सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
१०२ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टोपा :- गोवळी-गवळी, गोपाळ. अर्थ - या श्रीकृष्णाचे प्रेम एवढे मोठे की तो गोपाळांचे उष्टेही खात आहे. १ या कृष्णाचे सोबती त्याच्या नामाचे चितन व ध्यान करतात. २ त्यांनी आलेल्या डावाचे रक्षण करून वळणाऱ्या गाईंच्या मागेही धावावे. ३ तुकाराम महाराज भाविकाला म्हणतात, सर्व काळा एका ठिकाणी करा ४ २०३ पैल आली आगी कान्हो काय रे करावें । न कळे तें कैसें आजि वांचों आम्ही जीवें ॥ १ ॥ धांव रे हरी सांपडलों संधीं । दोणव्याचे मधीं बुद्धि कांहीं करावी ॥ २ ॥ अवचितां जाळ येतां देखियेला वरो । परतोनि पाहतां आधीं होतों पाठमोरी ॥ ३ ॥ सभोवता फेर रीग न पुरे पळतां । तुका म्हणे जाणसी तें करावें अनंता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टोपा - आगी-आग, संधीं-सकटात, रीग-शिरकाव अर्थ - अरे श्रीकृष्णा, पलीकडे आग पेटली आहे आता आम्ही काय करावे ? आज आमचे जीव कसे वाचणार हे काही समजत नाही १ अरे श्रीहरी, तू धाव आता. आम्ही मोठ्याच संकटात सापडलो आहोत. या आगीच्या प्रलयात आम्ही काय करावे हेच आम्हास समजत नाही. तूच काही तरी कर व आम्हांस वाचव २ आम्ही आधी पाठमोरेच होतो, पण वळून पाहताच आगीच्या ज्वाला आम्हास दिसल्या. ३ सगळीकडे आगो एवढा पसरला आहे की बाहेर पडण्यासाठी शिरकाव करायला कुठे जागाच नाही तुकाराम महाराज म्हणतात, अनंता, .आता तुला समजेल तसे तू कर. आमचे रक्षण या अग्नीपासून कर. ४ २०४ भिऊं नका बोले झाकुनियां राहा डोळे । चालवील देव धाक नाहीं येणें वेळे ॥ १ ॥ बाप रे हा देवांचाही देव कळों । नेदी माव काय करी करवो ते ॥ २ ॥ पसरुनि मुख विश्वरूप खाय जाळ । सारुनियां संधी अवघे पाहाती गोपाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही मागें भ्यालों वांयांविण । कळो आले आतां या सांगातें नाहीं शिण ॥ ४ ॥ शब्दार्थ व टोपा :- माव-माया, चमत्कार, संधी-बोटाच्या फटीतून अर्थ :- ह्यावर श्रीकृष्ण म्हणाला, तुम्ही मुळीच भिऊ नका. डोळे मात्र झाकून घ्या. हे सर्व संकट देव आता निवारण करील. यावेळी काही भीती नाही. १ मग गोपाळ मनाशी समजले की अरे बाप रे, हा तर देवांचा ही देव दिसतो हेच खरे. काय चमत्कार करील ते काही सांगवत नाही. २ मग श्रीकृष्ण विश्वरूप पसरवून सर्व आग तोंडाने गिळून टाकीत आहे असे सर्व गोपाळांनी हाताच्या बोटाच्या फटीतून पाहिले. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही मग मागे उगीचच भ्यालो, या श्रीहरीच्या संगतीत कसलाच शीण नाही हे आता आम्हांस कळून चुकले ४
सार्थ तुकारामगाथा १०३ विवरण - श्रीकृष्णच्या बालचरित्रातील ज्या अद्भुत गोष्टी पुराणातून वर्णन केल्या आहेत त्यात दावाग्नी- भक्षणाची कथा या दोन अभंगात बुवानीं वर्णन केलेली दिसत. पूतनावध, धेनुकासुरवध, इद्रगर्वहरण, रासक्रीडा, कालियामर्दन, अघासुरवध, वत्सवध इत्यादी विभाग कृष्णचरित्रात महत्त्वाचे असून त्याच्या या बाललीलांचे कौतुकाने वर्णन केले जाते. एकदा उन्हाळ्याच्या रात्री सर्व मंडळी थकून झोपलेली असताना एकाएकी सर्वत्र आग लागली गोकुळातील लोक घाबरले या वणव्यात अनेक स्त्रीपुरुष व गाईवासरे सापडल्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला मग सर्वजण मनोभावे श्रीकृष्णास शरण गेले त्यांनी आपले अग्नीपासून रक्षण व्हावे म्हणून श्रीकृष्णाची प्रार्थना केली ती आर्त प्रार्थना ऐकून भगवान श्रीकृष्णाने तो दावाग्नीच आपल्या मुखाने गिळून टाकला व बनवासियाचे संकट दूर केले अशी कथा आहे. २०५ नेणती तयासि साच भाव दावी हरी । लाज नाहीं नाचे पावा वाजवी मोहरी ॥ १ ॥ चला रे याच्या पाया लागो आता । राखिले जळता महा आगीपासुनि ॥ २ ॥ कैंसी रे कान्होबा एवढी गिळियेली आगी । न देखो पोळला तुज तोडीं कोठें अगीं ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्ही का रे करिता नवल । आमची सिदोरी खातो त्याचे आले बळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साच-खरोखर. अर्थ - एवढी मोठी आग श्रीकृष्णांनी गिळून टाकल्यावर सर्वांना नवल वाटून ते म्हणू लागले, जे याचे सामर्थ्य जाणीत नाहीत त्यांना खरोखर हा श्रीकृष्ण असाच प्रत्यय आणून देतो मग त्याच्या मनात कसलीही लाज नसते तो सुखाने पावा अथवा मुरली वाजवीत नाचत राहतो १ चला रे, गोपाळ लोकहो त्याच्या पायावर मस्तक ठेवू या या मोठ्या वणव्यापासून केवळ याच्या कृपेने आपण बचाबलो आहोत २ अरे श्रीकृष्णा, तू एवढी मोठी आग कशी रे गिळलीस ? तुझे तोंड किंवा अग कुठे पोळले नाही का रे? ३ तुकाराम महाराज म्हणतात, गोपाळ हो, तुम्ही या कृष्णाचे काय एवढे नवल सांगता ? हा आमची शिदोरी खातो म्हणूनच त्याला एवढे बळ प्राप्त झाले आहे. ४ २०६ त्यानीं घणोवरी संग केला हरीसवे । देऊनि आपुले तोचि देईल तें खावे ॥ १ ॥ न घेयी आभार प्रेमाचा भुकेला । बहु दिवस संग हाचि निर्धार त्याला ॥ २ ॥ कान्होबा तू जेवीं घासोघासीं म्हणती । आरुष गोपाळें त्याची बहु देवा प्रीती ॥ ३ ॥ तुका म्हणे आता जाऊ आपुलिया घरा ॥ तोय वाचविले ऐसे सांगो रे दातारा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - घणोवरी-तृप्त होईपर्यंत, आद्यप-अडाणी, तोय-तेव्हा अर्थ - या गोपाळमित्रांनी मनाचे समाधान होईपर्यंत त्या श्रीहरीची सोबत केली. त्यांनी आपल्या शिदोऱ्या त्याला दिल्या व तो जे देईल तेच ते खाऊ लागले. १ त्यालाही या गोपाळांची संगत फार दिवसांची असल्यामुळे
१०४ सार्थ तुकारामगाथा व तोही प्रेमाचाच भुकेला असल्यामुळे त्याने त्याचे उपकार ठेवले नाहीत २ प्रत्येक घास घेत असतांना सर्व गोपाळ श्रीकृष्णा, तू जेव ना असे म्हणत असत. हे भावडे व अडाणी गोपाळ मोठे कृष्णप्रेमी होते यांची देवालाही मोठीच प्रीती होती ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता आपण आपापल्या घरो जाऊ व या दात्या श्रीकृष्णाने आपणास वणव्याच्या संकटातून तेव्हा वाचविले असे घरच्या माणसाना सांगू ४ २०७ घ्या रे भोकरे भाकरी । दहीभाताची शिदोरी । ताक साडी दुरी । असेल ते तयापें ॥ १ ॥ येथें द्यावे तैसे घ्यावे । थोडें परी निरें व्हावे । सांगतो हे ठावे । कसो द्या रे सकळां ॥ २ ॥ माझें आहे तैसे पाहे । नाही तरी घरा जाये । चोरोनिया माये । नवनीत आणावे ॥ ३ ॥ तुका म्हणे घरों । माझें कोणी नाहीं हरी । नका करु दुरी । मज पाया वेगळें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - निरें-खरे शुद्ध अर्थ - गोपाळानो, ही भाकरी व हे भोकराचे लोणचे घ्या ही दहीभाताची शिदोरी घ्या तुम्ही ज्याच्याजवळ ताक असेल तर ते त्याने दूर सारावे १ येथे जसे द्यावे तसे घ्यावे असे असल्यामुळे जरी थोडे मिळविले तरी ते शुद्ध व चागले असेल मी सर्व हे सांगतो त्याची नीट माहिती असू द्या तुम्हाला २ माझी जशी शिदोरी चांगली, शुद्ध व ताजी आहे तशी तुम्ही आहे की नाही हे तू पाहा व मग घरी जा आईला न सांगता घरातील लोणी चोरून घेऊन ये ३ तुकाराम महाराज म्हणतात, मला मात्र माझ्या घरी कुणीही नाही तेव्हा श्रीकृष्णा मला तुझ्या पायापासून दूर करु नकोस ४ २०८ काल्याचिये आसे । देव जळी जाले मासे । पुसोनिया हासे । तिरीसांगाते हात ॥ १ ॥ लाजे त्यासि वाटा नाहीं । जाणे अतंरींचे तेंही । दीन होता काहीं । होऊ नेदी वेगळें ॥ २ ॥ उपाय अपाय यापुढें । खोटे निवडिता फुडे । जोडोनिया पुढें । हात उभे नुपेशी ॥ ३ ॥ तें घ्या रे सावकाशें । जया फावेल तो तैसे । तुका म्हणे रसें । प्रेमाचिया आनंदें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - आसे-आशेने अर्थ - श्रीकृष्ण आणि गोपाळ यानी जो काला केला त्याचा एखादा लहानसा भाग मिळावा म्हणून आशेने प्रत्यक्ष देवही नदीच्या पाण्यातील मासे बनले त्यावेळी श्रीकृष्ण व गोपाळ यानी हसून आपले हात तिरींना पुसून टाकले १ जो कुणी इथे लज्जित होईल त्यास शिदोरीचा वाटा मिळणार नाही पण त्याच्या मनातील हेही जाणा की जो दीन होऊन मागतो त्यास काही तरी मिळाल्याशिवाय राहात नाही २ या श्रीकृष्णापुढे उपाय व अपाय हे दोन्ही व्यर्थ होतात, खोटे ठरतात त्याच्यापुढे हात जोडून उभे राहावे, तो कधीही उपेक्षा करणार नाही ३ ज्याला जसे साधेल तसे त्याने या देवापासून जे हवे ते प्राप्त करून घ्यावे तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमरसाच्या आनंदात असावे ४
