सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 149, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १२१ अर्थ - दुर्दैवी मनुष्य असला की मग त्याला धन हे धन न दिसता साप, विंचू व फोडसेच दिसतात १ डोळ्यांना एकदा काविळीचा रोग झाला की मग त्यास जे उजळ म्हणजे चांगले आहे तेही मलीन किंवा पिवळसर दिसू लागते २ शरीराला एकदा घेरी आली, भोवळ आली की मग जमीन, झाडे, धोंडे सर्व काही फिरत आहे असे दिसू लागते ३ तुकाराम महाराज म्हणतात, आपले पापकृत्य हे असे आपल्या हिताच्या आड येऊन उभे राहते ४ २४९ न देखोनि काही । म्या पाहिले सकळ ही ॥ १ ॥ जालो अवघियापरी । मी हे माझें ठेले दुरी ॥ २ ॥ न घेता घेतले । हाते पायें उसतिले ॥ ३ ॥ खादले न खाता । रसना रस जाली घेता ॥ ४ ॥ न बोलोनि बोले । केले प्रगट झाकिले ॥ ५ ॥ नाइकिले कानीं । तुका म्हणे आले मनी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - उसतिले-शेवटास नेले, घेतले अर्थ :- न पाहताच मी सर्व काही पाहिले १ मी व माझे हा दुजाभाव दूर ठेवून मी असल्यामुळे मी इतर सर्व जगाशी एकरूप झालो आहे २ मी स्वतः हातांनी काही घेतले नसले तरी सर्व काही घेतल्यासारखेच आहे ३ न खाताच मी सर्व काही खाल्ले आहे, जिभेने सर्वांची चव घेतलेली आहे ४ मी न बोलताच बोलत असतो, व त्यामुळे जे गुप्त असते, रहस्यमय असते ते प्रकट होते ५ मी कानांनी काहीच ऐकिले नसले तरी पण माझ्या मनावर सर्व- काही नीटपणे ठसले आहे ६ विवरण -या एका सुंदर व अर्थपूर्ण अभंगात तुकारामबुवांनी ऐक्यानुभूतीचे वर्णन मोठ्या बहारदार पद्धतीने केले आहे न करून सर्व केल्याची अनुभूती त्यांनी येथे वर्णन केली आहे काही न पाहताच सर्व पाहिले आहे न घेताच सर्व काही घेतले आहे, न खाताच सर्व खाल्ले आहे, न बोलताच प्रकट केले आहे, न ऐकताच सर्व मनात साठविले आहे याचा अर्थच असा की एकदा मीत्वाची भावना संपली की मी मी कुणी एक करणारा हा उरत नाही सर्व काही त्याच्याकडूनच होत राहत मग सर्व समजत सर्वांचे आचरण होते पण ते मी केले आहे, मी पाहिले आहे, मी ऐकले आहे, मी बोललो आहे अशी जाणीव नसल्यामुळे हे सर्व न करूनच घडत असते कर्म करून भक्त अकर्ता असतो. सर्व कर्मात तो रतत असूनही तो नैष्कर्म्यता आचरीत असता नावेतून जाताना आपणास नदीकाठचे वृक्ष हालताना, चालताना दिसतात, किंवा सूर्याच्या उदयास्तामुळे तो चालत नसूनही चालल्यासारखा वाटतो त्याप्रमाणेच या श्रेष्ठ भक्ताचे नैष्कर्म्यत्व कर्मातच असते त कर्म करीत असताना दिसतात, पण त्यांचे ते नैष्कर्म्यत्वच असत त्याचे बोलणे न बोलण्यासारखे, त्याचे खाणे न खाण्यासारखे, त्याचे पाहणे न पाहण्यासारखेच असते ज्ञानेश्वरांनी या अवस्थेचे वर्णन फार समर्पक शब्दात केले आहे " तो दिठीं जें पाहे । ते आपणचि होऊनि जाये । आइके तें आहे । तोचि जाहला ॥ चरणीं हून चाले । मुखें जें जें बोले । ऐसे चेष्टाजात तेतुलें । आपणचि जो ॥ हे असो विश्व पाहीं । जयासि आपणपेंवाचूनि नाहीं । आता कवण तें कर्म कायी । बाधी तयाते " ॥ अशी त्याची अवस्था असल्यामुळे तो 'सकर्माच कर्मरहित' असतो, 'सगुणपरी गुणातीत' असतो काही न करताच त्याचे सर्व काही होत असते, व सर्व काही करूनही काही न केल्यासारखी त्याची अवस्था असत ब्रह्मचारी फिर्याद गेला-अभंग- २ २५० काळे कडासन आड पडे । खडबड खडबडे हुसकले ॥ १ ॥ दादकुरा दादकुरा । फजितखोरा लाज नाहीं ॥ २ ॥ तु गाथा १६