळितां गोधनें नाहीं जोवन छाया । आतां मागों पोटभरी रे याच्या लागोनि पायां ॥ ३ ॥ एक म्हणति तुमचें अरे पोट ते किती । मागों गाई म्हैसो घोडे रे धन संपत्ति हत्ती । देव गडी कान्हो आमुचा आम्हां काय विपत्ती । कन्याकुमरें दासो रे बाजावरी सुपती ॥ ४ ॥ एक म्हणती वेडे हो कोण करी जतन । गाढव तैसेंचि घोडें रे कोण तयाचा मान । लागे भवरोग वाहतां पांदीं चवघे जण । हातीं काठघा डोया बोडक्या हिंडों मोकळे राण ॥ ५ ॥ एक म्हणती रानीं रे बहु सावजें फार । फाडफाडूं खाती डोळे रे पाय नेतील फर । राखोनि राखे आपणा ऐसा कइंचा शूर । बैसोनि राहों घरीं रे कोण करी हे चार ॥ ६ ॥ घरीं बैसलिया बहुते बहु सांगती काम । रिकामें कोणासि नावडे ऐसे आम्हांसि ठावें । चौघांमध्ये बरें दिसेसें तेथें नेमक व्हावे । लपोनि सहज खेळतां भले गडियांसवें ॥ ७ ॥ एक म्हणती गडी ते भले मिळती मता । केली तयावरी चाली रे बरी आपुली सत्ता । नसावे ते तेथें तैसे रे खेळ हाणिती लाता । रडी एकाएकीं गेलिया गोंधळ उडती लाता ॥ ८ ॥ एक म्हणती खेळतां उभीं राहतों पोरें । ऐसें काय घडों शके रे कोणी लहान थोरें । तु गाथा. १४