सार्थ तुकारामगाथा १०५ २०९ गोपाळ म्हणती कान्होवा या रे कांहीं मागों । आपुलाले आम्ही जीवीची तया आवडी सांगों । एक म्हणती उगे रे उगे मागेंचि लागों । निजों नका कोणी घरीं रे आजि अवघेचि जागों ॥ १ ॥ जाणोनि नेणता हरि रे मध्यें उगाचि बैसे । नाइकोनि बोल आइकै कोण कोणाचे कैंसे । एक एकाच्या संवादा जाणे न मिळेची ऐसें । पोटींचें होटा आणवी देतो तयांसि तैसें ॥ २ ॥ एक म्हणति बहु रे आम्हीं पीडिलों माया । नेदी दहींभातशिदोरी ताक घालिती पिया । तापलों वळितां गोधनें नाहीं जोवन छाया । आतां मागों पोटभरी रे याच्या लागोनि पायां ॥ ३ ॥ एक म्हणति तुमचें अरे पोट ते किती । मागों गाई म्हैसो घोडे रे धन संपत्ति हत्ती । देव गडी कान्हो आमुचा आम्हां काय विपत्ती । कन्याकुमरें दासो रे बाजावरी सुपती ॥ ४ ॥ एक म्हणती वेडे हो कोण करी जतन । गाढव तैसेंचि घोडें रे कोण तयाचा मान । लागे भवरोग वाहतां पांदीं चवघे जण । हातीं काठघा डोया बोडक्या हिंडों मोकळे राण ॥ ५ ॥ एक म्हणती रानीं रे बहु सावजें फार । फाडफाडूं खाती डोळे रे पाय नेतील फर । राखोनि राखे आपणा ऐसा कइंचा शूर । बैसोनि राहों घरीं रे कोण करी हे चार ॥ ६ ॥ घरीं बैसलिया बहुते बहु सांगती काम । रिकामें कोणासि नावडे ऐसे आम्हांसि ठावें । चौघांमध्ये बरें दिसेसें तेथें नेमक व्हावे । लपोनि सहज खेळतां भले गडियांसवें ॥ ७ ॥ एक म्हणती गडी ते भले मिळती मता । केली तयावरी चाली रे बरी आपुली सत्ता । नसावे ते तेथें तैसे रे खेळ हाणिती लाता । रडी एकाएकीं गेलिया गोंधळ उडती लाता ॥ ८ ॥ एक म्हणती खेळतां उभीं राहतों पोरें । ऐसें काय घडों शके रे कोणी लहान थोरें । तु गाथा. १४
१०६ सार्थ तुकारामगाथा
अवघीं येती रागा रे एका म्हणतां बरें । संगें वाढे कलह हरावा एकाएकींच खरें ॥ ९ ॥ एक म्हणती एकला रे तूं जासील कोठें । सांडी मांडी हैं वाउगें तुझे बोलचि खोटे । ठायीं राहा उगे ठायींच कांरे सिणसी वाटे । अवघियांची शिदोरी तुझे भरली मोटे ॥ १० ॥ तुका म्हणे काय काहण्या अरे सांगाल गोष्टी । चाटावे तुमचे बोल रे भुका लागल्या पोटीं । जागा करूं या रे कान्होया मागो कवळ ताटीं । घाले गडी तुका ढेकर देतो विठ्ठल कंठीं ॥ ११ ॥
शब्दार्थ व टीपा - तापलों-दृष्टी झालो, विपत्ती-दारिद्र्य, सुपती-झोपतात
अर्थ - कान्होबास काही आपण मागावे असे सर्व गोपाळ म्हणू लागले आपल्या आवडीची अशी जी गोष्ट असेल ती त्यास प्रेमाने मागू. एक म्हणू लागला आपण उगाचच त्याच्या मागे लागू. कुणीही आज घरी झोपू नका आपण सर्वजण जागे राहू. १ हा श्रीहरी सर्व जाणणारा असला तरी नेणता होऊन सर्व गोपाळांच्या मध्ये उगाच बसला; आणि कोण कोण काय काय बोलत आहे हे ऐकत राहिला एकमेकाचे बोलणे एकमेकाच्या मतास जुळत नसल्याचे त्याने पाहिले मग जे ज्याच्या हृदयात होते ते ज्याच्या त्याच्या ओठावर पाहून श्रीहरीने त्याचे मनोरथ पूर्ण केले २ कुणी एक म्हणायला लागले की आम्ही या गायेने फार त्रस्त झालो आहोत कुणीही आम्हास दहीभाताची शिदोरी न देता नुसते ताकच प्यायला देतात आम्ही या गाई वळता वळता फार कष्टी झालो कुठे विसाव्याला सावली नाही की तहान भागवायला पाणीही नाही आता या श्रीकृष्णाच्या पायाशी लागून पोटभर तरी मागून घेऊ ३ दुसरे काही गोपाळ म्हणू लागले, अरे तुमचे पोट तरी किती आहे ? आपण त्या कान्होबास गाई, म्हशी, घोडे, हत्ती, अशी धनसंपत्ती मागू. तो देवच आपला धनी असल्यामुळे आपणास दारिद्र्य कसले आहे ? आपली मुले, मुली, दाती वगैरे सर्वजण आरामाने याच्या कृपेने पलंगावर झोपतील. ४ दुसरे कुणी म्हणू लागले ही सर्व संपत्ती कुणी जतन करावी ? असे गाढव तसेच घोडे. त्याचा मान वेगळा कशास हवा ? या साऱ्या संपत्तीचा भार खांद्यावर वाहता वाहता क्षयरोग मात्र आपणास जडेल त्यापेक्षा हातात काठ्या घेऊन बोडक्या डोक्याने साऱ्या रानात मोकळेपणाने भटकू ना ! ५ मग दुसरे काही म्हणू लागले, रानावनात नको रे बाबा, तेथे फार भयानक पशू असतात ते साडून खातील, आपले डोळे, हस्तपाद, कान फार खाऊन टाकतील त्याच्या तावडीतून स्वतःचे रक्षण करील असा आपल्यात कोण आहे ? म्हणून आपला घरीच बसून राहा ना. कुणी हा नसता उद्योग सांगितला आहे ? ६ पण घरात बसले की मग सर्वजण खूप कामे सांगतात कुणी रिकामे बसले की घरी कुणास आवडत नाही हे आम्हाला माहीत आहे जी गोष्ट चारचौघांना पटेल तीच आपण नीट रूच आपल्या गड्याबरोबर भलेपणाने लपून छपूनच खेळले पाहिजे. ७ त्यावर काही म्हणू लागले की आपल्या मताशी मिळणारे गडी फार चांगले. कारण आपण त्याच्यावर सत्ता केली तरी मग चालते अरे, असा प्रकार या खेळाच्या ठिकाणी असू नये. या खेळात एखाद्या वेळेस आघाही बसतील एकमेकांवर रागावून रडी घाल्यावर मग लाथाळी होऊन गोंधळ उडतो ८ मग काहीजण म्हणू लागले की खेळ खेळताना ही पोरे उगीच राहतात खेळात का कुणी लहान, थोर असे कधी पडू शकते ? एकाला चांगले म्हटले की दुसरी पोरे रागवतात. अशा समयेत मग भांडणच वाढीस लागते. ते टाळण्यासाठी एकटेच राहणे मग बरे. ९ त्यावर दुसरे म्हणतात, अरे तू एकटाच मग कुठे जाशील ? मी हे सोडून देईन, हे घेईन हे बोलणेच खोटे व व्यर्थ आहे. अरे, तू जागच्या जागो स्वस्थच राहा ना. उगाच या मार्गात का श्रमतोस ? सर्वांची शिदोरी तुझ्याच गाठोड्यात भरलेली आहे. १० तुकाराम महाराज म्हणतात, अरे, कसल्या या गोष्टी सांगता ? तुमचे बोल फुकट आहेत. इथे आम्हाला पोटात भूक लागली आहे तिथे तुमच्या बडबडीस काय चाटावयेच ? या सर्वजण, आपण या
