भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 132, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 132

१०४ सार्थ तुकारामगाथा व तोही प्रेमाचाच भुकेला असल्यामुळे त्याने त्याचे उपकार ठेवले नाहीत २ प्रत्येक घास घेत असतांना सर्व गोपाळ श्रीकृष्णा, तू जेव ना असे म्हणत असत. हे भावडे व अडाणी गोपाळ मोठे कृष्णप्रेमी होते यांची देवालाही मोठीच प्रीती होती ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता आपण आपापल्या घरो जाऊ व या दात्या श्रीकृष्णाने आपणास वणव्याच्या संकटातून तेव्हा वाचविले असे घरच्या माणसाना सांगू ४ २०७ घ्या रे भोकरे भाकरी । दहीभाताची शिदोरी । ताक साडी दुरी । असेल ते तयापें ॥ १ ॥ येथें द्यावे तैसे घ्यावे । थोडें परी निरें व्हावे । सांगतो हे ठावे । कसो द्या रे सकळां ॥ २ ॥ माझें आहे तैसे पाहे । नाही तरी घरा जाये । चोरोनिया माये । नवनीत आणावे ॥ ३ ॥ तुका म्हणे घरों । माझें कोणी नाहीं हरी । नका करु दुरी । मज पाया वेगळें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - निरें-खरे शुद्ध अर्थ - गोपाळानो, ही भाकरी व हे भोकराचे लोणचे घ्या ही दहीभाताची शिदोरी घ्या तुम्ही ज्याच्याजवळ ताक असेल तर ते त्याने दूर सारावे १ येथे जसे द्यावे तसे घ्यावे असे असल्यामुळे जरी थोडे मिळविले तरी ते शुद्ध व चागले असेल मी सर्व हे सांगतो त्याची नीट माहिती असू द्या तुम्हाला २ माझी जशी शिदोरी चांगली, शुद्ध व ताजी आहे तशी तुम्ही आहे की नाही हे तू पाहा व मग घरी जा आईला न सांगता घरातील लोणी चोरून घेऊन ये ३ तुकाराम महाराज म्हणतात, मला मात्र माझ्या घरी कुणीही नाही तेव्हा श्रीकृष्णा मला तुझ्या पायापासून दूर करु नकोस ४ २०८ काल्याचिये आसे । देव जळी जाले मासे । पुसोनिया हासे । तिरीसांगाते हात ॥ १ ॥ लाजे त्यासि वाटा नाहीं । जाणे अतंरींचे तेंही । दीन होता काहीं । होऊ नेदी वेगळें ॥ २ ॥ उपाय अपाय यापुढें । खोटे निवडिता फुडे । जोडोनिया पुढें । हात उभे नुपेशी ॥ ३ ॥ तें घ्या रे सावकाशें । जया फावेल तो तैसे । तुका म्हणे रसें । प्रेमाचिया आनंदें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आसे-आशेने अर्थ - श्रीकृष्ण आणि गोपाळ यानी जो काला केला त्याचा एखादा लहानसा भाग मिळावा म्हणून आशेने प्रत्यक्ष देवही नदीच्या पाण्यातील मासे बनले त्यावेळी श्रीकृष्ण व गोपाळ यानी हसून आपले हात तिरींना पुसून टाकले १ जो कुणी इथे लज्जित होईल त्यास शिदोरीचा वाटा मिळणार नाही पण त्याच्या मनातील हेही जाणा की जो दीन होऊन मागतो त्यास काही तरी मिळाल्याशिवाय राहात नाही २ या श्रीकृष्णापुढे उपाय व अपाय हे दोन्ही व्यर्थ होतात, खोटे ठरतात त्याच्यापुढे हात जोडून उभे राहावे, तो कधीही उपेक्षा करणार नाही ३ ज्याला जसे साधेल तसे त्याने या देवापासून जे हवे ते प्राप्त करून घ्यावे तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमरसाच्या आनंदात असावे ४