भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 131, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 131

सार्थ तुकारामगाथा १०३ विवरण - श्रीकृष्णच्या बालचरित्रातील ज्या अद्भुत गोष्टी पुराणातून वर्णन केल्या आहेत त्यात दावाग्नी- भक्षणाची कथा या दोन अभंगात बुवानीं वर्णन केलेली दिसत. पूतनावध, धेनुकासुरवध, इद्रगर्वहरण, रासक्रीडा, कालियामर्दन, अघासुरवध, वत्सवध इत्यादी विभाग कृष्णचरित्रात महत्त्वाचे असून त्याच्या या बाललीलांचे कौतुकाने वर्णन केले जाते. एकदा उन्हाळ्याच्या रात्री सर्व मंडळी थकून झोपलेली असताना एकाएकी सर्वत्र आग लागली गोकुळातील लोक घाबरले या वणव्यात अनेक स्त्रीपुरुष व गाईवासरे सापडल्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला मग सर्वजण मनोभावे श्रीकृष्णास शरण गेले त्यांनी आपले अग्नीपासून रक्षण व्हावे म्हणून श्रीकृष्णाची प्रार्थना केली ती आर्त प्रार्थना ऐकून भगवान श्रीकृष्णाने तो दावाग्नीच आपल्या मुखाने गिळून टाकला व बनवासियाचे संकट दूर केले अशी कथा आहे. २०५ नेणती तयासि साच भाव दावी हरी । लाज नाहीं नाचे पावा वाजवी मोहरी ॥ १ ॥ चला रे याच्या पाया लागो आता । राखिले जळता महा आगीपासुनि ॥ २ ॥ कैंसी रे कान्होबा एवढी गिळियेली आगी । न देखो पोळला तुज तोडीं कोठें अगीं ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही का रे करिता नवल । आमची सिदोरी खातो त्याचे आले बळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साच-खरोखर. अर्थ - एवढी मोठी आग श्रीकृष्णांनी गिळून टाकल्यावर सर्वांना नवल वाटून ते म्हणू लागले, जे याचे सामर्थ्य जाणीत नाहीत त्यांना खरोखर हा श्रीकृष्ण असाच प्रत्यय आणून देतो मग त्याच्या मनात कसलीही लाज नसते तो सुखाने पावा अथवा मुरली वाजवीत नाचत राहतो १ चला रे, गोपाळ लोकहो त्याच्या पायावर मस्तक ठेवू या या मोठ्या वणव्यापासून केवळ याच्या कृपेने आपण बचाबलो आहोत २ अरे श्रीकृष्णा, तू एवढी मोठी आग कशी रे गिळलीस ? तुझे तोंड किंवा अग कुठे पोळले नाही का रे? ३ तुकाराम महाराज म्हणतात, गोपाळ हो, तुम्ही या कृष्णाचे काय एवढे नवल सांगता ? हा आमची शिदोरी खातो म्हणूनच त्याला एवढे बळ प्राप्त झाले आहे. ४ २०६ त्यानीं घणोवरी संग केला हरीसवे । देऊनि आपुले तोचि देईल तें खावे ॥ १ ॥ न घेयी आभार प्रेमाचा भुकेला । बहु दिवस संग हाचि निर्धार त्याला ॥ २ ॥ कान्होबा तू जेवीं घासोघासीं म्हणती । आरुष गोपाळें त्याची बहु देवा प्रीती ॥ ३ ॥ तुका म्हणे आता जाऊ आपुलिया घरा ॥ तोय वाचविले ऐसे सांगो रे दातारा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - घणोवरी-तृप्त होईपर्यंत, आद्यप-अडाणी, तोय-तेव्हा अर्थ - या गोपाळमित्रांनी मनाचे समाधान होईपर्यंत त्या श्रीहरीची सोबत केली. त्यांनी आपल्या शिदोऱ्या त्याला दिल्या व तो जे देईल तेच ते खाऊ लागले. १ त्यालाही या गोपाळांची संगत फार दिवसांची असल्यामुळे

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 131, कुल 611 में से · BharatKosha