कान्होबाला जागे करू व आपल्या ताटात त्याला घास भागू मग सर्व गडी संतुष्ट होऊन विठ्ठलनामाचे फेर देऊ असे तुकारामबुवा म्हणतात ११ २१० आजि ओस अमरावती । काला पाहावया येती । देव विसरती । देहभाव आपुला ॥ १ ॥ आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी । तटस्थ त्या ध्यानौँ । गाई जाल्या श्वापदें ॥ २ ॥ जें या देवांचें दैवत । उभें आहे या रंगात । गोपाळांसहित । क्रीडा करी कान्होबा ॥ ३ ॥ तया सुखाची शिराणी । तींच पाउले मेदिनी । तुका म्हणे मुनी । धुंडितां न लामती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - मेदिनी-पृथ्वी, शिराणी-कळस अर्थ - या गोपाळांचा काला पाहण्यासाठी सारे देव आल्यामुळे आज अमरावतीही ओस पडलेली आहे त्याचे देहभान हरपून गेले आहे १ काल्याचा आनंद या सबंध पृथ्वीवरही मावत नाही वनातील सर्व गाई व श्वापदे चारा खायचे व पाणी प्यायचे विसरून गेल्या त्याच्या सर्वं वृत्ती या श्रीहरीच्या ठिकाणी एकवटून आल्या २ या सर्व देवांचे दैवतच आज या काल्याच्या आनंदाच्या रंगात उभे आहे, हा श्रीकृष्ण गोपाळांबरोबर आज क्रीडा करीत आहे ३ सर्व सुखाचा कळस म्हणजे पृथ्वीवरील याची पाऊले होत तुकाराम महाराज म्हणतात, या पावलां- साठी ऋधिमुनी सर्व जग धुंडतात पण त्याना ही सापडत नाहीत ४ २११ चला बाई पांडुरंग पाहूं वाळवंटीं । माडियेला काला भोवती गोपाळाची दाटी ॥ १ ॥ आनंदें कवळ देती एकामुखीं एक । न म्हणती सान थोर अवघीं सकळिक ॥ २ ॥ हुगामा हुबरी पावा वाजविती मोहरी । घेतलासे फेर माजी घालुनिया हरी ॥ ३ ॥ लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती । विसरलीं देहभाव शंका नाहीं चित्तीं ॥ ४ ॥ पुष्पाचा वरषाव जाली आरतियाची दाटी । तुळसी गुफोनिया माळा घालितील कंठीं ॥ ५ ॥ यादवाचा राणा गोपीमनोहर कान्हा । तुका म्हणे सुख वाटे देखोनिया मना ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - कवळ-घास अर्थ - चला बायांनो, वाळवंटात जाऊन पाडुरंगाचे दर्शन घेऊ या विठ्ठलाने काल्याचा खेळ मांडून समोवती गोपाळांची दाटी निर्माण केली आहे १ मोठ्या आनंदाने हे गोपाळ एकमेकाना घास देऊ लागले कुणी कुणास लहान थोर मानीत नव्हते २ सर्व गोपाळ मध्यभागी श्रीकृष्णाला ठेवून त्याच्या भोवती फेर धरतात, हुगामा, हुबरीचे खेळ करतात, पावा किंवा बासरी वाजवितात. ३ या क्रीडेमुळे सर्व स्त्रीपुरुष व प्राण्याच्या सर्व जाती लुब्ध होऊन गेल्या. त्याचा देहभाव विसरून गेला यात शंकाच नाही ४ यावेळी आकाशातून पुष्पाचा
१०८ सार्थ तुकारामगाथा वर्षाव झाला आरती करणारांची दाटी झाली सर्व गोपाळ तुळशीच्या माळा तयार करून पाडुरंगास घालू लागले ५ या देवाचा राजा व गोपांचा प्रियकर श्रीकृष्ण माझ्या मनात किती सुख देतो म्हणून सांगू ? असे तुकाराम महाराज म्हणतात ६ २१२ माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यातुनी ॥ १ ॥ आपआपणामध्ये मिळो । एक खेळो एकाशीं ॥ २ ॥ घाबरियाच्या मोडा काड्या । धाडा भाड्या वळतिया ॥ ३ ॥ तुका म्हणे देवापाशीं । विटाळशीं नसावो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - काड्या मोडणे-खेळातून काढणे, भाड्या-भित्र्या अर्थ - माझे सोबती कोणकोण आहेत ते सांग पाहू गोपाळांच्या मेळाव्यातून हे मला निवडून द्या पाहू १ आपण आपल्या स्वरूपातच मिळून एकमेकाशी खेळू या २ या खेळात जे गडी घावरतील त्यांना खेळातून काढून टाका अशा भित्र्या गड्याना इंद्रियरूपी गाई वळापला पाठवून देऊ ३ तुकाराम महाराज म्हणतात, या देवापाशी ज्याच्या चित्तात विटाळ झाला आहे असा मनुष्य नसावा ४ २१३ हेचि अनुवाद सदा सर्वकाळ । करुनिया गोपाळकाला सेवू ॥ १ ॥ वोरसले कामधेनूचे दुभते । सपूर्ण आइतें गगनभरी ॥ २ ॥ सत सनकादिक गोमट्या परवडी । विभाग आयडी इच्छेचिये ॥ ३ ॥ तुका म्हणे मधीं घालू नारायण । मग नव्हे सीण कोणा खेळें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अनुवाद-स्मरण वोरसले-प्राप्त झाले, गोमट्या-चांगल्या परवडी-प्रकारांनी अर्थ - भगवंताच्या स्वरूपाचे स्मरणच सर्वकाळ करून या गोपाळांच्या बरोबर आपण या काल्याचे सेवन करू या १ आज कामधेनूचे हे दुभते आपणास प्राप्त झाले आहे या दुग्धामृताने पूर्णपणे सारे आकाश भरून गेले आहे २ सनकादिक संतानी विविध अशा चांगल्या प्रकारानी व मोठ्या प्रमाने त्याचा लाभ आपल्या इच्छेप्रमाणे घ्यावा ३ तुकाराम महाराज म्हणतात, मध्यभागी नारायणाला ठेवून खेळ केला म्हणजे मग कसलाही क्षीण कधी आपणास होत नाही ४ २१४ अधिकाचा मज काटाळा । तुम्हा गोपाळा संगति ॥ १ ॥ काय नाही तुम्हापाशीं । सकळाविशीं सपन्न ॥ २ ॥ उद्योगाचा नेघें भार । लागल्या सार पुरते ॥ ३ ॥ तुका म्हणे अधीर जिणे । नारायणे न करावे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अधिकाचा-ऐश्वर्याचा अर्थ - नारायणा, तुमच्या व या गोपाळांच्या संगतीमुळे मला ऐश्वर्याचा व संपत्तीचा कंटाळाच आलेला आहे १ तुमच्या संगतीत काय मिळण्यासारखे नाही? सर्व संपत्तीचा साठा यथ आहे २ कोणत्याही व्यावहारिक कामाचा भार आपण घेण्याची जरुरी नाही येथे आल्याचे सुख हेच समाधानाचे सार आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात नारायणा, माझे जिणे इतके अधीर करू नका ४ २१५ जालो आता एके ठायीं । न वचू काहीं एकमेका ॥ १ ॥ सरलो हेगे देउनि मोट । कटकट काशाची ॥ २ ॥ सोडोनििया गांठीं पाहें । काय आहे त्यात ते ॥ ३ ॥ तुका म्हणे जालो निराळा । आता गोपाळा देऊ गोमा ॥ ४ ॥
सार्थ तुकारामगाथा १०९ शब्दार्थ व टीपा - यंचूं-सोडू, हेंगे-इकडे, बोभा-हाक अर्थ :- आता देव व मी एकच झालो आहोत. आता आम्ही एकमेकाना सोडून देणार नाही. १ ही सर्व देहाची मोटकुळी श्रीहरीला इकडे अर्पण करून मी आता मुक्तच झालो आहे. आता कसली फटफट आली आहे ? २ आता हृदयग्रंथी सोडून त्यात काय काय आहे याचा तपास घेऊ लागलो आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता मी सर्व व्यावहारिक बाबींतून मोकळा झालो. आता श्रीकृष्ण्णास हाक मारणे एवढेच काम उरले आहे. ४ २१६ या रे करूं गाई । जमा निजलेती काई । बोभाट्यानें आई । घरा गेल्या मारील ॥ १ ॥ घाला घाला रे फुकारे । ज्याची तेणेचि मोहरे । एवढेचि पुरे । केल्यानें सावध ॥ २ ॥ नेणोनियां खेळा । समय समपाच्या वेळा । दुश्चिताजवळ । मिळालेति दुश्चित ॥ ३ ॥ तुका म्हणे शीक । न धरिता लागे भीक । धरा सकळीक । मनेरी धांवा वळतियां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- फुकारे-मोठ्या हाका, ओरडा, मनेरी-मनरूपी गाय अर्थ :- गोपाळांनो, चला आपण आपल्या गाई आता जमा करू. बेसावधपने झोपलात काय ? उठा ना. गाई नीट सापडल्या नाहीत तर बोभाटा होईल आणि मग घरी गेल्यावर आपली आई आपणास मार देईल. १ ज्याने त्याने आपापल्या गाईस मोठ्याने हाका माराव्यात रे एवढ्याच ओरडण्याने गाईंना सावध करून परत बोलाव्या. २ आता घरी परतायची वेळ झाली आहे हे न समजून तुम्ही, समयाचे महत्त्व न ओळखून तुम्ही खेळ खेळत बसता, आणि एका अवगुणी गोपाळाजवळ आणखी अवगुणी मित्र जमा होतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हास अनेकदा शिकविले आहे, ते जर तुम्ही ध्यानात धरले नाही तर मग भीक मागण्याचा प्रसंग येईल यासाठी तुमची मनोरूपी गाय तुम्ही प्रथम आवरून धरा. कारण तीच धावपळ मोठ्या ओढाळपणे करते; तिला सर्वांनी सावरून धरावे. ४ २१७ वोळलीचा दोहूँ पान्हा । मज कान्हा सांगितला ॥ १ ॥ घ्या जि हेंगे क्षीर हातीं । निगुतीने वाढावे ॥ २ ॥ सांगितले केले काम । नव्हे धर्म सत्याचा ॥ ३ ॥ तुका म्हणे नवे जुने॑ । ऐसे कोणे सोसावें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वोळली-वळलेली, हेंगे-दूध, निगुतीने-सावधतेने, सत्याचा-स्वतःचा अर्थ :- ही गाय वळलेली असून हिची धार काढ असे श्रीकृष्णाने मला सांगितले आहे. हेच दूध सर्वांना मिळावे म्हणून मोठ्या सावधतेने मी ते सर्वांना वाढणार आहे. २ ईश्वराने जे काम मला सांगितले ते मी केले. हा काही माझा स्वतःचा धर्म म्हणून सांगितला नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता नव्याजुन्याचे कष्ट पुन्हास सहन होण्यासारखे आहेत ? ४ २१८ येईल ते घेइन भागा । नव्हे जोगा दुसराया ॥ १ ॥ आवडी ते तुम्ही जाणा । बहु गुणांसारिखी ॥ २ ॥ मज घेती डागवरी । सर्वे हरि नसलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे राबवा देवा । करीन सेवा सांगितली ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - डांगवरी-काठीने मारण्यास.
