भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 150, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 150

१२२ सार्थ तुकारामगाथा अवघा जाला राम राम । कोणी कर्म आचरे ना ॥ ३ ॥ हरिदासांच्या पडती पायां । म्हणती तयां नागवावें ॥ ४ ॥ दोन्ही ठायीं फजीत जालें । पारणे केलें अवकळा ॥ ५ ॥ तुका म्हणे नाश केला । विटंबिला वेश जिहीं ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - कडासन-हरणाच्या कातड्याचे आसन. अर्थ:- एका ब्रह्मचाऱ्याचा निषेध करताना बुवांनी म्हटले आहे; एका ब्रह्मचाऱ्याच्या काखेत हरणाच्या कातड्याचे आसन होते ते चालताना पडले व त्याचा खडबड खडबड असा आवाज झाला १ असा हा फजितखोर व निलंन्ज येथे आला आहे याची काही वाट लावा ना. २ हा म्हणतो सर्वत्र राम राम म्हणून उच्चार केला जातो पण त्याप्रमाणे कर्म कोणीच आचरीत नाही. ३ जे कोणी हरिदासाच्या पाया पडतील त्यांना लुटावे असे हा म्हणतो. ४ ज्यांची या ब्रह्मचाऱ्याप्रमाणे समजूत आहे त्यांची दोन्हीकडे फजिती होईल. त्याला धड नामभक्तीही साधणार नाही, की त्यास कर्म करणेही समजणार नाही. त्याने संसार व परमार्थ याची फजितीच केली आहे. त्याचा शेवट अशाच अवकळेने, नाशाच्या अवस्थेने होणार ५ तुकाराम महाराज म्हणतात, अशा वरवरच्या वेशामुळे देह विटंबिला जातो व सर्व परमार्थाचा नाश होतो. ६ २५१ कुटुंबाचा केला त्याग । नाही राग जंव गेला ॥ १ ॥ भजन तें योगळवाणें । नरका जाणे चुके ना ॥ २ ॥ अक्षराची केली आटी । जरी पोटीं संतनिंदा ॥ ३ ॥ तुका म्हणे मागें पाय । तया जाय स्छळासि ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा.- अक्षराची-वेदविद्येची, आटी-मेहनत, स्छळासी-नरकात अर्थः- मनातील रागलोभादी विकार गेले नाहीत तोपर्यंत कुटुंबाचा त्याग केला तरी व्यर्थ आहे तो. १ बाह्य वेष धारण करून नुसते भजन केले तर ते ओंगळ दिसते व ते करणारा नरकास गेल्याशिवाय राहात नाही २ वेदविद्या पाठ करण्याची मेहनत केली, पण पोटात संतनिंदा आहे तर त्याचा काहीही उपयोग नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याने जरा मागे वळून पाहिल्यास आपण नरकात जात आहोत असे त्याला दिसेल. ४ २५२ तारतिम वरी तोंडाच पुरते । अंतरा हे येते अंतरींचें ॥ १ ॥ ऐसी काय बरी दिसे ठगठकी । दिसतें लौकिकीं सत्या ऐसें ॥ २ ॥ भोजनांत द्यावे विष कालवूनि । मोहचाळवणी मारावया ॥ ३ ॥ तुका म्हणे मंद देखों नेदी कुडें । आदरेंचि पुढें सोंग दावी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा.- तारतिम-तारतम्याचे बोलणे, मंद-कपटी, कुडें-खोटें अर्थः- या माणसाच्या तोंडी दिसणारे तारतम्याचे शब्द तोंडापुरतेच आहेत पण याच्या मनात कपट आहे ते स्वच्छ दिसते. १ व्यवहारात सत्याप्रमाणे वाटणारी ही फसवाफसवी काय चांगली दिसते का कधी ? २ एखाद्यास भोजनास बोलवावे व अन्नात विष कालवून त्यास मोह दाखवून मारावे तसाच हा प्रकार नव्हे का ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा कपटी मनुष्य आदरसत्काराचे सोंग पुढे पुढे दाखवून आपल्या मनातील खोटे दिसू न देण्याचा प्रयत्न करीत असतो ४ २५३ ब्रह्मनिष्ठ काढी । जरी जीवानायें मोडी ॥ १ ॥ तया घडली गुरुहत्या । गेला उपदेश तो मिथ्या ॥ २ ॥ सांगितले कानीं । रूप आपुले वाखाणी ॥ ३ ॥