सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 144, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें११६ सार्थ तुकारामगाथा सर्वांची दाणादाण करून सोडली. सर्वजण श्रीकृष्णास शरण गेले. मग या आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाने लहान मूल एखादे 'अळंबे' (पावसाळ्यांतील कुत्र्याची छत्री) जसे उचलते तसा तो गोवर्धन पर्वत लीलेने आपल्या डाव्या हातावर उचलून धरिला व त्याच्या खाली सर्व गोकुळनिवासी स्त्रीपुरुष सुखाने राहू लागले. गोवर्धन पर्वताच्या आश्रयाने श्रीकृष्णाने स्वबांधवांचे याप्रमाणे रक्षण केले. यानंतर इंद्राचाही अभिमान नाहीसा झाला. २३३ नको आम्हांसवें गोपाळा । येऊं ओढाळा तुझ्या गाई ॥ १ ॥ कवण धांवें त्यांच्या मागें । मागें मागें येरझारी ॥ २ ॥ न बैसती एके ठायीं । धांवती दाही दाहा वाटां ॥ ३ ॥ तुका म्हणे तूं राख मनेरी । मग त्या येरी आम्ही जाणीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- मनेरी-मनरूपी गाय, येरी-इतर अर्थ:-श्रीकृष्णा, गोपाळा, तू आमच्या बरोबर नको येऊस. तुझ्या या गाई फारच ओढाळ आहेत. १ त्याच्या मागे कोण धावणार रे एकसारखे ? त्यांच्या मागून कुणी एकसारख्या फेऱ्या कराव्यात ? २ त्या कधीच एके ठिकाणी बसत नाहीत, दहा वाटानी दहा दिशाना धावतात त्या ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू फक्त या मनरूपी गाईस सांभाळ; इतर मग आम्ही नीटपणे सांभाळू. ४ २३४ मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायाघरीं गांजियलों ॥ १ ॥ तुजविणें ते नेदी कोणा । सांगतां खुणा जिवें गेलों ॥ २ ॥ वांयांविण केली येरझार । आतां पुरे घर तुझी माया ॥ ३ ॥ तुका म्हणे तूं आम्हां वेगळा । राहें गोपाळा म्हणउनी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -मायाघरी-आईच्या घरी. अर्थ:-श्रीकृष्णा, तुझ्या घरी तुझी शिदोरी आणण्यासाठी गेलो, तो तुझ्या आईने फार त्रास दिला. रागावली ती. १ तुझ्याशिवाय कुणालाही ती शिदोरी द्यायला तयार होईना. तुझ्या ओळखीच्या सर्व खुणा मी सांगितल्या जीव तोडून मी विनवणी केली; पण व्यर्थ. २ तुझ्या घरच्या माझ्या फेऱ्या व्यर्थ गेल्या आता, देवा, तुझे घरही पुरे व तुझी मायाही पुरे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, श्रीकृष्णा तू आमच्यापासून नेहमीच निराळा राहतोस. कारण आम्ही बिचारे गोपाळ ना ! ४ २३५ काकुलती येतो हरी । क्षणभरी निवडितां ॥ १ ॥ तुमची मज लागली सवे । ठायींचे नवे नव्हों गडी ॥ २ ॥ आणीक बोलाबिती फार । बहु थोर नावडती ॥ ३ ॥ भाविके त्यांची आवडी मोठी । तुका म्हणे मिठी घाली जिवें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- निवडिता-दूर करताच अर्थ-या श्रीकृष्णाला आम्ही क्षणभर जरी दूर केले तरी तो अगदी काकुळतीस येतो. १ तो म्हणतो 'गोपाळांनो, तुमची सवय आम्हास फार आहे. तुम्ही प्रथमपासून आमचेच गडी आहात; हा सबंध काही नवा नाही.' २ या कृष्णाला दुसरे थोर थोर लोक बोलवतात, पण त्याला ते फार मोठें लोक आवडत नाहीत. ३ तुकाराम महाराज म्हणतात, जे भाविक आहेत, त्याची फार मोठी आवड या श्रीकृष्णास असते. तो त्यांना मोठा जीव लावून मिठी घालतो. ४ २३६ वरता वेंधोनि घातली उडी । कळंबाबुडीं यमुनेसी ॥ १ ॥ हरि बुडाला बोंब घाला । घरचीं त्यांला ठावा नाहीं ॥ २ ॥