११० सार्थ तुकारामगाथा अर्थ :- जे माझ्या वाटणीस सर्वांना देऊन झाल्यावर येईल ते मी निमुटपणे घेईन. मी काही इतरासारखा हावरा मनुष्य नाही. १ चांगल्या गुणवान माणसांसारखीच माझी आवड आहे. ती तुम्ही जाणून घ्या. २ हा परमेश्वर क्षणभरही मजजवळ नसला तर हे लोक मला काठीने मारण्यास तयार होतील. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला आपले राबवून घ्या. जी सेवा सांगाल ती मी मनोभावे करीन. ४ २१९ अंतरली कुटी मेटी । भय धरूनियां पोटीं । म्हणतां जगजेठी । धांवें करुणाउत्तरीं ॥ १ ॥ बाप बळिया शिरोमणी । उताविळ या वचनीं । पडलिया कानीं । धांचा न करी आळस ॥ २ ॥ बळ दुणी शरणागता । स्वामी वाहों नेदी चिंता । आइतेचि दाता । पंगतीस बैसवी ॥ ३ ॥ वाहे खांदीं पावती घरा । त्याच्या करी येरझारा । बोबड्या उत्तरा । स्वामी तुकया मानवले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कुटी मेटी-घरदार, दुनी-दुप्पट अर्थ :- घरादाराला जी माणसे अंतरली होती व जी मोठेच भय पोटात धरून होती त्यांनी करुण वाणीने ईश्वराचा धावा केल्याबरोबर त्यांना ईश्वराचे साह्य झाले. १ हा ईश्वर आपल्या पित्याप्रमाणेच असून मोठा बलवान आहे. कुणाची हाक कानी पडताच हा आळस न करता उतावीळ होऊन भक्ताच्या रक्षणार्थ धावत येतो. २ जो शरणागत आहे त्यास असे परमेश्वराचे साह्य झाल्यामुळे त्याचे बळ दुप्पट होते. ईश्वर त्यास कसलीही चिंता करू देत नाही. हा दाता ईश्वर त्यांना आपल्याच पंगतीस बसवितो ३ आणि तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या भक्ताचे बोबडे बोल ऐकून हा माझा स्वामी भक्तांना खांद्यावर घेऊन त्याच्या घरापर्यंत पोचते करतो वारंवार त्यांच्या घरी त्याची येजा असते ४ २२० धन्य तें गोधन कांबळी काष्ठिका । मोहरी पांवा निका ब्रीद वांकी ॥ १ ॥ धन्य तें गोकुळ धन्य ते गोपाळ । नर नारी सकळ धन्य जाल्या ॥ २ ॥ धन्य ते देवकी जसवंती दोहीचें । वसुदेवनंदाचे भाग्य जाले ॥ ३ ॥ धन्य त्या गोपिका सोळा सहस्र बाळा । यादवां सकळां धन्य जाले ॥ ४ ॥ धन्य म्हणे तुका जन्मा तोंचि आली । हरिरंगों रंगली सर्वभावें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- काष्ठिका-काठी अर्थ :- गोकुळातील गोधन, कांबळे, काठ्या, मुरली, पावा, वाकया इत्यादी भूषणे या सर्व वस्तू श्रीकृष्णाच्या सहवासाने धन्य आहेत १ ते गोकुळ धन्य आहे तेथील गोपाळ, स्त्री-पुरुष सर्वच जण धन्य आहेत. २ श्रीकृष्णाच्या माता देवकी व यशोदा याही धन्य होत. वसुदेव व देवकी यांच्या भाग्याचे वर्णन किती करावे? ३ त्या गोपिका व सोळा सहस्र स्त्रिया आणि सर्व यादवही धन्य होत ४ तुकाराम महाराज म्हणतात, जी हरीच्या भक्तीत रंगून गेली ती सर्व माणसे जन्मास येऊन धन्य झाली आहेत. ५ २२१ गौळणी बांधिती धारणासि गळा । खेळे त्या गोपाळांमाजी ब्रह्म ॥ १ ॥ धांवोनियां मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाईंपाठीं ॥ २ ॥ तुका म्हणे सूर्य कळा ज्याचे अंगीं । भोळेपणालागीं भीक मागे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- धारणासि-फुसलाव्याला
सार्थ तुकारामगाथा १११ अर्थ :- गोकुळच्या गोळणी श्रीकृष्णाला त्याने चोरी करू नये वा खोडी करू नये म्हणून उखळाशी दाव्याने बांधून ठेवितात. हे परब्रह्म त्या गोपाळांच्यात खेळ खेळत बसते. १ यशोदेच्या मागे मागे धावून हा श्रीकृष्ण तिला भोजनही मागतो. हाच श्रीकृष्ण गाईंच्या मागे रानोरान हिंडून क्रीडा करतो. २ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीकृष्णाच्या अंगी सर्व प्रकारचे ज्ञान असून तो एका भोळेपणासाठी भीक मागतो. ३ २२२ देखिलासि माती खाता । दावियानें बांधी माता ॥ १ ॥ जाळी घेउनि कांबळी काठी । गाई वळी वेणु पाठीं ॥ २ ॥ मोठें भावाचचि वळ । देव झाला त्याचें बाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे भवतासाठीं । देय धावे पाठोपाठीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- जाळी-जाळे, वेणु-पावा, पाठोपाठीं-पाठोपाठ अर्थ - देवा, यशोदामातेने तुला माती खात असताना पाहिले. त्यासाठी तुझ्या आईने तुला दाव्याने बांधले. १ हातात जाळे घेऊन, खांद्यावर कांबळे व काठी घेऊन गाई वळायला हा निघाला आहे. याच्या हातात पावा आहे. २ भावभक्तीच्या बळाने हा देव त्याच्या घरी बालकाच्या रूपाने जन्मास आला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, भक्तासाठी देव पाठोपाठ त्याच्या रक्षणार्थ धावत असतात ४ विवरण :- या दोन अभंगात श्रीकृष्णाच्या गोकुळातील खोडकरपणाचा संक्षेपाने उल्लेख तुकारामबुवांनी केलेला आहे पहिल्या क्र २२१ च्या अभंगात श्रीकृष्णास त्याच्या खोडकरपणामुळे उखळाशी किंवा मुसळखांब्याशी बांधण्यात आले होते त्याचा उल्लेख आला आहे श्रीकृष्णास मांडीवर घेऊन यशोदा एकदा दधिमंथन करीत असता चुलीवरचे दूध उतू गेले म्हणून यशोदा कृष्णास तिथेच ठेवून दूध उतरण्यास धावली याचा राग श्रीकृष्णास आला व त्याने डेराच फोडून टाकला, उरलेले लोणी खाऊन टाकले यशोदेस हे सारे कृत्य समजताच तिला फार मोठा राग आला ती या खोडकर पोरास दाव्याने मुसळखांब्याशी बांधायला निघाली आणि भला मोठा दोर आणून त्याला शामन म्हणून बांधीत असताना कितीही मोठे वेढे घेतले तरी दावे दोनतीन बोटे कमीच पडत राहिले. आणखी कितीतरी दावी एकमेकास बांधून घेतली तरी तो अपुरीच राहिली श्रीकृष्णास पुत्रभावाने पाहणाऱ्या या यशोदामातेस आपल्या पुत्राची विश्वव्यापकता व ईश्वरस्वरूपता पटली अशी कथा भागवत पुराणात आलेली आहे. दुसऱ्या अभंग क्रमाक २२२ मध्ये श्रीकृष्णाने माती खाल्याच्या कथेचा उल्लेख तुकारामांनी केलेला आहे एकदा मुलामुलात खेळत असतांना श्रीकृष्णाने माती खाल्ली असा पुकारा करीत त्याचे सोबती यशोदामातेकडे आले त्यावर यशोदेने श्रीकृष्णस पकडून धाक दाखविण्यास सुरुवात केली 'आई, मी माती मुळीच खाल्ली नाही.' असे श्रीकृष्ण परोपरीने सांगत असतांनाही यशोदेस खरे वाटले नाही 'तुझे तोंड दाखव पाहू' असे यशोदेनं म्हणताच श्रीकृष्णाने तोंड उघडले. तेव्हा तिला सर्व विश्व श्रीकृष्णाच्या मुखात सामावले असल्याचे दिसून आले सर्व सृष्टी, समुद्र, नद्या, पर्वत, चंद्र, सूर्य यांनी भरलेले श्रीकृष्णाचे मुख पाहून यशोदेस नवल तर वाटलेच, पण पुत्रभावाने पाहणारी यशोदामाता ही आपल्या मुलाचे धोरण समजून चुकली २२३ हा गे माझे हातीं । पाहा कवळ सांगाती ॥ १ ॥ हेंचें दिला खातो भाग । कराल तर करा लाग ॥ २ ॥ धाले ऐसे पोट । घरीं करूनियां खोट ॥ ३ ॥ तुका म्हणे घरीं । मग कंच्या या परी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लाग-खटपट, प्रयत्न. अर्थ :- आपल्या बरोबर असलेल्या सोबत्यांस हे गोपाळ सांगतात, 'हा पाहा माझ्या हातीं खात्याचा घास आहे.' १ हा भाग ह्याला देवाने दिलेला असतो. तोच तो खात असतो. तुम्हास तो हवा असेल तर तुम्हीही प्रयत्न
