भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 139, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 139

सार्थ तुकारामगाथा १११ अर्थ :- गोकुळच्या गोळणी श्रीकृष्णाला त्याने चोरी करू नये वा खोडी करू नये म्हणून उखळाशी दाव्याने बांधून ठेवितात. हे परब्रह्म त्या गोपाळांच्यात खेळ खेळत बसते. १ यशोदेच्या मागे मागे धावून हा श्रीकृष्ण तिला भोजनही मागतो. हाच श्रीकृष्ण गाईंच्या मागे रानोरान हिंडून क्रीडा करतो. २ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीकृष्णाच्या अंगी सर्व प्रकारचे ज्ञान असून तो एका भोळेपणासाठी भीक मागतो. ३ २२२ देखिलासि माती खाता । दावियानें बांधी माता ॥ १ ॥ जाळी घेउनि कांबळी काठी । गाई वळी वेणु पाठीं ॥ २ ॥ मोठें भावाचचि वळ । देव झाला त्याचें बाळ ॥ ३ ॥ तुका म्हणे भवतासाठीं । देय धावे पाठोपाठीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- जाळी-जाळे, वेणु-पावा, पाठोपाठीं-पाठोपाठ अर्थ - देवा, यशोदामातेने तुला माती खात असताना पाहिले. त्यासाठी तुझ्या आईने तुला दाव्याने बांधले. १ हातात जाळे घेऊन, खांद्यावर कांबळे व काठी घेऊन गाई वळायला हा निघाला आहे. याच्या हातात पावा आहे. २ भावभक्तीच्या बळाने हा देव त्याच्या घरी बालकाच्या रूपाने जन्मास आला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, भक्तासाठी देव पाठोपाठ त्याच्या रक्षणार्थ धावत असतात ४ विवरण :- या दोन अभंगात श्रीकृष्णाच्या गोकुळातील खोडकरपणाचा संक्षेपाने उल्लेख तुकारामबुवांनी केलेला आहे पहिल्या क्र २२१ च्या अभंगात श्रीकृष्णास त्याच्या खोडकरपणामुळे उखळाशी किंवा मुसळखांब्याशी बांधण्यात आले होते त्याचा उल्लेख आला आहे श्रीकृष्णास मांडीवर घेऊन यशोदा एकदा दधिमंथन करीत असता चुलीवरचे दूध उतू गेले म्हणून यशोदा कृष्णास तिथेच ठेवून दूध उतरण्यास धावली याचा राग श्रीकृष्णास आला व त्याने डेराच फोडून टाकला, उरलेले लोणी खाऊन टाकले यशोदेस हे सारे कृत्य समजताच तिला फार मोठा राग आला ती या खोडकर पोरास दाव्याने मुसळखांब्याशी बांधायला निघाली आणि भला मोठा दोर आणून त्याला शामन म्हणून बांधीत असताना कितीही मोठे वेढे घेतले तरी दावे दोनतीन बोटे कमीच पडत राहिले. आणखी कितीतरी दावी एकमेकास बांधून घेतली तरी तो अपुरीच राहिली श्रीकृष्णास पुत्रभावाने पाहणाऱ्या या यशोदामातेस आपल्या पुत्राची विश्वव्यापकता व ईश्वरस्वरूपता पटली अशी कथा भागवत पुराणात आलेली आहे. दुसऱ्या अभंग क्रमाक २२२ मध्ये श्रीकृष्णाने माती खाल्याच्या कथेचा उल्लेख तुकारामांनी केलेला आहे एकदा मुलामुलात खेळत असतांना श्रीकृष्णाने माती खाल्ली असा पुकारा करीत त्याचे सोबती यशोदामातेकडे आले त्यावर यशोदेने श्रीकृष्णस पकडून धाक दाखविण्यास सुरुवात केली 'आई, मी माती मुळीच खाल्ली नाही.' असे श्रीकृष्ण परोपरीने सांगत असतांनाही यशोदेस खरे वाटले नाही 'तुझे तोंड दाखव पाहू' असे यशोदेनं म्हणताच श्रीकृष्णाने तोंड उघडले. तेव्हा तिला सर्व विश्व श्रीकृष्णाच्या मुखात सामावले असल्याचे दिसून आले सर्व सृष्टी, समुद्र, नद्या, पर्वत, चंद्र, सूर्य यांनी भरलेले श्रीकृष्णाचे मुख पाहून यशोदेस नवल तर वाटलेच, पण पुत्रभावाने पाहणारी यशोदामाता ही आपल्या मुलाचे धोरण समजून चुकली २२३ हा गे माझे हातीं । पाहा कवळ सांगाती ॥ १ ॥ हेंचें दिला खातो भाग । कराल तर करा लाग ॥ २ ॥ धाले ऐसे पोट । घरीं करूनियां खोट ॥ ३ ॥ तुका म्हणे घरीं । मग कंच्या या परी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लाग-खटपट, प्रयत्न. अर्थ :- आपल्या बरोबर असलेल्या सोबत्यांस हे गोपाळ सांगतात, 'हा पाहा माझ्या हातीं खात्याचा घास आहे.' १ हा भाग ह्याला देवाने दिलेला असतो. तोच तो खात असतो. तुम्हास तो हवा असेल तर तुम्हीही प्रयत्न

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 139, कुल 611 में से · BharatKosha