सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 152, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१२४ सार्थ तुकारामगाथा २५५ पंडित वाचक जरी जाला पुरता । तरी कृष्णकथा ऐके भावें ॥ १ ॥ क्षीर तुपा साकरे जालिया भेटी । तेंसी पडे मिठी गोडपणें ॥ २ ॥ जागोनियां लाभ घेईं हा पदरीं । गोड गोडावरी सेवीं बापा ॥ ३ ॥ जाणिवेचें मूळ उपडोनी खोड । जरी तुज चाड आहे तुझी ॥ ४ ॥ नाना परिमळद्रव्य उपचार । अंगी उटी सार चंदनाची ॥ ५ ॥ जेविल्याविण शून्य ते शृंगार । तेंसी गोडी हरिकथेविण ॥ ६ ॥ ज्याकारणें वेदश्रुति ही पुराणें । तेंचि विठ्ठलनाणे तिष्ठे कथ्ये ॥ ७ ॥ तुका म्हणे येर दगडाचीं पेंवें । खळखळ आघव्वे मूळ तेथें ॥ ८ ॥ शब्दार्थ व टीपा:- जाणिवेची-अहंपणाची, उपडोनी-मुडून. अर्थ:- मनुष्य जरी मोठा वाचक व पंडित झाला तरी त्याला भक्तीने कृष्णकथा ऐकावीच लागते. १ याचे हे करणे म्हणजे दूध, तूप, साखर याच्या भेटीमधील गोडीप्रमाणेच होय. २ हे समजून तू ज्ञानाचा व भक्तीचा हा लाभ पदरात घे. गोडावर गोड पदार्थांचे सेवन कर ३ तुला जर कांही चाड असेल तर तू अहंमन्यतेची जाणीव खूडून टाक. ४ नानाप्रकारची सुवासिक द्रव्ये जरी अंगाला लावली किंवा चंदनाची उटी प्रामुख्याने अंगाला फासली तरी ती हरिकथेेशिवाय व्यर्थच मानावी लागेल ५ वरवरचा शृंगार जरी झाला असला तरी जेवणाने पोट भरल्याशिवाय जसे व्यर्थ, तसेच हरिकथेशिवाय सर्व फुकट आहे. ६ ज्याच्या नावाने ही सर्व पुराणे खरी आहेत, श्रुती म्हणजे वेद खरे आहेत तेच विठ्ठलरूपी नाणे कथाकीर्तनात स्थिर उभे असते. ७ तुकाराम महाराज म्हणतात, इतर सर्व मग नुसती दगडाचीच पेंवे असतात. नुसतीच खळखळ वरवरची तेथे असते. पण सर्व मूळ एका त्या विठ्ठलात असते. ८ २५६ आणिकांच्या कापिती माना । निष्ठुरपणा पार नाहीं ॥ १ ॥ करिती खेंटें उसणवारी । यमपुरी भोगाव्या ॥ २ ॥ सेंदराचें दैवत केलें । नवस बोले तयासि ॥ ३ ॥ तुका म्हणे नाचति पोरें । खोडितां येरें अंग दुखे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा:- पार-सीमा, खोडिता-दोष दाखविल्यास अर्थ:- काही दुष्ट लोक इतराच्या माना कापतात. त्याच्या निष्ठुरपणास सीमाच असत नाही. १ हे दुष्ट लोक नरकवास भोगण्यासाठीच जणु ही उसनवारी करीत असतात असे वाटते २ शेंदूर फासून दगडाचा देव बनवितात व त्याला ही माणसे नवस बोलतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ही माणसे उगाच देवाच्या नावाने नाचतात; याचा दोष दाखविण्याचा प्रयत्न केल्यास स्याना पटत नाही. यांचे अंग दुखल्याइतके दुःख याना होते. ४ २५७ गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी । कोठें चराचरीं त्याग केला ॥ १ ॥ गायत्री स्वमुखें भक्षीतसे मळ । मिळाल्या वाहाळ गंगाओघ ॥ २ ॥ कागाचिये विष्ठें जन्म पिंपळासि । पांडवकुळासि पाहातां दोष ॥ ३ ॥ शकुंतळा सूत कर्ण शृंगी व्यास । यांच्या नामें नाश पातकांस ॥ ४ ॥ गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर । पाहातां विचार पिंगळेचा ॥ ५ ॥ वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद । यांचें पूर्व शुद्ध काय आहे ॥ ६ ॥ न व्हावी तों जालीं कर्मे नरनारी । अनुतापें हरी स्मरतां मुक्त ॥ ७ ॥ तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी । मूळ जो उच्चारी नरक त्यासि ॥ ८ ॥