११२ सार्थ तुकारामगाथा करून पाहा २ तुमचे पोट भरले असे तुम्ही बोट वर करून म्हणता ३ तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे सुख तुम्हाला तुमच्या घरी मिळणार आहे काय ? ४ २२४ अवघे अवघीकडे । दिले पाहे मजकडे ॥ अशा सबगडे । सहित थोरी लागली ॥ १ ॥ का रे धरिला अबोला । माझा वाटा देई मला ॥ सिदोरीचा केला । झाडा आता निवडे ना ॥ २ ॥ भूक लागली अनंता । का रे नेणसी जाणता ॥ भागलो वळितां । गाई सैरा ओढाळा ॥ ३ ॥ तुका करुणा भाकी । हरि पाहे गोळा टाकी ॥ घेता जाला सुखी । भीतरी वाटी आणीका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अशा-आशा, झाडा-हिशोब, सैरा-स्वैर अर्थ - श्रीकृष्णा, तू सर्वांना सर्व काही दिलेस, आता माझ्याकडे थोडे पाहून मलाही काही दे ना माझ्या सोंगड्यांसहित सर्वांना तुझी मोठीच आशा लागून राहिलो आहे १ श्रीकृष्णा, तू माझ्याशी अबोला का रे धरिलास ? माझा वाटा मला ताबडतोब देऊन टाक ना मी माझ्या पापपुण्यात्मक शिदोरीचा हिशेब तुझ्याजवळ पुरा केला आहे ना ? मग आता तू माझा निवाडा का करीत नाहीस ? २ अनंता, आता फार भूक लागली आहे रे तू सगळा जाणता असून तुला हे का रे समजत नाही ? मी आता या इद्रियरूपी गाई पळतावळता थकून गेलो आहे या गाई मोठ्या सैरावैरा धावणाऱ्या व ओढाळ आहेत ३ श्रीकृष्णा, मी तुझी करुणा भाकत आहे तू काल्याचा घास माझ्या वाट्याचा मजकडे टाक ना या काल्याचा घास घेत असताना तुकाराम महाराज म्हणतात मी फार सुखी झालो आहे, मी तो माझ्या सोबत्याना वाटून दिला ४ २२५ आम्ही गोवळीं रानटें । नव्हो जनातील धीटें ॥ १ ॥ सिदोरीचा करु काला । एक वाटितो एकाला ॥ २ ॥ खेळो आपआपणांशीं । आमचीं ती आम्हापाशीं ॥ ३ ॥ मिळालो नेणते । तुका कान्होबा भोवते ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - रानटें-रानवट अर्थ - आम्ही आपले गाई राखणारे रानवट गुरेराखी आहोत लोकात धीटपणे कसे वागावे हे आम्हास माहित नाही १ आम्ही सर्वांच्या शिदोऱ्याचा एकच काला करू व सर्वांना वाटू २ आम्ही एकमेकात खेळ खेळू, जी आमचीच मंडळी आहेत ती आम्हासाच येऊन मिळतील ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या कान्होबाच्या भोवती सर्व नेणते गोपाळ एकत्र झालो आहोत ४ २२६ “अवघिया दिला गोर । मजकरे पाहीना ” ॥ १ ॥ फुंदे गोपाळ डोळे चोळी । दुगा थापली हाणे तोडा ॥ २ ॥ आवडती थोर मोठे । मी रे पोरटें दैन्यवाणे ॥ ३ ॥ तुका म्हणे जाणे भाव । जीविचा देव बुझावी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - गोर-गोड अर्थ - श्रीकृष्णाच्या संगतीतील एक भोयडा गोपाळ म्हणत आहे, 'या श्रीकृष्णाने सर्वांना गोडगोड घास दिले आणि तो माझ्याकडे पाहातसुद्धा नाही' १ असे म्हणून तो गोपाळ डोळे चोळून चोळून स्फुदून रडू लागला,
सार्थ तुकारामगाथा ११३ आपल्या तोंडावर व ढुंगणावर धपडा मारू लागला. २ या बोबड्याने म्हटले, 'श्रीकृष्णास थोर थोर लोक हवेत. त्यांची मैत्री याला आवडते. मी तर एक दैन्यवाणे गरीब पोरटे आहे.' ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्या गरिबाच्या मनातील भाव जाणून श्रीकृष्णाने त्या गरीब जीवाची समजूत काढली. ४ मृदुंग पाथ्या-अभंग २२७ मागें पुढें पाहे सांभाळूनि दोनी ठाय । चुकावूनि जाय गडी राखें गडियांसि ॥ १ ॥ मुरडे दंडा दोहों तोंडे गडिया सावध करी । भेटतियासंगें तया हाल तुजवरी ॥ २ ॥ गडिया गडी वांटुनि देईं । ज्याचा सोडो तेचि ठायीं ॥ ३ ॥ अगळचा वळे करील काय । तुज देणें लागे डोय ॥ ४ ॥ नवां घरीं पाउला करीं । सांपडें तो तेथें धरीं ॥ ५ ॥ जिंकोनि डाव करीं । टाहो सत्ता आणिकांवरी ॥ ६ ॥ सांपडोनि ढाईं बहु । काळ गुंतलासी ॥ ७ ॥ बळिया गडी फळी । फोडी न धरितां त्यांसी ॥ ८ ॥ चुकांडी जो खाय मिळोनि अंगीं जाय । गुंतलासी काय तुका म्हणे अझूनी ॥ ९ ॥ शब्दार्थ व टीपा :- ठाय-बाजू, हाल-डाव, डोय-डाव, टाहो-घोष, चुकांडी-झुकांडी. अर्थ :- मागेपुढे म्हणजे प्रवृत्तीकडे व निवृत्तीकडे नीट लक्ष देऊन दोन्ही बाजूंच्या गड्यांना चुकवून तू जा. १ प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही बाजूंच्या गड्यांना वळवून तू त्यांना सावध कर. जे कोणी तुला भेटतील त्यांचा डाव तुझ्यावर आहे हे ध्यानात असू दे. २ प्रवृत्ती व निवृत्ती यांच्याप्रमाणे गड्याची वाटणी करून तू ज्याचा गडी त्यासच देऊन टाक. ३ विनाकारण अधिक बळाचा उपयोग काय ? तू त्यांना डाव द्यायला हवाच. ४ नऊ ग्रहांच्या रूपाने असणाऱ्या या नऊ गड्यांचा पाठलाग करून ते जिथे सापडतील तिथे त्यांना तू धर. ५ यांच्यावर डाव जिंकून दुसऱ्यावरील आपली सत्ता तू घोष करून चालू ठेव. ६ या बलवान प्रवृत्तींच्या ताब्यात सापडून तू पुष्कळ काळ गुंतून राहिला आहेस. ७ या बलवान गड्यांची फळी तू त्यांना न धरता फोड व त्यातून तू पार हो. ८ झुकांडी देऊन जो गडी श्रीकृष्णस्वरूपी मिसळून जातो, त्याची संगत तू धर. तुकाराम महाराज म्हणतात, अजून तू या प्रवृत्तींत, या खेळात का विनाकारण गुंतून राहिला आहेस ? ९ २२८ पाहा रे तमासा तुमचा येथें नव्हे लाग ॥ देईन तो भाग आलियाचा बाहेरी ॥ १ ॥ जागा रे गोपाळांनो ठायीं ठायीं जागा । चाहुलीनें भागा दूर मजपासूनि ॥ २ ॥ न रिघतां ठाय आम्हा ठाया पाळतियां । भयाभीत यांयां तेथें काय चांचपां १ ॥ ३ ॥ तुका म्हणे हातां चढे जीयाचिये साटीं । मिटक्या देतां गोड मग लागतें शेवटीं ॥ ४ ॥ १ चांचपाल. तु. गाथा...१५
११४ , सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा :- तमासा-गंमत, लाग-फायदा. अर्थ:- गोपाळांनो, तुमचा या ठिकाणी फायदा होणार नाही तुम्ही या श्रीहरीची गंमत तर पाहा. चोरी करून बाहेर आल्यावर मग तुमचा लाभ तुम्हांस तो देईल. १ गोपाळांनो, तुम्ही आपआपल्या जागी जागेपणाने असा. मजपासून दूर राहण्यास व असावधपणे वागल्यास तुम्हास त्रास होईल. २ आम्ही त्या श्रीहरीच्या ठिकाणी प्रवेश न करताही नुसती पाळत ठेवूनही आम्हांला त्याची सर्व ठिकाणे माहीत आहेत. त्याच्याशिवाय तुम्ही मनात भय बाळगून वागाल तर व्यर्थ इतर जागा चाचपीत बसाल ३ तुकाराम महाराज म्हणतात, जिवावर उदार होऊन तुम्ही त्याच्याकडे जा; मग शेवटी ते नवनीत मिटक्या मारून खाताना तुम्हांस फार गोड वाटेल. ४ २२९ डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं ॥ १ ॥ खेळ खेळता फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥ २ ॥ मारिती माया घेती जीव । नाहीं कींव अन्यायें ॥ ३ ॥ तुका कान्होबा मागें । तया अंगें कळों आलें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- डोया-डोकी अर्थ:- या कृष्णाने अनेक प्रकारचे खेळ करून सर्व पोरांना डावात हरविले व त्याची इंद्रियरूपी गुरे चुकविली. १ खेळ खेळता खेळता अनेकांची अभिमानाची डोके फुटली; आणि तो श्रीकृष्ण तर आपण होऊन निराळा राहिला. २ ही वरवरची माया सर्वांना मारून त्याचा जीव घेते. तिला कसलीही दया नसल्याने ती अन्या- यानेच वागते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी या कान्होबाच्या मागे नेहमीच असतो. त्याच्या अंगसंगाने मला हे सर्व कळून चुकले आहे ४ २३० आतां हेचि जेऊं हेचि जेऊं । सवें घेऊं शिदोरी ॥ १ ॥ हरिनामाचा खिचडा केला । प्रेमें मोहिला साधनें ॥ २ ॥ चवों चवों घेऊं घास । ब्रह्मरस आवडी ॥ ३ ॥ तुका म्हणे गोड लागे । तो तों मागे रसना ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- खिचडा-खिचडी, मिश्रण, रसना-जीभ अर्थ-हरिनामाचे व काल्याचे भोजन हेच आमचे मुख्य जेवण होय. ही शिदोरी आम्ही यापुढे नेहमीच बरोबर घेऊ. १ श्रीहरीचे नाम, त्याचे गुणसंकीर्तन, त्याची भक्ती याची खिचडी काल्याच्या रूपाने करून याच प्रेमाने, व भक्तीच्या साधनाने तो मोहित होणारा आहे. २ या ब्रह्मरसाच्या घासाचे मोठ्या आवडीने सेवन करून त्याची चव बारकाईने आम्ही घेत राहू. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा काल्याचा घास किती गोड लागतो म्हणून सांगू ? तो जो जो गोड लागतो तो तो ही जीभ त्याची इच्छा अधिक अधिक करीत आहे ४ २३१ अवघेंचि गोड जाले । मागीलये भरी आलें ॥ १ ॥ साह्य जाला पांडुरंग । दिला अभ्यंतरी संग ॥ २ ॥ थडिये पावतां तो वाव । मार्गे वाहावतां ठाव ॥ ३ ॥ तुका म्हणे गेले । स्वप्नींचें जागें जाले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भरी आले-भरून आले, थडिये-किनाऱ्यावर, वाव-व्यर्थ अर्थ.- देवा, आम्ही मागे जे जे कर्म केले होते ते ते सर्व तुला वाहून टाकल्यामुळे आता सर्वच गोड होऊन गेले आहे. १ आम्हांस आता पांडुरंगाचे साह्य असल्यामुळे त्याचा निवास आमच्या हृदयातच कायमचा आहे. २ महापुरात बुडणाऱ्यास पैलतीर गाठता आल्यानंतर मग बुडण्याची भीती व्यर्थच असते. ३ तुकाराम महाराज
