भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 151, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 151

सार्थ तुकारामगाथा १२३ भूतांच्या मत्सरें । ब्रह्मज्ञान नेले चोरें ॥ ४ ॥ शिकल्या सांगे गोष्टी । भेद क्रोध वाहे पोटीं ॥ ५ ॥ निंदा स्तुति स्तवनीं । तुका म्हणे वेची वाणी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - मिथ्या-खोटा अर्थ:- जो खऱ्या अर्थाने ब्रह्मनिष्ठ झाला आहे तो गवताच्या काडीसही सजीव मानतो. तो काडी जरी तो मोडून टाकील १ तरी त्याच्या हातून गुरुहत्या घडली असेच समजावे. त्याचा सर्व उपदेश खोटा आहे असेच मानणे भाग आहे २ त्याच्या कानी जो गुरुपदेश सांगितला गेला तो व्यर्थच झाला, कारण तो आपलेच रूप बाह्या- त्काराने वर्णन करीत असतो, ३ त्याने सर्व प्राणिमात्राचा मत्सर केला असल्याने त्याचे सारे ब्रह्मज्ञान चोरांनी लुटून नेल्यासारखेच असते ४ गुरूने शिकविलेल्या गोष्टी तो वरवर सांगत असतो, पण त्याच्या पोटात मात्र भेदाच्या, क्रोधाच्याच गोष्टी असतात ५ तुकाराम महाराज म्हणतात, त्याने केलेली स्तुती, किंवा निंदा म्हणजे त्याच्या वाणीचा व्यर्थ अपव्ययच होय ६ २५४ इहलोकींचा हा देहे । देव इच्छिताती पाहे ॥ १ ॥ धन्य आम्ही जन्मा आलो । दास विठोबाचे जालो ॥ २ ॥ आयुष्याच्या या साधने । सच्चिदानंद पदवी घेणे ॥ ३ ॥ तुका म्हणे पाठवणी । करूं स्वर्गाची निशाणी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - देहे-देह, शरीर अर्थ - या लोकी माणसाला हा जो देह मिळाला आहे त्याची इच्छा प्रत्यक्ष देवसुद्धा करतात १ आम्ही मात्र धन्य झालो, कारण आम्ही या विठ्ठलाचे दास झालो आहोत २ आयुष्यात आम्हास हे एक साधन मिळाले म्हणूनच आम्ही ही सच्चिदानंदाची पदवी धारण करू शकतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, या नरजन्माच्या व या देहाच्याच पाठथणीवर स्वर्गाची निशाणी रोवता येते स्वर्गसुखास मागे टाकून सच्चिदानंदपदाकडे जाणे सुलभ होते ४ विवरण - मानवी देहाचे व जन्माचे वर्णन साधुसंतानी विविध प्रकारानी केले आहे या देहाच्याच साह्याने सर्व काही साधावयाचे आहे, असे असले तरी देह म्हणजेच काही सर्वस्व नव्हे केवळ देहाचेच लाड सुरू झाले की मग देहदेव्हार्यात राहणाऱ्याचा विसर पडतो मग देहाचेच कोडकौतुक मोठ्या प्रमाणावर सुरू होते म्हणून संतानी मानवी देहाची विटंबना विस्ताराने वर्णन केलेली आहे मानवी देहू व नरजन्म याची ही निंदा सावधपणे समजावून घ्यावयास हवी 'जन्म दुःखाचा अंकुर' असेच वर्णन संत कधी कधी मानवी जन्माचे करतात शरीर हे दुःखाचे मूळ, 'अत्यंत दोष ज्या विटाळा । त्या विटाळाचाचि पुतळा' म्हणजे हा देहू असेच वर्णन या मानवी देहाचे केले जाते 'नरकाचे कोठार भरलें । सात धातूंचे लडबडिले' असे हे शरीर ज्ञानेश्वरांनीही या मानवाच्या देहाचे असेच भयानक वर्णन केले आहे ते एवढ्याचसाठी की माणसाने केवळ या देहाच्याच प्रीतीत सापडू नये 'गवताची कुसळे वाऱ्याने साऱ्या माळावर पसरतात, तशा माणसाच्या दाढा उपटून पडतील आषाढाच्या पावसाने डोंगराची शिखरे नद्या- नाल्यांच्या रूपांनी वाहतात, तशी तोंडाच्या खिंडीतून लाळ पाझरू लागेल गवताच्या भुजगावण्याप्रमाणे देहू मागेपुढे झुकाण्ड्या खाईल पाय लटपटतील, हाताची कडबोळी होतील ' हे ज्ञानदेवकृत वर्णन एवढ्यासाठीच ध्यानात ठेवायचे की नुसता देह हे सर्वस्व नाही अशी एकदा मनाची निश्चिती झाली की मग मात्र मनुष्यजन्म व नरदेह याचा योग्य उपयोग ध्यानात येईल मग स्वर्गीचे देवही मानवी देहू मिळावा अशी का इच्छा करतात ते लक्षात येईल. कारण याच देहाच्या साहाय्याने सच्चिदानंदाचे रूप जाणायाचे असते 'देही देव आहे बोलती हे वेद । परि वासनेचे भेद न स्वंडिती' असे निवृत्तिनाथांनी म्हटले आहे शरीरच ब्रह्मरूप करून सोडावे, असा संताचा उपदेश आहे यासाठीच 'देह हा सादर पहावा निश्चित' म्हणून तुकोबांनीही म्हटले आहे