भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 148, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 148

१२० सार्थ तुकारामगाथा २४५ संताचे गुण दोष आणिता या मना । केलिया उगाणा सुकृताचा ॥ १ ॥ पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो ॥ २ ॥ तुका म्हणे गंगे अग्नीसि विटाळ । लावी तो चांडाळ दुःख पावे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - उगाणा-शेवटचा हिशोब, नाश, सुकृताचा-पुण्याईचा, परिमल-सुवास अर्थ -संतांच्या गुणदोषांची चर्चा मनात आणू नये तो आली की केलेल्या सर्व पुण्याचा नाश होतो १ फूल पिळून का कधी त्याचा वास येईल ? केळीचे झाड चिरून का कधी केळघाचा घड मिळेल ? असा उद्योग गाढवपणाचाच मानायला हवा २ त्याचप्रमाणे गंगा किंवा अग्नी हे इतरांना शुद्ध करतात, त्यांनाच विटाळाचा दोष लावतो तो शुद्ध चांडाळ असून तो दुख पावेल यात शंका नाही ३ २४६ चुवळीचा करी चुवळीशीं संग । अंगीं वसे रंग क्रियाहीन ॥ १ ॥ बीजा ऐसे फळ दावी परिपाकीं । परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥ २ ॥ माकडाच्या गळा रत्न कुळांगना । सांडूनिया सुना विदी धुंडी ॥ ३ ॥ तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी । फजिती ते व्हावी आहे पुढें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - चुबळीचा-वाईट वर्तनाचा पुरुष चुवळीशी-डोक्यावर ओझे ठेवण्याच्या आधी खाली गवताची किंवा कपड्याची जी गुंडाळी ठेवतात तिच्याशी क्रियाहीन-रसहीन, परिपाक-परिणाम, कुलागना-कुलीन स्त्री, सुना-कुत्रे, विदी-गल्ली अर्थ - वाईट वर्तनाचा पुरुष चुवळीशी संग करू लागला तर ती क्रिया रंग व रस याच्याशिवायच होणार १ जसे बीज असेल तसाच सुवास किंवा रंग परिणामी फुलात येणार बीजाची जातच फुलात या फळात उमटणार २ माकडाच्या गळ्यात रत्न बांधून त्याचा त्याला काय उपयोग ? त्याचप्रमाणे घरची कुलस्त्री सोडून कुत्र्याप्रमाणे गावातील गल्ल्या शोधायला जातो त्याला काय म्हणावे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा मुलाला जन्म देणारी स्त्री गाढवीच म्हटली पाहिजे त्याची फजिती अजून पुढेच आहे ४ २४७ सापडला सदीं । मग बळिया पडे बंदीं १ ॥ १ ॥ ऐसी कोणी वाहे वेळ । हातीं काळाच्या सकळ ॥ २ ॥ दाता मागे दान । जाय याचका शरण ॥ ३ ॥ तुका म्हणे नेणा । काय सांगो नारायणा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सर्दी-अडचणीत सांदीकोपऱ्यात बळिया-बलवान मनुष्य अर्थ -एखाद्या अडचणीत सापडला की मग त्या बलवान माणसासही बंदात म्हणजे गोत्यात यावे लागते १ अशी वेळ नक्की कधीतरी येणार आहे की ज्यावेळी आपण सर्व काळाच्या हाती सापडू २ असाही प्रसंग येतो की जो दाता म्हणजे नेहमीच देणारा असतो त्याच्यावर दुसऱ्यास शरण जाऊन मागायचा प्रसंग येतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा, तुम्हाला काय सांगाायचे ? तुम्हाला काय समजत नाही ? ४ २४८ सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे ॥ १ ॥ आला डोळयासि कवळ । तेणे मळले उजळ ॥ २ ॥ अंगाचे भोवंडीं । भोय झाड फिरती धोडीं ॥ ३ ॥ तुका म्हणे नाड । पाप ठाके हिता आड ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अभाग्या-दुर्दैवी माणसास, कवळ-रात्रील भोय-भूमी, नाड-आड १ फदी