भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 130, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 130

१०२ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टोपा :- गोवळी-गवळी, गोपाळ. अर्थ - या श्रीकृष्णाचे प्रेम एवढे मोठे की तो गोपाळांचे उष्टेही खात आहे. १ या कृष्णाचे सोबती त्याच्या नामाचे चितन व ध्यान करतात. २ त्यांनी आलेल्या डावाचे रक्षण करून वळणाऱ्या गाईंच्या मागेही धावावे. ३ तुकाराम महाराज भाविकाला म्हणतात, सर्व काळा एका ठिकाणी करा ४ २०३ पैल आली आगी कान्हो काय रे करावें । न कळे तें कैसें आजि वांचों आम्ही जीवें ॥ १ ॥ धांव रे हरी सांपडलों संधीं । दोणव्याचे मधीं बुद्धि कांहीं करावी ॥ २ ॥ अवचितां जाळ येतां देखियेला वरो । परतोनि पाहतां आधीं होतों पाठमोरी ॥ ३ ॥ सभोवता फेर रीग न पुरे पळतां । तुका म्हणे जाणसी तें करावें अनंता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टोपा - आगी-आग, संधीं-सकटात, रीग-शिरकाव अर्थ - अरे श्रीकृष्णा, पलीकडे आग पेटली आहे आता आम्ही काय करावे ? आज आमचे जीव कसे वाचणार हे काही समजत नाही १ अरे श्रीहरी, तू धाव आता. आम्ही मोठ्याच संकटात सापडलो आहोत. या आगीच्या प्रलयात आम्ही काय करावे हेच आम्हास समजत नाही. तूच काही तरी कर व आम्हांस वाचव २ आम्ही आधी पाठमोरेच होतो, पण वळून पाहताच आगीच्या ज्वाला आम्हास दिसल्या. ३ सगळीकडे आगो एवढा पसरला आहे की बाहेर पडण्यासाठी शिरकाव करायला कुठे जागाच नाही तुकाराम महाराज म्हणतात, अनंता, .आता तुला समजेल तसे तू कर. आमचे रक्षण या अग्नीपासून कर. ४ २०४ भिऊं नका बोले झाकुनियां राहा डोळे । चालवील देव धाक नाहीं येणें वेळे ॥ १ ॥ बाप रे हा देवांचाही देव कळों । नेदी माव काय करी करवो ते ॥ २ ॥ पसरुनि मुख विश्वरूप खाय जाळ । सारुनियां संधी अवघे पाहाती गोपाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही मागें भ्यालों वांयांविण । कळो आले आतां या सांगातें नाहीं शिण ॥ ४ ॥ शब्दार्थ व टोपा :- माव-माया, चमत्कार, संधी-बोटाच्या फटीतून अर्थ :- ह्यावर श्रीकृष्ण म्हणाला, तुम्ही मुळीच भिऊ नका. डोळे मात्र झाकून घ्या. हे सर्व संकट देव आता निवारण करील. यावेळी काही भीती नाही. १ मग गोपाळ मनाशी समजले की अरे बाप रे, हा तर देवांचा ही देव दिसतो हेच खरे. काय चमत्कार करील ते काही सांगवत नाही. २ मग श्रीकृष्ण विश्वरूप पसरवून सर्व आग तोंडाने गिळून टाकीत आहे असे सर्व गोपाळांनी हाताच्या बोटाच्या फटीतून पाहिले. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही मग मागे उगीचच भ्यालो, या श्रीहरीच्या संगतीत कसलाच शीण नाही हे आता आम्हांस कळून चुकले ४