भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 141, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 141

सार्थ तुकारामगाथा ११३ आपल्या तोंडावर व ढुंगणावर धपडा मारू लागला. २ या बोबड्याने म्हटले, 'श्रीकृष्णास थोर थोर लोक हवेत. त्यांची मैत्री याला आवडते. मी तर एक दैन्यवाणे गरीब पोरटे आहे.' ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्या गरिबाच्या मनातील भाव जाणून श्रीकृष्णाने त्या गरीब जीवाची समजूत काढली. ४ मृदुंग पाथ्या-अभंग २२७ मागें पुढें पाहे सांभाळूनि दोनी ठाय । चुकावूनि जाय गडी राखें गडियांसि ॥ १ ॥ मुरडे दंडा दोहों तोंडे गडिया सावध करी । भेटतियासंगें तया हाल तुजवरी ॥ २ ॥ गडिया गडी वांटुनि देईं । ज्याचा सोडो तेचि ठायीं ॥ ३ ॥ अगळचा वळे करील काय । तुज देणें लागे डोय ॥ ४ ॥ नवां घरीं पाउला करीं । सांपडें तो तेथें धरीं ॥ ५ ॥ जिंकोनि डाव करीं । टाहो सत्ता आणिकांवरी ॥ ६ ॥ सांपडोनि ढाईं बहु । काळ गुंतलासी ॥ ७ ॥ बळिया गडी फळी । फोडी न धरितां त्यांसी ॥ ८ ॥ चुकांडी जो खाय मिळोनि अंगीं जाय । गुंतलासी काय तुका म्हणे अझूनी ॥ ९ ॥ शब्दार्थ व टीपा :- ठाय-बाजू, हाल-डाव, डोय-डाव, टाहो-घोष, चुकांडी-झुकांडी. अर्थ :- मागेपुढे म्हणजे प्रवृत्तीकडे व निवृत्तीकडे नीट लक्ष देऊन दोन्ही बाजूंच्या गड्यांना चुकवून तू जा. १ प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही बाजूंच्या गड्यांना वळवून तू त्यांना सावध कर. जे कोणी तुला भेटतील त्यांचा डाव तुझ्यावर आहे हे ध्यानात असू दे. २ प्रवृत्ती व निवृत्ती यांच्याप्रमाणे गड्याची वाटणी करून तू ज्याचा गडी त्यासच देऊन टाक. ३ विनाकारण अधिक बळाचा उपयोग काय ? तू त्यांना डाव द्यायला हवाच. ४ नऊ ग्रहांच्या रूपाने असणाऱ्या या नऊ गड्यांचा पाठलाग करून ते जिथे सापडतील तिथे त्यांना तू धर. ५ यांच्यावर डाव जिंकून दुसऱ्यावरील आपली सत्ता तू घोष करून चालू ठेव. ६ या बलवान प्रवृत्तींच्या ताब्यात सापडून तू पुष्कळ काळ गुंतून राहिला आहेस. ७ या बलवान गड्यांची फळी तू त्यांना न धरता फोड व त्यातून तू पार हो. ८ झुकांडी देऊन जो गडी श्रीकृष्णस्वरूपी मिसळून जातो, त्याची संगत तू धर. तुकाराम महाराज म्हणतात, अजून तू या प्रवृत्तींत, या खेळात का विनाकारण गुंतून राहिला आहेस ? ९ २२८ पाहा रे तमासा तुमचा येथें नव्हे लाग ॥ देईन तो भाग आलियाचा बाहेरी ॥ १ ॥ जागा रे गोपाळांनो ठायीं ठायीं जागा । चाहुलीनें भागा दूर मजपासूनि ॥ २ ॥ न रिघतां ठाय आम्हा ठाया पाळतियां । भयाभीत यांयां तेथें काय चांचपां १ ॥ ३ ॥ तुका म्हणे हातां चढे जीयाचिये साटीं । मिटक्या देतां गोड मग लागतें शेवटीं ॥ ४ ॥ १ चांचपाल. तु. गाथा...१५