सार्थ तुकारामगाथा ११५ म्हणतात, त्याप्रमाणे माझे झाले आहे. एखादे भयंकर स्वप्न पडल्यानंतर जागे झाल्यावर जसे त्याचे काहीच उरत नाही त्याप्रमाणे त्या पांडुरंगाच्या संगतीने माझी भीती वृथा ठरलेली आहे. ४ . २३२ तुजसवें येतों हरी । आम्हां लाज नाहीं तरी । . उचलिला गिरी । चांग तईं वांचलों ॥ १ ॥ मोडा आतां खेळ । गाई गेल्या जाला वेळ । फांकल्या ओढाळ । नाहीं तोचि आवरा ॥ २ ॥ चांग देवें यमुनेसी वांचलों बुडतां । निलाजिरों आम्ही नाहीं भय धाक या अनंता ॥ ३ ॥ खातो आगी माती । आतां पुरे हा सांगाती । भोंवतां भोंवेल । आम्हां वाटतें हें चित्तीं ॥ ४ ॥ तुका म्हणे उरी नाहीं तुजसवें । शाहाणिया १ दुरी छंद भोळियां सवें ॥ ५ ॥ . शब्दार्थ व टीपा - गिरी-गोवर्धन पर्वत, चांग-चांगले, सावधपणाने, फांकल्या-पसरल्या. अर्थ:- श्रीहरी, आमच्या मनास काही लाजच नाही. आम्ही जणु कोडगेच आहोत. आम्ही पुनः पुनः तुझ्या बरोबरच येणार. कारण आम्हास माहीत आहे की तूच इंद्राच्या अवकृपेच्या वेळी गोवर्धनपर्वत उचलल्यामुळे आम्ही चांगले वाचलो आहोत. १ आता फार वेळ झाल्यामुळे खेळ मोडा. गाई चरायला जाऊन फार वेळ झाला. जोपर्यंत या इंद्रियरूपी गाई ओढाळ होऊन चहू दिशास पसरल्या नाहीत तो पर्यंतच त्याना आवरिले पाहिजे. २ या देवाच्या कृपेने व आमच्या चांगल्या देवाने आम्ही यमुनेत बुडत असताना वाचलो त्यामुळे या हरीचे उपकार आमच्यावर फार आहेत. आम्ही निलाजरेच आहोत या अनंताला मात्र कसलाही धाक किंवा कसलीही भीती नाही, ३ तो अग्नी, माती काहीही खातो. असल्या या देवाची संगत आता नकोशी वाटते. कारण याची अशी ही विपरीत वागण्याची संगत आम्हास चांगलीच भोवेल असे आमच्या मनात वाटते. ४ तुकाराम महाराज म्हणतात, श्रीकृष्ण, तुझ्याबरोबर आम्ही कसे पुरे पडणार? तुझ्यासारख्या शहाण्यापासून चार पावले दूरच असावे व भोळयाभाबड्यांची संगत धरावी. ५ विवरण:- श्रीकृष्णाच्या बालपणातील अद्भुत क्रीडा पाहून त्याच्या संगतीचा मनात धाक निर्माण झाल्याची एक विचित्र पण गमतीची तक्रार तुकारामबुवांनी गोपाळांची म्हणून या अभंगात मांडलेली आहे. या श्रीकृष्णाचे उपकार फार मोठे, याच्याच कृपेने सर्व संकटे टळली, शेवटी निलाजरे होऊन याचीच संगत धरणे प्राप्त आहे हे माहीत असूनही याच्या अचाट कृत्याची धास्ती मनात असल्यामुळे एक प्रकारे याची संगत नको तरी आपणास अनिष्ट रूपाने भोगावी लागेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे तुकारामबुवांनी येथे गोवर्धन उचलून श्रीकृष्णाने गोकुळातील लोकांचे रक्षण केल्याचा उल्लेख केला आहे. ही कथा भागवतादी पुराणातून सविस्तर येते. दर वर्षी पावसासाठी लोक इंद्रास तृप्त करण्यासाठी इंद्रयाग करीत असत. इंद्राचा हा अभिमान दूर करण्यासाठी इंद्राऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास श्रीकृष्णाने सर्वांना सांगि- तले. गोकुळातील लोकांचा मुख्य व्यवसाय गोरक्षणाचा यासाठी सर्वात अधिक मदत गोवर्धन पर्वताची होते असा त्याच्या बोलण्याचा अर्थ मग नदासहित सर्व गोपाळांनी गोवर्धनाचीच पूजा केली त्याला महानैवेद्य दाखविला गाईंना कोवळे गवत घातले, गोवर्धन हाच मुख्य देव त्याचा झाला. या कृत्याचा इंद्रास फार मोठा राग आला. त्याने सांवर्तक नावाच्या मेघांना बोलावून गोकुळात सर्वत्र वृष्टी करण्यास आज्ञा केली. गोकुळावर यानंतर भयंकर स्वरूपात जलवृष्टी होऊ लागली. जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन गेले. आवह व प्रवह नावाच्या सोसाट्याच्या वाऱ्यानी १ शाहाणे या भावे दुरी छंद भोळिया । किंवा शाहाणे या दुरी । छंद भोठिया भावे ।
११६ सार्थ तुकारामगाथा सर्वांची दाणादाण करून सोडली. सर्वजण श्रीकृष्णास शरण गेले. मग या आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाने लहान मूल एखादे 'अळंबे' (पावसाळ्यांतील कुत्र्याची छत्री) जसे उचलते तसा तो गोवर्धन पर्वत लीलेने आपल्या डाव्या हातावर उचलून धरिला व त्याच्या खाली सर्व गोकुळनिवासी स्त्रीपुरुष सुखाने राहू लागले. गोवर्धन पर्वताच्या आश्रयाने श्रीकृष्णाने स्वबांधवांचे याप्रमाणे रक्षण केले. यानंतर इंद्राचाही अभिमान नाहीसा झाला. २३३ नको आम्हांसवें गोपाळा । येऊं ओढाळा तुझ्या गाई ॥ १ ॥ कवण धांवें त्यांच्या मागें । मागें मागें येरझारी ॥ २ ॥ न बैसती एके ठायीं । धांवती दाही दाहा वाटां ॥ ३ ॥ तुका म्हणे तूं राख मनेरी । मग त्या येरी आम्ही जाणीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मनेरी-मनरूपी गाय, येरी-इतर अर्थ:-श्रीकृष्णा, गोपाळा, तू आमच्या बरोबर नको येऊस. तुझ्या या गाई फारच ओढाळ आहेत. १ त्याच्या मागे कोण धावणार रे एकसारखे ? त्यांच्या मागून कुणी एकसारख्या फेऱ्या कराव्यात ? २ त्या कधीच एके ठिकाणी बसत नाहीत, दहा वाटानी दहा दिशाना धावतात त्या ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू फक्त या मनरूपी गाईस सांभाळ; इतर मग आम्ही नीटपणे सांभाळू. ४ २३४ मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायाघरीं गांजियलों ॥ १ ॥ तुजविणें ते नेदी कोणा । सांगतां खुणा जिवें गेलों ॥ २ ॥ वांयांविण केली येरझार । आतां पुरे घर तुझी माया ॥ ३ ॥ तुका म्हणे तूं आम्हां वेगळा । राहें गोपाळा म्हणउनी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -मायाघरी-आईच्या घरी. अर्थ:-श्रीकृष्णा, तुझ्या घरी तुझी शिदोरी आणण्यासाठी गेलो, तो तुझ्या आईने फार त्रास दिला. रागावली ती. १ तुझ्याशिवाय कुणालाही ती शिदोरी द्यायला तयार होईना. तुझ्या ओळखीच्या सर्व खुणा मी सांगितल्या जीव तोडून मी विनवणी केली; पण व्यर्थ. २ तुझ्या घरच्या माझ्या फेऱ्या व्यर्थ गेल्या आता, देवा, तुझे घरही पुरे व तुझी मायाही पुरे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, श्रीकृष्णा तू आमच्यापासून नेहमीच निराळा राहतोस. कारण आम्ही बिचारे गोपाळ ना ! ४ २३५ काकुलती येतो हरी । क्षणभरी निवडितां ॥ १ ॥ तुमची मज लागली सवे । ठायींचे नवे नव्हों गडी ॥ २ ॥ आणीक बोलाबिती फार । बहु थोर नावडती ॥ ३ ॥ भाविके त्यांची आवडी मोठी । तुका म्हणे मिठी घाली जिवें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- निवडिता-दूर करताच अर्थ-या श्रीकृष्णाला आम्ही क्षणभर जरी दूर केले तरी तो अगदी काकुळतीस येतो. १ तो म्हणतो 'गोपाळांनो, तुमची सवय आम्हास फार आहे. तुम्ही प्रथमपासून आमचेच गडी आहात; हा सबंध काही नवा नाही.' २ या कृष्णाला दुसरे थोर थोर लोक बोलवतात, पण त्याला ते फार मोठें लोक आवडत नाहीत. ३ तुकाराम महाराज म्हणतात, जे भाविक आहेत, त्याची फार मोठी आवड या श्रीकृष्णास असते. तो त्यांना मोठा जीव लावून मिठी घालतो. ४ २३६ वरता वेंधोनि घातली उडी । कळंबाबुडीं यमुनेसी ॥ १ ॥ हरि बुडाला बोंब घाला । घरचीं त्यांला ठावा नाहीं ॥ २ ॥
