सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 147, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १११ २४२ धाकुटयाचे मुखीं घांस घाली माता । वरी करी सत्ता शहाणियां ॥ १ ॥ ऐसें जाणपणें पडलें अंतर । वाढे तों तों थोर अंतराय ॥ २ ॥ दोन्ही उभयतां आपणचि व्याली । आवडीची चाली भिन्न भिन्न ॥ ३ ॥ तुका म्हणे अंगापासुनि निराळें । निवडिलें बळें रडतें स्तनीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- जाणपणे-शहाणपणामुळे, अर्थ:- जे दुर्बळ आहे, नेणते आहे त्याची आवड देवास किती असते हे तुकोबांनी या अभंगात फार मार्मिक व वेचक शब्दांत सांगताना म्हटले आहे, जो वयाने लहान असतो त्याच्या मुखात आई प्रेमाने घास घालते व त्यास भरविते व जो मोठ्या वयाचा व शहाणा झालेला असतो त्यास नाना प्रकारची कामे सांगून ती त्याच्यावर सत्ता गाजविते. १ असे केवळ वय व शहाणपण वाढल्यामुळे आईच्या प्रीतीत अंतर पडते. जो जो ही जाणीव वाढते तो तो प्रेमात उणीव निर्माण होते; फरक पडतो. २ लहान मुलास व मोठ्या मुलास तीच प्रसवित्ये; तीच त्या दोघांचीही आई असते; पण तिच्या प्रीतीच्या रीतीत मात्र याप्रमाणे फरक पडून त्या निरनिराळ्या होतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ती जाणत्या व शहाण्या मुलास आपल्या अंगापासून दूर लोटते व जे तान्हे मूल पाळण्यात रडत असते त्यास मोठ्या प्रेमाने जवळ घेऊन स्तनास लावीत असते. तेव्हां आपण नेणतेच राहणे बरे असा भावार्थ. ४ २४३ देवाचे म्हणोनि देवीं अनादर । हें मोठें आश्चर्य वाटतसे ॥ १ ॥ आतां येरा जना म्हणावें तें काई । जया भार डोई संसाराचा ॥ २ ॥ त्यजुनी संसार अभिमान सांटा । जुलूम हा मोठा दिसतसे ॥ ३ ॥ तुका म्हणे आळस करुनियां साहे । बळें कैसे पाहें यांयां जाती ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- येरा-इतर सामान्य जनास, सांटा-साठा, साहे-साह्य. अर्थ:- केवळ आम्ही ईश्वराचे दास किंवा भक्त म्हणूनच हे लोक देवाच्या ठिकाणी अनादराची भावना दर्शवितात याचे मला मोठे आश्चर्य वाटते. १ मग आता ज्यांच्या शिरावर संसाराचे खरोखरीच मोठे ओझे आहे त्यांना, इतर सामान्य लोकांना काय म्हणायचे ? २ हे भक्त लोकही संसाराचा त्याग करून अभिमानाचा साठा वाढवितात हा मोठा जुलूमच म्हणावयास हवा ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक आळसाच्या साह्यामुळे वाया जातात, त्यांचे आयुष्य व्यर्थ होते. ४ २४४ उपदेश तो भलत्या हातीं । जाला चित्तीं धरावा ॥ १ ॥ नये जाऊं पात्रावरी । कवटी सारी नारळें ॥ २ ॥ स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥ ३ ॥ तुका म्हणे रत्नसार । परि उपकार¹ चिंधीचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- कवटी-नारळाचे बाहेरचे कवच, सारी-चांगली, सार-मुख्य गोष्ट, बंदीजन-दासदासी. अर्थ:- कोणताही उपदेश तो जरी भलत्या माणसाने केलेला असला तरी तो ध्यानात ठेवावा; मनात वाग- वावा. १ वरवर दिसणाऱ्या भांड्याच्या रूपावर जाऊ नये. नारळाची कवटी वरवर खडबडीत असली तरी आतील वस्तुमुळे चांगलीच मानतो ना आपण ती ? २ स्त्री, पुत्र, दासदासी यांचा त्याग करायला नको; कारण त्यांच्यामुळेच नारायणाचे स्मरण होते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, रत्न हे प्रमुख होय; पण ते एखाद्या साध्या चिंधीत बांधले असले म्हणून काय झाले ? तेवढ्यापुरते चिंधीचेही उपकार मानायला हवेतच. ४ १ परी आधार चिंधीचा.