भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 145, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 145

सार्थ तुकारामगाथा ११७ भवनदीचा नकळे पार । काळिया माजी थोर बिलार ॥ ३ ॥ तुका म्हणे काय वाउग्या हाका । हातांचा गमावुनियां धिका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेंदोनि-चढून, बिलार-विषारी, धिका-रडता. अर्थ :-यमुनेच्या तीरावरील कळंब वृक्षाच्या फांदीवर चढ़न श्रीकृष्णानें नदीच्या डोहात उडी टाकली. १ तेव्हा सर्व गोपाळ ओरडू लागले, 'अरे हरी बुडाला, कृष्ण बुडाला. बोंब मारा ना. कारण याच्या घरी जे आहेत त्यांना यासंबंधी काहीच माहीत नाही.' २ या भवनदीचा काही ठाव कधी लागत नाही व या नदीच्या पात्रात काळिया नावाचा फार मोठा विषारी नाग आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हातच्या हरीला दवडू नका. व्यर्थ हाका का मारता ? का रडत बसता ? ४ २३७ अवघीं मिळोनि कोल्हाळ केला । आतां होता म्हणती गेला ॥ १ ॥ आपलिया रडती भावें । जयासवें जयापरी ॥ २ ॥ चुकलों आम्ही खेळतां खेळ । गेला गोपाळ हातांचा ॥ ३ ॥ तुका म्हणे धांवती थडी । न घली उडी आंत कोणी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा- कोल्हाळ-गोंगाट, थडी-काठापर्यंत. अर्थ :-मग सर्व गोपाळांनी मिळून एकच गोंगाट केला; व म्हणू लागले, 'हा हरी आता की हो होता. आता कसा नाहीसा झाला ?' १ जो तो आपापल्या भावनेने रडू लागला. ज्याची जशी त्याच्याशी संगत होती तशा प्रमाणात त्यांना शोक झाला, २ ते म्हणू लागले, 'आम्हीच खेळ खेळताना चुकलो. म्हणूनच आमच्या हातून हा आमचा गोपाळ कृष्ण गेला.' ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे म्हणून काही गोपाळ नदीच्या काठापर्यंत धावत गेले; पण आत उडी घालून श्रीकृष्णाचा शोध घेण्याचे धैर्य मात्र कुणास झाले नाही. ४ २३८ भ्यालीं जिया चुकलीं देवा । नाहीं ठावा जवळों तो ॥ १ ॥ आहाकटा करिती हाय । हात डोकें पिटिती पाय ॥ २ ॥ जबळी होतां नकळे आम्हां । गेल्या सीमा नाहीं दुःखा ॥ ३ ॥ तुका म्हणे हा लाघवी मोठा । पाहे खोटा खरा भाव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आहाकटा-हायहाय. अर्थ :- श्रीकृष्ण यमुनेच्या डोहात बुडाला, त्याचे रक्षण आपण केले नाही या विचाराने ते सर्व गोपाळ भ्याले उडी टाकून त्याला वर काढण्याचे धैर्य कुणास नव्हते. ज्याने त्याने आपल्या जिवास जपले व देव चुकविला. तो जवळच आहे तरी त्याचा तपास आता काही केल्या लागेना. १ मग सर्वजण हायहाय करून दुःख करू लागले. जो तो हात, पाय, डोकें पिटून घेऊ लागला. २ व म्हणू लागला; 'हा कृष्ण आमच्या अगदी जवळ होता तेव्हा त्याचे महत्त्व आम्हांस समजले नाही; व हा आता दूर जाताच आमच्या दुःखास सीमाच उरली नाही. '३ तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीकृष्ण मोठा लाघवी आहे स्वतःविषयी कोण खरा, कोण खोटा अशी परीक्षाच जणू तो भावभक्तीची पाहतो. ४ २३९ काळिया नाथूनि आला वरी । पैल हरी दाखविती ॥ १ ॥ दुसरिया भावें न कळे कोणा । होय नव्हेसा संदेह मना ॥ २ ॥ रूपा भिन्न पालट जाला । गोरें सांवळेंसा पें देखिला ॥ ३ ॥ आइवासीत आला करें । तुका खरें म्हणे देव ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- नाथूनि-मर्दन करून, दुसरिया-द्वैत भावनेने