सार्थ तुकारामगाथा ११७ भवनदीचा नकळे पार । काळिया माजी थोर बिलार ॥ ३ ॥ तुका म्हणे काय वाउग्या हाका । हातांचा गमावुनियां धिका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेंदोनि-चढून, बिलार-विषारी, धिका-रडता. अर्थ :-यमुनेच्या तीरावरील कळंब वृक्षाच्या फांदीवर चढ़न श्रीकृष्णानें नदीच्या डोहात उडी टाकली. १ तेव्हा सर्व गोपाळ ओरडू लागले, 'अरे हरी बुडाला, कृष्ण बुडाला. बोंब मारा ना. कारण याच्या घरी जे आहेत त्यांना यासंबंधी काहीच माहीत नाही.' २ या भवनदीचा काही ठाव कधी लागत नाही व या नदीच्या पात्रात काळिया नावाचा फार मोठा विषारी नाग आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हातच्या हरीला दवडू नका. व्यर्थ हाका का मारता ? का रडत बसता ? ४ २३७ अवघीं मिळोनि कोल्हाळ केला । आतां होता म्हणती गेला ॥ १ ॥ आपलिया रडती भावें । जयासवें जयापरी ॥ २ ॥ चुकलों आम्ही खेळतां खेळ । गेला गोपाळ हातांचा ॥ ३ ॥ तुका म्हणे धांवती थडी । न घली उडी आंत कोणी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा- कोल्हाळ-गोंगाट, थडी-काठापर्यंत. अर्थ :-मग सर्व गोपाळांनी मिळून एकच गोंगाट केला; व म्हणू लागले, 'हा हरी आता की हो होता. आता कसा नाहीसा झाला ?' १ जो तो आपापल्या भावनेने रडू लागला. ज्याची जशी त्याच्याशी संगत होती तशा प्रमाणात त्यांना शोक झाला, २ ते म्हणू लागले, 'आम्हीच खेळ खेळताना चुकलो. म्हणूनच आमच्या हातून हा आमचा गोपाळ कृष्ण गेला.' ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे म्हणून काही गोपाळ नदीच्या काठापर्यंत धावत गेले; पण आत उडी घालून श्रीकृष्णाचा शोध घेण्याचे धैर्य मात्र कुणास झाले नाही. ४ २३८ भ्यालीं जिया चुकलीं देवा । नाहीं ठावा जवळों तो ॥ १ ॥ आहाकटा करिती हाय । हात डोकें पिटिती पाय ॥ २ ॥ जबळी होतां नकळे आम्हां । गेल्या सीमा नाहीं दुःखा ॥ ३ ॥ तुका म्हणे हा लाघवी मोठा । पाहे खोटा खरा भाव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आहाकटा-हायहाय. अर्थ :- श्रीकृष्ण यमुनेच्या डोहात बुडाला, त्याचे रक्षण आपण केले नाही या विचाराने ते सर्व गोपाळ भ्याले उडी टाकून त्याला वर काढण्याचे धैर्य कुणास नव्हते. ज्याने त्याने आपल्या जिवास जपले व देव चुकविला. तो जवळच आहे तरी त्याचा तपास आता काही केल्या लागेना. १ मग सर्वजण हायहाय करून दुःख करू लागले. जो तो हात, पाय, डोकें पिटून घेऊ लागला. २ व म्हणू लागला; 'हा कृष्ण आमच्या अगदी जवळ होता तेव्हा त्याचे महत्त्व आम्हांस समजले नाही; व हा आता दूर जाताच आमच्या दुःखास सीमाच उरली नाही. '३ तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीकृष्ण मोठा लाघवी आहे स्वतःविषयी कोण खरा, कोण खोटा अशी परीक्षाच जणू तो भावभक्तीची पाहतो. ४ २३९ काळिया नाथूनि आला वरी । पैल हरी दाखविती ॥ १ ॥ दुसरिया भावें न कळे कोणा । होय नव्हेसा संदेह मना ॥ २ ॥ रूपा भिन्न पालट जाला । गोरें सांवळेंसा पें देखिला ॥ ३ ॥ आइवासीत आला करें । तुका खरें म्हणे देव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- नाथूनि-मर्दन करून, दुसरिया-द्वैत भावनेने
कोई OCR पाठ नहीं।
सार्थ तुकारामगाथा १११ २४२ धाकुटयाचे मुखीं घांस घाली माता । वरी करी सत्ता शहाणियां ॥ १ ॥ ऐसें जाणपणें पडलें अंतर । वाढे तों तों थोर अंतराय ॥ २ ॥ दोन्ही उभयतां आपणचि व्याली । आवडीची चाली भिन्न भिन्न ॥ ३ ॥ तुका म्हणे अंगापासुनि निराळें । निवडिलें बळें रडतें स्तनीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- जाणपणे-शहाणपणामुळे, अर्थ:- जे दुर्बळ आहे, नेणते आहे त्याची आवड देवास किती असते हे तुकोबांनी या अभंगात फार मार्मिक व वेचक शब्दांत सांगताना म्हटले आहे, जो वयाने लहान असतो त्याच्या मुखात आई प्रेमाने घास घालते व त्यास भरविते व जो मोठ्या वयाचा व शहाणा झालेला असतो त्यास नाना प्रकारची कामे सांगून ती त्याच्यावर सत्ता गाजविते. १ असे केवळ वय व शहाणपण वाढल्यामुळे आईच्या प्रीतीत अंतर पडते. जो जो ही जाणीव वाढते तो तो प्रेमात उणीव निर्माण होते; फरक पडतो. २ लहान मुलास व मोठ्या मुलास तीच प्रसवित्ये; तीच त्या दोघांचीही आई असते; पण तिच्या प्रीतीच्या रीतीत मात्र याप्रमाणे फरक पडून त्या निरनिराळ्या होतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ती जाणत्या व शहाण्या मुलास आपल्या अंगापासून दूर लोटते व जे तान्हे मूल पाळण्यात रडत असते त्यास मोठ्या प्रेमाने जवळ घेऊन स्तनास लावीत असते. तेव्हां आपण नेणतेच राहणे बरे असा भावार्थ. ४ २४३ देवाचे म्हणोनि देवीं अनादर । हें मोठें आश्चर्य वाटतसे ॥ १ ॥ आतां येरा जना म्हणावें तें काई । जया भार डोई संसाराचा ॥ २ ॥ त्यजुनी संसार अभिमान सांटा । जुलूम हा मोठा दिसतसे ॥ ३ ॥ तुका म्हणे आळस करुनियां साहे । बळें कैसे पाहें यांयां जाती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- येरा-इतर सामान्य जनास, सांटा-साठा, साहे-साह्य. अर्थ:- केवळ आम्ही ईश्वराचे दास किंवा भक्त म्हणूनच हे लोक देवाच्या ठिकाणी अनादराची भावना दर्शवितात याचे मला मोठे आश्चर्य वाटते. १ मग आता ज्यांच्या शिरावर संसाराचे खरोखरीच मोठे ओझे आहे त्यांना, इतर सामान्य लोकांना काय म्हणायचे ? २ हे भक्त लोकही संसाराचा त्याग करून अभिमानाचा साठा वाढवितात हा मोठा जुलूमच म्हणावयास हवा ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक आळसाच्या साह्यामुळे वाया जातात, त्यांचे आयुष्य व्यर्थ होते. ४ २४४ उपदेश तो भलत्या हातीं । जाला चित्तीं धरावा ॥ १ ॥ नये जाऊं पात्रावरी । कवटी सारी नारळें ॥ २ ॥ स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥ ३ ॥ तुका म्हणे रत्नसार । परि उपकार¹ चिंधीचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- कवटी-नारळाचे बाहेरचे कवच, सारी-चांगली, सार-मुख्य गोष्ट, बंदीजन-दासदासी. अर्थ:- कोणताही उपदेश तो जरी भलत्या माणसाने केलेला असला तरी तो ध्यानात ठेवावा; मनात वाग- वावा. १ वरवर दिसणाऱ्या भांड्याच्या रूपावर जाऊ नये. नारळाची कवटी वरवर खडबडीत असली तरी आतील वस्तुमुळे चांगलीच मानतो ना आपण ती ? २ स्त्री, पुत्र, दासदासी यांचा त्याग करायला नको; कारण त्यांच्यामुळेच नारायणाचे स्मरण होते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, रत्न हे प्रमुख होय; पण ते एखाद्या साध्या चिंधीत बांधले असले म्हणून काय झाले ? तेवढ्यापुरते चिंधीचेही उपकार मानायला हवेतच. ४ १ परी आधार चिंधीचा.
