भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 138, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 138

११० सार्थ तुकारामगाथा अर्थ :- जे माझ्या वाटणीस सर्वांना देऊन झाल्यावर येईल ते मी निमुटपणे घेईन. मी काही इतरासारखा हावरा मनुष्य नाही. १ चांगल्या गुणवान माणसांसारखीच माझी आवड आहे. ती तुम्ही जाणून घ्या. २ हा परमेश्वर क्षणभरही मजजवळ नसला तर हे लोक मला काठीने मारण्यास तयार होतील. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला आपले राबवून घ्या. जी सेवा सांगाल ती मी मनोभावे करीन. ४ २१९ अंतरली कुटी मेटी । भय धरूनियां पोटीं । म्हणतां जगजेठी । धांवें करुणाउत्तरीं ॥ १ ॥ बाप बळिया शिरोमणी । उताविळ या वचनीं । पडलिया कानीं । धांचा न करी आळस ॥ २ ॥ बळ दुणी शरणागता । स्वामी वाहों नेदी चिंता । आइतेचि दाता । पंगतीस बैसवी ॥ ३ ॥ वाहे खांदीं पावती घरा । त्याच्या करी येरझारा । बोबड्या उत्तरा । स्वामी तुकया मानवले ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कुटी मेटी-घरदार, दुनी-दुप्पट अर्थ :- घरादाराला जी माणसे अंतरली होती व जी मोठेच भय पोटात धरून होती त्यांनी करुण वाणीने ईश्वराचा धावा केल्याबरोबर त्यांना ईश्वराचे साह्य झाले. १ हा ईश्वर आपल्या पित्याप्रमाणेच असून मोठा बलवान आहे. कुणाची हाक कानी पडताच हा आळस न करता उतावीळ होऊन भक्ताच्या रक्षणार्थ धावत येतो. २ जो शरणागत आहे त्यास असे परमेश्वराचे साह्य झाल्यामुळे त्याचे बळ दुप्पट होते. ईश्वर त्यास कसलीही चिंता करू देत नाही. हा दाता ईश्वर त्यांना आपल्याच पंगतीस बसवितो ३ आणि तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या भक्ताचे बोबडे बोल ऐकून हा माझा स्वामी भक्तांना खांद्यावर घेऊन त्याच्या घरापर्यंत पोचते करतो वारंवार त्यांच्या घरी त्याची येजा असते ४ २२० धन्य तें गोधन कांबळी काष्ठिका । मोहरी पांवा निका ब्रीद वांकी ॥ १ ॥ धन्य तें गोकुळ धन्य ते गोपाळ । नर नारी सकळ धन्य जाल्या ॥ २ ॥ धन्य ते देवकी जसवंती दोहीचें । वसुदेवनंदाचे भाग्य जाले ॥ ३ ॥ धन्य त्या गोपिका सोळा सहस्र बाळा । यादवां सकळां धन्य जाले ॥ ४ ॥ धन्य म्हणे तुका जन्मा तोंचि आली । हरिरंगों रंगली सर्वभावें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- काष्ठिका-काठी अर्थ :- गोकुळातील गोधन, कांबळे, काठ्या, मुरली, पावा, वाकया इत्यादी भूषणे या सर्व वस्तू श्रीकृष्णाच्या सहवासाने धन्य आहेत १ ते गोकुळ धन्य आहे तेथील गोपाळ, स्त्री-पुरुष सर्वच जण धन्य आहेत. २ श्रीकृष्णाच्या माता देवकी व यशोदा याही धन्य होत. वसुदेव व देवकी यांच्या भाग्याचे वर्णन किती करावे? ३ त्या गोपिका व सोळा सहस्र स्त्रिया आणि सर्व यादवही धन्य होत ४ तुकाराम महाराज म्हणतात, जी हरीच्या भक्तीत रंगून गेली ती सर्व माणसे जन्मास येऊन धन्य झाली आहेत. ५ २२१ गौळणी बांधिती धारणासि गळा । खेळे त्या गोपाळांमाजी ब्रह्म ॥ १ ॥ धांवोनियां मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाईंपाठीं ॥ २ ॥ तुका म्हणे सूर्य कळा ज्याचे अंगीं । भोळेपणालागीं भीक मागे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- धारणासि-फुसलाव्याला