सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 137, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १०९ शब्दार्थ व टीपा - यंचूं-सोडू, हेंगे-इकडे, बोभा-हाक अर्थ :- आता देव व मी एकच झालो आहोत. आता आम्ही एकमेकाना सोडून देणार नाही. १ ही सर्व देहाची मोटकुळी श्रीहरीला इकडे अर्पण करून मी आता मुक्तच झालो आहे. आता कसली फटफट आली आहे ? २ आता हृदयग्रंथी सोडून त्यात काय काय आहे याचा तपास घेऊ लागलो आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता मी सर्व व्यावहारिक बाबींतून मोकळा झालो. आता श्रीकृष्ण्णास हाक मारणे एवढेच काम उरले आहे. ४ २१६ या रे करूं गाई । जमा निजलेती काई । बोभाट्यानें आई । घरा गेल्या मारील ॥ १ ॥ घाला घाला रे फुकारे । ज्याची तेणेचि मोहरे । एवढेचि पुरे । केल्यानें सावध ॥ २ ॥ नेणोनियां खेळा । समय समपाच्या वेळा । दुश्चिताजवळ । मिळालेति दुश्चित ॥ ३ ॥ तुका म्हणे शीक । न धरिता लागे भीक । धरा सकळीक । मनेरी धांवा वळतियां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- फुकारे-मोठ्या हाका, ओरडा, मनेरी-मनरूपी गाय अर्थ :- गोपाळांनो, चला आपण आपल्या गाई आता जमा करू. बेसावधपने झोपलात काय ? उठा ना. गाई नीट सापडल्या नाहीत तर बोभाटा होईल आणि मग घरी गेल्यावर आपली आई आपणास मार देईल. १ ज्याने त्याने आपापल्या गाईस मोठ्याने हाका माराव्यात रे एवढ्याच ओरडण्याने गाईंना सावध करून परत बोलाव्या. २ आता घरी परतायची वेळ झाली आहे हे न समजून तुम्ही, समयाचे महत्त्व न ओळखून तुम्ही खेळ खेळत बसता, आणि एका अवगुणी गोपाळाजवळ आणखी अवगुणी मित्र जमा होतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हास अनेकदा शिकविले आहे, ते जर तुम्ही ध्यानात धरले नाही तर मग भीक मागण्याचा प्रसंग येईल यासाठी तुमची मनोरूपी गाय तुम्ही प्रथम आवरून धरा. कारण तीच धावपळ मोठ्या ओढाळपणे करते; तिला सर्वांनी सावरून धरावे. ४ २१७ वोळलीचा दोहूँ पान्हा । मज कान्हा सांगितला ॥ १ ॥ घ्या जि हेंगे क्षीर हातीं । निगुतीने वाढावे ॥ २ ॥ सांगितले केले काम । नव्हे धर्म सत्याचा ॥ ३ ॥ तुका म्हणे नवे जुने॑ । ऐसे कोणे सोसावें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वोळली-वळलेली, हेंगे-दूध, निगुतीने-सावधतेने, सत्याचा-स्वतःचा अर्थ :- ही गाय वळलेली असून हिची धार काढ असे श्रीकृष्णाने मला सांगितले आहे. हेच दूध सर्वांना मिळावे म्हणून मोठ्या सावधतेने मी ते सर्वांना वाढणार आहे. २ ईश्वराने जे काम मला सांगितले ते मी केले. हा काही माझा स्वतःचा धर्म म्हणून सांगितला नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता नव्याजुन्याचे कष्ट पुन्हास सहन होण्यासारखे आहेत ? ४ २१८ येईल ते घेइन भागा । नव्हे जोगा दुसराया ॥ १ ॥ आवडी ते तुम्ही जाणा । बहु गुणांसारिखी ॥ २ ॥ मज घेती डागवरी । सर्वे हरि नसलिया ॥ ३ ॥ तुका म्हणे राबवा देवा । करीन सेवा सांगितली ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - डांगवरी-काठीने मारण्यास.