१२० सार्थ तुकारामगाथा २४५ संताचे गुण दोष आणिता या मना । केलिया उगाणा सुकृताचा ॥ १ ॥ पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो ॥ २ ॥ तुका म्हणे गंगे अग्नीसि विटाळ । लावी तो चांडाळ दुःख पावे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - उगाणा-शेवटचा हिशोब, नाश, सुकृताचा-पुण्याईचा, परिमल-सुवास अर्थ -संतांच्या गुणदोषांची चर्चा मनात आणू नये तो आली की केलेल्या सर्व पुण्याचा नाश होतो १ फूल पिळून का कधी त्याचा वास येईल ? केळीचे झाड चिरून का कधी केळघाचा घड मिळेल ? असा उद्योग गाढवपणाचाच मानायला हवा २ त्याचप्रमाणे गंगा किंवा अग्नी हे इतरांना शुद्ध करतात, त्यांनाच विटाळाचा दोष लावतो तो शुद्ध चांडाळ असून तो दुख पावेल यात शंका नाही ३ २४६ चुवळीचा करी चुवळीशीं संग । अंगीं वसे रंग क्रियाहीन ॥ १ ॥ बीजा ऐसे फळ दावी परिपाकीं । परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥ २ ॥ माकडाच्या गळा रत्न कुळांगना । सांडूनिया सुना विदी धुंडी ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी । फजिती ते व्हावी आहे पुढें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - चुबळीचा-वाईट वर्तनाचा पुरुष चुवळीशी-डोक्यावर ओझे ठेवण्याच्या आधी खाली गवताची किंवा कपड्याची जी गुंडाळी ठेवतात तिच्याशी क्रियाहीन-रसहीन, परिपाक-परिणाम, कुलागना-कुलीन स्त्री, सुना-कुत्रे, विदी-गल्ली अर्थ - वाईट वर्तनाचा पुरुष चुवळीशी संग करू लागला तर ती क्रिया रंग व रस याच्याशिवायच होणार १ जसे बीज असेल तसाच सुवास किंवा रंग परिणामी फुलात येणार बीजाची जातच फुलात या फळात उमटणार २ माकडाच्या गळ्यात रत्न बांधून त्याचा त्याला काय उपयोग ? त्याचप्रमाणे घरची कुलस्त्री सोडून कुत्र्याप्रमाणे गावातील गल्ल्या शोधायला जातो त्याला काय म्हणावे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा मुलाला जन्म देणारी स्त्री गाढवीच म्हटली पाहिजे त्याची फजिती अजून पुढेच आहे ४ २४७ सापडला सदीं । मग बळिया पडे बंदीं १ ॥ १ ॥ ऐसी कोणी वाहे वेळ । हातीं काळाच्या सकळ ॥ २ ॥ दाता मागे दान । जाय याचका शरण ॥ ३ ॥ तुका म्हणे नेणा । काय सांगो नारायणा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सर्दी-अडचणीत सांदीकोपऱ्यात बळिया-बलवान मनुष्य अर्थ -एखाद्या अडचणीत सापडला की मग त्या बलवान माणसासही बंदात म्हणजे गोत्यात यावे लागते १ अशी वेळ नक्की कधीतरी येणार आहे की ज्यावेळी आपण सर्व काळाच्या हाती सापडू २ असाही प्रसंग येतो की जो दाता म्हणजे नेहमीच देणारा असतो त्याच्यावर दुसऱ्यास शरण जाऊन मागायचा प्रसंग येतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा, तुम्हाला काय सांगाायचे ? तुम्हाला काय समजत नाही ? ४ २४८ सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे ॥ १ ॥ आला डोळयासि कवळ । तेणे मळले उजळ ॥ २ ॥ अंगाचे भोवंडीं । भोय झाड फिरती धोडीं ॥ ३ ॥ तुका म्हणे नाड । पाप ठाके हिता आड ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अभाग्या-दुर्दैवी माणसास, कवळ-रात्रील भोय-भूमी, नाड-आड १ फदी
सार्थ तुकारामगाथा १२१ अर्थ - दुर्दैवी मनुष्य असला की मग त्याला धन हे धन न दिसता साप, विंचू व फोडसेच दिसतात १ डोळ्यांना एकदा काविळीचा रोग झाला की मग त्यास जे उजळ म्हणजे चांगले आहे तेही मलीन किंवा पिवळसर दिसू लागते २ शरीराला एकदा घेरी आली, भोवळ आली की मग जमीन, झाडे, धोंडे सर्व काही फिरत आहे असे दिसू लागते ३ तुकाराम महाराज म्हणतात, आपले पापकृत्य हे असे आपल्या हिताच्या आड येऊन उभे राहते ४ २४९ न देखोनि काही । म्या पाहिले सकळ ही ॥ १ ॥ जालो अवघियापरी । मी हे माझें ठेले दुरी ॥ २ ॥ न घेता घेतले । हाते पायें उसतिले ॥ ३ ॥ खादले न खाता । रसना रस जाली घेता ॥ ४ ॥ न बोलोनि बोले । केले प्रगट झाकिले ॥ ५ ॥ नाइकिले कानीं । तुका म्हणे आले मनी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - उसतिले-शेवटास नेले, घेतले अर्थ :- न पाहताच मी सर्व काही पाहिले १ मी व माझे हा दुजाभाव दूर ठेवून मी असल्यामुळे मी इतर सर्व जगाशी एकरूप झालो आहे २ मी स्वतः हातांनी काही घेतले नसले तरी सर्व काही घेतल्यासारखेच आहे ३ न खाताच मी सर्व काही खाल्ले आहे, जिभेने सर्वांची चव घेतलेली आहे ४ मी न बोलताच बोलत असतो, व त्यामुळे जे गुप्त असते, रहस्यमय असते ते प्रकट होते ५ मी कानांनी काहीच ऐकिले नसले तरी पण माझ्या मनावर सर्व- काही नीटपणे ठसले आहे ६ विवरण -या एका सुंदर व अर्थपूर्ण अभंगात तुकारामबुवांनी ऐक्यानुभूतीचे वर्णन मोठ्या बहारदार पद्धतीने केले आहे न करून सर्व केल्याची अनुभूती त्यांनी येथे वर्णन केली आहे काही न पाहताच सर्व पाहिले आहे न घेताच सर्व काही घेतले आहे, न खाताच सर्व खाल्ले आहे, न बोलताच प्रकट केले आहे, न ऐकताच सर्व मनात साठविले आहे याचा अर्थच असा की एकदा मीत्वाची भावना संपली की मी मी कुणी एक करणारा हा उरत नाही सर्व काही त्याच्याकडूनच होत राहत मग सर्व समजत सर्वांचे आचरण होते पण ते मी केले आहे, मी पाहिले आहे, मी ऐकले आहे, मी बोललो आहे अशी जाणीव नसल्यामुळे हे सर्व न करूनच घडत असते कर्म करून भक्त अकर्ता असतो. सर्व कर्मात तो रतत असूनही तो नैष्कर्म्यता आचरीत असता नावेतून जाताना आपणास नदीकाठचे वृक्ष हालताना, चालताना दिसतात, किंवा सूर्याच्या उदयास्तामुळे तो चालत नसूनही चालल्यासारखा वाटतो त्याप्रमाणेच या श्रेष्ठ भक्ताचे नैष्कर्म्यत्व कर्मातच असते त कर्म करीत असताना दिसतात, पण त्यांचे ते नैष्कर्म्यत्वच असत त्याचे बोलणे न बोलण्यासारखे, त्याचे खाणे न खाण्यासारखे, त्याचे पाहणे न पाहण्यासारखेच असते ज्ञानेश्वरांनी या अवस्थेचे वर्णन फार समर्पक शब्दात केले आहे " तो दिठीं जें पाहे । ते आपणचि होऊनि जाये । आइके तें आहे । तोचि जाहला ॥ चरणीं हून चाले । मुखें जें जें बोले । ऐसे चेष्टाजात तेतुलें । आपणचि जो ॥ हे असो विश्व पाहीं । जयासि आपणपेंवाचूनि नाहीं । आता कवण तें कर्म कायी । बाधी तयाते " ॥ अशी त्याची अवस्था असल्यामुळे तो 'सकर्माच कर्मरहित' असतो, 'सगुणपरी गुणातीत' असतो काही न करताच त्याचे सर्व काही होत असते, व सर्व काही करूनही काही न केल्यासारखी त्याची अवस्था असत ब्रह्मचारी फिर्याद गेला-अभंग- २ २५० काळे कडासन आड पडे । खडबड खडबडे हुसकले ॥ १ ॥ दादकुरा दादकुरा । फजितखोरा लाज नाहीं ॥ २ ॥ तु गाथा १६