सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 136, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१०८ सार्थ तुकारामगाथा वर्षाव झाला आरती करणारांची दाटी झाली सर्व गोपाळ तुळशीच्या माळा तयार करून पाडुरंगास घालू लागले ५ या देवाचा राजा व गोपांचा प्रियकर श्रीकृष्ण माझ्या मनात किती सुख देतो म्हणून सांगू ? असे तुकाराम महाराज म्हणतात ६ २१२ माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यातुनी ॥ १ ॥ आपआपणामध्ये मिळो । एक खेळो एकाशीं ॥ २ ॥ घाबरियाच्या मोडा काड्या । धाडा भाड्या वळतिया ॥ ३ ॥ तुका म्हणे देवापाशीं । विटाळशीं नसावो ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - काड्या मोडणे-खेळातून काढणे, भाड्या-भित्र्या अर्थ - माझे सोबती कोणकोण आहेत ते सांग पाहू गोपाळांच्या मेळाव्यातून हे मला निवडून द्या पाहू १ आपण आपल्या स्वरूपातच मिळून एकमेकाशी खेळू या २ या खेळात जे गडी घावरतील त्यांना खेळातून काढून टाका अशा भित्र्या गड्याना इंद्रियरूपी गाई वळापला पाठवून देऊ ३ तुकाराम महाराज म्हणतात, या देवापाशी ज्याच्या चित्तात विटाळ झाला आहे असा मनुष्य नसावा ४ २१३ हेचि अनुवाद सदा सर्वकाळ । करुनिया गोपाळकाला सेवू ॥ १ ॥ वोरसले कामधेनूचे दुभते । सपूर्ण आइतें गगनभरी ॥ २ ॥ सत सनकादिक गोमट्या परवडी । विभाग आयडी इच्छेचिये ॥ ३ ॥ तुका म्हणे मधीं घालू नारायण । मग नव्हे सीण कोणा खेळें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अनुवाद-स्मरण वोरसले-प्राप्त झाले, गोमट्या-चांगल्या परवडी-प्रकारांनी अर्थ - भगवंताच्या स्वरूपाचे स्मरणच सर्वकाळ करून या गोपाळांच्या बरोबर आपण या काल्याचे सेवन करू या १ आज कामधेनूचे हे दुभते आपणास प्राप्त झाले आहे या दुग्धामृताने पूर्णपणे सारे आकाश भरून गेले आहे २ सनकादिक संतानी विविध अशा चांगल्या प्रकारानी व मोठ्या प्रमाने त्याचा लाभ आपल्या इच्छेप्रमाणे घ्यावा ३ तुकाराम महाराज म्हणतात, मध्यभागी नारायणाला ठेवून खेळ केला म्हणजे मग कसलाही क्षीण कधी आपणास होत नाही ४ २१४ अधिकाचा मज काटाळा । तुम्हा गोपाळा संगति ॥ १ ॥ काय नाही तुम्हापाशीं । सकळाविशीं सपन्न ॥ २ ॥ उद्योगाचा नेघें भार । लागल्या सार पुरते ॥ ३ ॥ तुका म्हणे अधीर जिणे । नारायणे न करावे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अधिकाचा-ऐश्वर्याचा अर्थ - नारायणा, तुमच्या व या गोपाळांच्या संगतीमुळे मला ऐश्वर्याचा व संपत्तीचा कंटाळाच आलेला आहे १ तुमच्या संगतीत काय मिळण्यासारखे नाही? सर्व संपत्तीचा साठा यथ आहे २ कोणत्याही व्यावहारिक कामाचा भार आपण घेण्याची जरुरी नाही येथे आल्याचे सुख हेच समाधानाचे सार आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात नारायणा, माझे जिणे इतके अधीर करू नका ४ २१५ जालो आता एके ठायीं । न वचू काहीं एकमेका ॥ १ ॥ सरलो हेगे देउनि मोट । कटकट काशाची ॥ २ ॥ सोडोनििया गांठीं पाहें । काय आहे त्यात ते ॥ ३ ॥ तुका म्हणे जालो निराळा । आता गोपाळा देऊ गोमा ॥ ४ ॥